Top Post Ad

महाबदमाश जात्यंध तुमचा 'पै-पाहुणा' की 'सगा-सोयरा'...?


  एकीकडे भाजपाला विरोध करणारे 'फक्त आम्हीच' अशा गमजा मारायचं अन दुसरीकडे ' मोदी हा भाजपा / RSSला संपवणार आहे म्हणून त्याच्यापासून भाजपा/RSS ला वाचविण्यासाठी आम्हा 'वंचितांना' मदत करा अशी याचना भागवत कडे करतात .. अन आता तर चक्क  'श्रद्धेय' ने भाजपा उमेदवार महाबदमाश जात्यंध-मराठा उज्वल निकमची तळी उचलून धरलीय..महाबदमाश 'जात्यंध-मराठा' उज्वल निकमला भाजपा/RSS ने 'बौद्ध' उमेदवार वर्षा गायकवाड विरोधात उत्तर-मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. या लबाड उज्वल निकमचं कौतुक तुमच्या 'श्रद्धेय' ने  कसे केले आहे..ते खालील शब्दांत वाचा;

"आता मी असं म्हणत नाही की, या वाईट आहेत त्या अमुक आहेत.त्या सगळ्या याच्यामध्ये पण लोकसभेमध्ये एक चांगलं 'रिप्रेजेंटेटिव' जावं तर उज्वल निकम सुद्धा माझ्या अंदाजानं एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्यावर काही आक्षेप घेवू शकत नाही..तेंव्हा अशी माणसं.. पार्लमेंट निवडणूकीसाठी..इथं उभे केले तर लोकांना 'चॉईस' राहतो असं मी या ठिकाणी मांडतो... ... रमाबाईनगर च्या केस मध्ये काय केलं ते सोडून द्या... कसाब केस मध्ये काय केलं ते सोडून द्या...."_

बौद्ध समाजातील एका महिलेच्या उमेदवारी विरोधात एका 'जात्यंध-मराठ्याला' पर्याय म्हणून समोर आणणं हा तुमच्या 'सोशल इंजीनियरिंग' चाच उत्तम नमुना..नव्हे का.. विशेष म्हणजे या मतदारसंघात 'वंचित'ने देखील उमेदवार उभा केला आहे. भाजपाचा उमेदवार खासदारकीचा एक चांगला 'चॉईस' आहे ना मग तुम्ही का उमेदवार उभा केलाय...भाजपा उमेदवाराला मदद करण्यासाठीच ना... 'श्रद्धेय' चे प्रेम ज्यावर उतू चाललंय त्या महाबदमाश 'जात्यंध-मराठा' उज्वल निकमची झाडाझडती:

 *1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट:*- मुंबई वरील हा हल्ला दाऊद अन त्याच्या गँगने घडवून आणला हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.पण,या हल्ल्यात वापरले गेलेले RDX नागला बंदरावर कोणाच्या मदतीने उतरविण्यात आले..हे गुलदस्त्यातच राहिलंय. महाबदमाश वकिलाने या बाबीवर मुद्दामहून दुर्लक्ष केले. 1993 चे साखळी बॉम्बस्फोटाची नाळ1992 च्या दंगलीशी जोडली गेली होती ;याकडेही या बदमाशाने डोळेझाक केली....दाऊदने घडविलेल्या या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक हिंदू अधिकारीही गुंतले होते..तेही सगळं या महाबदमाशाने गुलदस्त्यातच ठेवले.

*1997 रमाबाईनगर हत्याकांड:*- रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या गुंडेवार आयोगासमोर या महाबदमाश जात्यंध-मराठ्याने खोटी टॅन्कर कथा रचून रमाबाईनगर हत्याकांडात मारले गेलेल्या व जखमी पीडितांनाच गुन्हेगार बनवुन टाकलं होतं.. नराधम मनोहर कदमची बाजू मांडतांना त्याची एकंदरीत देहबोली प्रचंड जातीयवादी अशीच होती. रमाबाई नगरातील आंबेडकरी जनतेला त्याने 'क्रिमिनल' म्हणून भरपूर बदनाम केलं. एव्हढं तरी बरं श्यामदादांनी नेमलेल्या वकिलांच्या टीमने आणि विशेषकरून ज्येष्ठ वकिल भाई प्रभाकर हेगडे यांनी या महाबदमाशाची हेकडी भर कोर्टातच उतरवली होती...आयोगासमोर 'टॅन्कर कथा' कशी बनावट आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले .. विनाकारण गोळीबार करून 10 निरपराध व्यक्तींना ठार केल्याप्रकरणी नराधम मनोहर कदम दोषी ठरला अन ह्या महाबदमाश उज्वल निकमची सगळी बुद्धिमता 'नागडी' पडली. 

गुंडेवार आयोगासमोर श्यामदादांच्या टीम मध्ये भाई प्रभाकर हेगडे यांच्या हाताखाली संघराज रूपवते, बी. जी. बनसोडे आणि राजय गायकवाड या वकिलांची फौज होती. आजच्या वंचितांचे 'श्रद्धेय' प्रकाश आंबेडकर त्यावेळी एकदाही कोर्टात फिरकले नाहीत..दादरला रहात असतांनाही.. एव्हढा मोठा खटला... देशातला पहिलाच.. ज्यात चौकशी आयोगाने 'आंबेडकरी' जनतेच्या बाजूने निकाल दिला यात प्रकाश आंबेडकरांचे काम शून्य होते....

*2006 खैरलांजी:* - खैरलांजी गावातील जात्यंध मस्तवाल कुणबी आणि कलार जातीच्या पुंडांनी एक संपूर्ण 'बौद्ध' कुटुंब मारून टाकलं. या हत्याकांडात आई सुरेखाताई,19 वर्ष वयाची प्रियंका आणि तिचे दोन भाऊ अशा चौघांना आख्ख्या गावासमोर अक्षरशः उघडं नागडं करून गुराढोरांसारखं मारलं गेल. या भीषण मारहाणीत चौघंही मरण पावल्यावर त्यांच्या बॉड्या एका बैलगाडीत घालून लांब कालव्यात फेकून देण्यात आल्या. दुसर्‍या दिवशी त्या कालव्यात वेगवेगळया ठिकाणी सापडल्या.

 हे हत्याकांड पूर्णपणे जातीयद्वेषातून करण्यात आले होते याला सबळ 'प्रत्यक्षदर्शी पुरावा'ही उपलब्ध होता म्हणून ही केस SC/ST act खाली नोंदली गेली. तसेच 19 वर्षांची प्रियंका यांची पूर्ण म्हणजे टोटल 'नग्न बॉडी' तर आई सुरेखाताई यांची 'अर्धनग्न बॉडी' ही 'स्त्री विटंबना' या गुन्ह्यात मोडली जाते. नेहमीप्रमाणेच श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही केस लढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे अनेक ज्येष्ठ वकिलांच्या भेटीगाठीही झाल्या. मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश यांचीही नागपुरात भेट घेतली..

सर्व काही व्यवस्थित ठरत असतांनाच, 'राम-डास'ने यात उडी घेतली. त्याच्या नागपुरातील 'फंटर्स' करवी भोतमांगे कुटुंबातील वाचलेले एकमेव सदस्य भैयालाल भोतमांगे यांना ताब्यात घेण्यात आलं अन महाबदमाश जात्यंध-मराठा उज्वल निकमला या केस मध्ये सरकारी वकिल बनविण्यात आलं. रमाबाईनगर हत्याकांडात आम्हाला या महाबदमाश वकीलाचा व त्याच्या डोक्यात भिनलेल्या जातीय विद्वेषाचा चांगलाच अनुभव आला होता म्हणूनच खैरलांजी हत्याकांडाच्या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून या वकिलाच्या नियुक्तीस आम्ही विरोध केला. 

पण, 'राम-डास' हे ऐकण्यातला कुठाय? तो फक्त त्या घडीला ज्याची गुलामी पत्करलेली असते त्यांचेच ऐकत असतो. त्याच क्षणी आम्हाला जाणवले होते की,हा महाबदमाश वकील या केसची वाट लावणारच लावणार.अन नेमकं  घडलंही तसेच. या केसचा निकाल लागला तेंव्हा या केस मधून SC/ST act अंतर्गत नोंद झालेले गुन्हे काढून टाकण्यात आले होते, तसेच सुरेखाताईची व प्रियंकाची नग्न धिंड काढण्याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे असतांनाही या हत्याकांडातून 'स्त्री देहाची विटंबना' हा गुन्हाही काढून टाकण्यात आला होता. शंभर टक्के जातीयवादातून घडलेल्या या काळीज पिळून टाकणार्‍या 'जातीय हत्याकांड' व 'महिला विटंबनेच्या' घटनेला सरकार दरबारी एक किरकोळ साधारण भांडणातून रागाच्या भरात चुकून घडलेली हत्या;असे बनवुन टाकले गेले...'महाबदमाश जात्यंध-मराठा' उज्वल निकमच्या मेहेरबानीने.

 हा निकाल लागताच सगळीकडे निकमची छी$थू$ होत असताना, 'राम-डासाने' मात्र त्याचा जाहीर सत्कार घेतला. निकमच्या या सत्कार सोहळ्यात 'सत्कार कसला घेताय...जाब विचारा' अशी पत्रकं वाटून आम्ही तो उधळून लावला हा भाग दुसरा.. कसली गंमत आहे बघा भक्तांनो... राम-डासाचा आवडता 'महाबदमाश निकम' तुमच्या श्रद्धेय चा देखील आवडता आहे.. काही 'टोटल' लावायला जमतेय का बघा..

*2008 कसाब:* पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईवर केलेला भीषण हल्ला. - मुंबई वरील अतिरेकी हल्ल्यातील जीवंत पकडला गेलेल्या कसाब या अतिरेक्या विरूद्ध ची ही केस देखील या महाबदमाश वकिलास मिळाली. वरवर पाहता हा अतिरेक्यांनी केलेला हल्ला अशी होती.मात्र थोडं डोक्याला चालना दिली तर यातील गांभीर्य लक्षात येईल. पाकिस्तानातून आलेल्या सदर अतिरेक्यांनी भारतात एंट्री घेतली ती मोद्याच्या गुजरात मधून. या हल्ल्याची पूर्व माहिती इंटेलिजेंस ब्युरोला असतांनाही हा हल्ला घडला. या हल्ल्यात कसाबने ATS प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या केली हे सांगितले गेले. मात्र करकरेंच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या या कसाबच्या बंदुकीच्या नव्हत्याच हे सिद्ध झालंय. करकरे यांनी घातलेले बुलेटप्रूफ जॅकेट देखील गायब केले गेले..(या बाबत तत्कालीन वरीष्ठ पो.अधिकारी मुश्रीफ यांनी "हू कील्ड हेमंत करकरे " या पुस्तकात खूप गंभीर पुरावे दिले आहेत.)पण,या सर्व घटनांची दखल महाबदमाश जात्यंध-मराठा उज्वल निकमने घेतलीच नाही..त्यांचा पाठपुरावा केलाच नाही. कारण त्याच्या डोक्यात एकच काम होतं..कसंही करून फक्त कसाबलाच फासावर लटकवायचं..बाकी करकरेंची निर्घृण हत्या.. कसाबला भारतात शिरण्यासाठी मिळालेली 'देशी' मदत इत्यादी इत्यादी विषयी त्याला काही देणंघेणं नव्हतं.. या हत्याकांडाचा बाबत तत्कालीन कॉंग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी त्याने;"कसाबला जेलमध्ये बिर्याणी खायला दिली जाते." अशी अफवाही त्याने मीडिया  मार्फत पसरवली होती..  पण,"ही आपण पसरलेली अफवा होती."नंतर त्यानेच हे कबूल केले..अगदी अमित शाहच्या 15 लाखांच्या 'जुमला' कबूलनामा प्रमाणं...

*2016 कोपर्डी:* -एक भयानक असे हे हत्याकांड ज्यात मराठा महिला पीडित व दलित आरोपी. या बाबतीत हे हत्याकांड महाराष्ट्रातील पहिलेच आणि वंचितांच्या 'श्रद्धेय' प्रकाश आंबेडकरांनी अगदी तत्परतेने हत्याकांड ठिकाणी धाव घेण्याची किमयाही तशी पहिलीच.  आतापर्यंत राज्यात घडलेल्या शेकडो दलित-आदिवासी अत्याचार, हत्याकांडांच्या केसेसमध्ये  त्यांनी पीडितांची भेट घेण्यासाठी कधीच एव्हढी लगबग दाखवलेली नाही. परंतु जरांगेने प्रकाश आंबेडकरांना दिलेल्या; "जर कोपर्डीत आलात तर 'दगड, अंड्यानी' तुमचे स्वागत करू."या जाहिर धमकीला 'मान' देवून प्रकाश आंबेडकरानी कोपर्डीच्या वेशीवरूनच माघारी फिरण्यात धन्यता मानली. जात्यंध-मराठ्यांनी या घटनेचे भांडवल करून दलित आणि मराठा समाजात जातीय तेढ निर्माण केली. पीडितेच्या शारीरिक विटंबनेच्या अनेक कहाण्या मुद्दामहून पसरविण्यात आल्या..अख्ख्या दलित विशेष करून आंबेडकरी समाजाला नाहक टार्गेट करण्यात आले.या तापलेल्या वातावरणात मराठा आरक्षणाचा अन SC/ST Act रद्द करण्याचे घोडे दामटवण्यात आले. याची परिणीती  ठीकठीकाणी दलित वस्त्यांवर हल्ले करण्यात झाली. हे सगळं घडण्यास या महाबदमाशाच्या सतत चाललेल्या प्रसारमाध्यमांमधील मुलाखती कारणीभूत होत्या;हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही.

या महाबदमाश जात्यंध-मराठा वकिलाने, रमाबाईनगर व कोपर्डी केसमध्ये काहीही कारण नसतांना अगदी शातिरपणे आंबेडकरी समाजाला बदनाम केलं; तर खैरलांजी केसमध्ये आपली म्हणजे पीडित बौद्ध कुटुंबाची बाजू मांडण्याचा मोबदला घेवून त्याने कुणबी व कलार या सवर्ण आरोपींना 'SC/ST Act' व 'स्त्री विटंबना' या गंभीर गुन्ह्यांतून अलगद बाहेर काढले.. हा महाबदमाश कुठल्याही केसमध्ये दोनदा वकिली करायचा..एकदा कोर्टाच्या आत आणि कोर्टाचे कामकाज संपल्यावर डब्बल ताकदीने कोर्टाच्या बाहेर प्रसारमाध्यमांसमोर..

खैरलांजी केसमध्ये सर्वच्या सर्व प्रत्यक्षदर्शी पुरावे असतांनाही या महा बदमाशाने केसची 'वाट' लावली तर कोपर्डीत कुठलाही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतांनाही याने आरोपींना, दलित असल्यामुळे गुन्हेगार बनवुन टाकले. कोपर्डी केसचा अभ्यास केल्यास हे  सर्व वास्तव स्पष्ट दिसून येते. कोपर्डी केसचा निकाल लागल्यावर अगदी मर्दुमकी गाजवल्याच्या अविर्भावात मुलाखती देणारा हा महाबदमाश वकिल उज्वल निकम, खैरलांजी निकालानंतर मात्र मुलाखत देतांना म्हणाला;"माझं काम फक्त केस लढणं; हे आहे... त्यात हार-जीत तर होतच राहणार.. माझा त्याच्याशी संबंध नाही." केसेसच्या निमित्ताने आंबेडकरी व मुस्लिम समाजाला टार्गेट करणारा असा हा महाबदमाश वकिल उज्वल निकम म्हणूनच अनेक लोकांच्या मते 'व्हिलनच'..

अशा माणसाची जागा 'संसदेत' नव्हे तर 'कैदखान्यात' या आशयाच्या बर्‍याच पोस्ट माध्यमात फिरत असतांना वंचितांच्या 'श्रद्धेय'ला मात्र तो संसदेत हवाय..  का?.. तर तो भाजपा/RSS तर्फे उभा आहे म्हणून... या महाबदमाश जात्यंध-मराठ्याला 'वंचित वाल्यांची' मदत कमी पडतेय की काय? या धास्तीनं त्याला मदत करण्यास मुसलमानांमधिल 'श्रद्धेय'ही पुढे सरसावला आहे..कालच त्यानेही AIMIM या आपल्या पक्षातर्फे, बौद्ध उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात, आपला उमेदवार उभा केलाय... भाजपा/RSS विरोधातील मतांची विभागणी करण्याकरिता...महाबदमाश जात्यंध-मराठा उज्वल निकमास निवडून आणण्याकरता...

म्हणूनच वंचित भक्तांचं मरू द्या..बाकी आंबेडकरी जनतेने प्रकाश आंबेडकरांचा 'डाव' वेळीच ओळखून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये कारण 'वंचित'च्या उमेदवाराला पडलेलं तुमचे प्रत्येक मत हे कमळाच्या देठाला मजबूत करण्याचेच काम करणार हे निश्चित... वरील विवेचन हे समजून घेण्यासाठीच...

*जाता जाता:* वंचित भक्तानों, सुपारीच्या प्रत्येक खांडा सोबत तुम्हाला 'चुना' फ्री  भेटतो वाटतं.. ते ही स्वतःलाच लावायला.. गेल्या मोसमात RSS चा हरामखोर पडळकर आणि कायंदे तसंच प्रखर सावरकरवादी वंजारी तुम्हाला 'चुना' लावून गेले अन यंदाही तुम्ही पुण्यातून वसंत मोरे या अट्टल दंगेखोर मिलिंद एकबोटेच्या समर्थकाला उमेदवार बनवलंय;तर भिवंडीतून नीलेश सांबरे या मेंटल भिडेच्या पट्टशिष्याला पाठिंबा दिलाय.

ज्या नवख्यांना अट्टल दंगेखोर मिलिंद एकबोटे व मेंटल भिडे कोण?; हे माहीत नाही त्यांच्यासाठी  - 
अट्टल दंगेखोर एकबोटे व मेंटल भिडे या दोघांनीच 1 जानेवारी 2018 रोजी आंबेडकरी जनतेवर भीषण हल्ला घडवुन आणला होता..त्यांना वाचविण्यासाठी "हा हल्ला म्हणजे मराठ्यांनी दलितांवर केलेला हल्ला नसून हिंदू धर्मातील एका समाजाने हिंदू धर्मातील दुसर्‍या समाजावर केलेला हा हल्ला होय"; अशी भूमिका वंचितांचे 'श्रद्धेय' प्रकाश आंबेडकरानी घेतली होती..
या हल्ल्यानंतरच वंचित भक्तांची पिलावळ जन्माला आली ज्यानी 'श्रद्धेय'ही ब्राह्मणी संकल्पना 'आंबेडकरी घराण्यात' दृढ केली... घराणं ही त्यासाठी आसुसलेलं होतंच म्हणा....

  • मिलिंद भवार... _पँथर्स_ 
  • 9833830029
  • 04 मे 2024

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com