Top Post Ad

ठाणे जिल्ह्यातील 6604 मतदान केंद्रात होणार मतदान प्रक्रिया, 3325 मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये 36 मतदान केंद्रे ही सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये असणार आहेत.  जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सुलभ निवडणूक संकल्पनेनुसार ही सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, उन्ह लागू नये म्हणून सावलीची व्यवस्था, रॅम्प, व्हिलचेअर आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.  

सर्वाधिक मतदान केंद्रे मुरबाडमध्ये तर सर्वात कमी उल्हासनगरमध्ये- ठाणे जिल्ह्यात एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 2191 केंद्रे आहेत. यात 134 - भिवंडी ग्रामीण (अ.ज) - 345 मतदान केंद्रे, 135 - शहापूर (अ.ज.) – 326 मतदान केंद्रे, 136 - भिवंडी पश्चिम - 297 मतदान केंद्रे,  137 - भिवंडी पूर्व - 314 मतदान केंद्रे, 138 - कल्याण पश्चिम - 398 मतदान केंद्रे, 139- मुरबाड - 511 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 1960 मतदान केंद्रे असून यामध्ये 140 - अंबरनाथ (अ.जा.) - 319 मतदान केंद्रे,  141 – उल्हानगर- 251 मतदान केंद्रे, 142 - कल्याण पूर्व - 321 मतदान केंद्रे, 143 - डोंबिवली - 269 मतदान केंद्रे, 144 - कल्याण पश्चिम - 406 मतदान केंद्रे, 149- मुंब्रा कळवा - 394 मतदान केंद्रे एवढी संख्या आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 2453 मतदार केंद्रांची संख्या आहे. यामध्ये 145 - मिरा भाईंदर - 451 मतदान केंद्रे, 146 - ओवळ माजिवाडा - 466 मतदान केंद्रे, 147-  कोपरी पाचपाखाडी -  366 मतदान केंद्रे, 148- ठाणे - 361 मतदान केंद्रे, 150- ऐरोली - 429 मतदान केंद्रे, 151- बेलापूर - 380 मतदान केंद्रांचा समावेश आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यामधील सर्वाधिक 511 मतदान केंद्रे आहेत. तर सर्वात कमी मतदार केंद्रे उल्हासनगर विधानसभा मतदार संघात 251 मतदार केंद्रे आहेत. मॉडेल मतदान केंद्रे- यामध्ये जिल्ह्यात एकूण 18 मतदान केंद्रे ही महिलांद्वारे चालविण्यात येणार आहेत. तसेच 18 मतदान केंद्रे ही दिव्यांग आणि 18 मतदान केंद्रे ही युवकांद्वारे चालविण्यात येणार आहेत. 3325 मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग-  जिल्ह्यातील एकूण 6604 मतदान केंद्रांपैकी 3325 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 1107 मतदान केंद्रे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील 991 केंद्रे व ठाणे लोकसभा मतदारसंघातील 1227 मतदान केंद्रांचा समावेश आहे. 


क्यूआर कोड प्रणालीच्या माध्यमातून मतदारांना ‍मिळणार मतदान केंद्राची माहिती - ‍
 जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

  नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणे सोईचे व्हावे ‍किंबहुना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती  क्यूआर कोडच्या माध्यमातून  मिळणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे  आणि जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्या माध्यमातून  Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024 ही बारकोड प्रणाली  तयार करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर पोहचणे सहज शक्य व्हावे यासाठी Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024  ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आले आहे. यामध्ये  23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र क्यू आर कोड तयार करण्यात आले आहे. मतदार जर ठाण्यातील असेल तर त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी असलेला क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्यावर ठाण्यातील सर्व मतदान केंद्र दिसतील. त्यानंतर मतदारांनी मतदार स्लीपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे आहे,किती अंतरावर आहे, तसेच मतदान केंद्राकडे कसे जायचे याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सहजरित्या पोहचता येणार आहे.   

Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024 ही बारकोड प्रणाली जिल्हा समन्वय अधिकारी (संचार आराखडा) सुनील महाले,  महेंद्रकुमार मेटकरी - परिवहन अभियंता, सिडको, अबू अमीर,उपविभाग अभियंता तसेच सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी (संचार आराखडा) अनिकेत खांडेकर, सहाय्यक अभियंता, सिडको,अभिषेक चव्हाण, सहाय्यक परिवहन अभियंता, सिडको,   राहुल कापडणीस, सहाय्यक परिवहन अभियंता, सिडको  यांनी तयार केली आहे. मतदाराला मतदान केंद्रापर्यत जाणे सहज सोपे व्हावे व सदरचे क्यू आरकोड हे मतदारांपर्यत पोहचावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर, तसेच व्हॉटसॲच्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे. तसेच भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील नागरिकांपर्यत विविध माध्यमातून सदर क्यू आर कोडची माहिती उपलब्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले. 

ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून मतदानासाठी नागरिकांना आवाहन करावे.   लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. पादर्शक व निर्भिड वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी एकत्रित काम करावे. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी मतदानाच्या दिवशी आशा व अंगणवाडी स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना घरोघरी पाठवून नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शहरी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी त्या सोसायट्यांच्या सचिव व अध्यक्षांची मदत घ्यावी. त्यासाठी सचिव व अध्यक्षांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) म्हणून घोषित करावे. शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत पालकांपर्यंत संदेश पोहचवावा.    माथाडी कामगार, विविध उद्योगातील कामगार, कर्मचारी यांनी मतदान करावे, यासाठी संबंधित उद्योग/संस्थांच्या प्रतिनिधींशी तसेच कामगार संघटनांशी संपर्क साधून आवाहन करावे. तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिलांचे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे,  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीसाठी सेलिब्रिटी, मान्यवरांची मदत घ्यावी. मतदानाचे आवाहन करणारी व्हिडिओ, रिल्स तयार करून ते ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांतून प्रसारित करावे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्या सेलिब्रेटींचे आवाहनाचे बाईटही समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करावेत. मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना सुखद वाटावे, यासाठी केंद्रात व परिसरात वातावरण निर्मिती करण्यात यावी. पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, व्हिलचेअर, सेल्फी पॉईंट आदींची सोय करावी. तसेच मतदारांना रांगेत जास्त वेळ उभे राहू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षा कक्ष उभारता येईल का हे पाहावे. जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा द्यावी. तसेच मतदान केंद्रांची जागा सुलभपणे सापडण्यासाठी क्यूआर कोड, गुगल मॅपचा वापर करून माहिती द्यावी. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यास अडचणी येणार नाहीत, शांततेत व निर्भिड वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात बंदोबस्त ठेवावा. तसेच आचारसंहिता भंग होत असल्यास तातडीने गुन्हे दाखल करावे. तसेच कोणत्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच चुकीची माहिती प्रसारित होत असल्यास त्याचे तातडीने खंडन करावे,  मतदारांना मतदान केंद्रावर गेल्यावर मतदार यादीत नाव न सापडण्याच्या, नावे गायब होण्याच्या तक्रारी मतदानाच्या दिवशी येत असतात. अनेक मतदारांची नावे ही दुसऱ्या मतदार यादीत गेलेली आढळून येतात, त्यामुळे त्यांना नावे सापडत नाहीत. अशा मतदारांना मदत करण्यासाठी व तक्रारींची दखल घेऊन नावे शोधण्यासाठी हेल्पडेस्क तयार करावेत. - एस. चोक्कलिंगम, प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी


ठाणे जिल्ह्यात दि 20 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत 

          सखी मतदान केंद्रे : 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 436 (रॉयल कॉलेज), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 439 (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. 2 तळमजला), 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 199 (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन 1 रोड नं. 22 वागळे इस्टेट, ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 265 (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 152 (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर 5, ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 124 (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत.

दिव्यांग मतदान केंद्रे- 145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 191 (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 326 (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे ) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 306 (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं 2 गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 283 (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 141 (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 205 (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर 11 प्लॉट नं. 9 नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत.

युवा मतदान केंद्रे - 145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 196 (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं 1), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 332 (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 170 (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 353 (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं 3, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 169 (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर 7 दिवा गांव ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 28 (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com