Top Post Ad

अपना बाजार, मुलुंड शाखेचा 29 मे रोजी वर्धापन दिन

 


: अपना बाजारमध्ये खरेदी म्हणजे दर्जा, गुणवत्ता, विश्वासाहर्ता व पैशाची बचत हे आपण जाणतोच. अपना बाजारच्या मुलुंड पश्चिम डिपार्टमेंटल स्टोअर्स येत्या २९ मे २०२४ रोजी संध्याकाळी पाच ते सात या वेळेत आपला ४७ वा वर्धापनदिन साजरा करणार आहे. ग्राहक, सभासद व हितचिंतक आणि नागरिक यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन अनिल ठाकूर- पालक संचालक, वसंत भोसले-अध्यक्ष, महेश मलुष्टे- चिटणीस,  विनोद निकम-व्यवस्थापक आणि कमिटी सदस्य  ऍड. प्रशांत गायकवाड, नम्रता जाधव, विनय गायधनी, श्रीकांत कोयंडे, सोनाली सावंत यांनी केले आहे.

वर्धापन दिनानिमित्त अपना बाजार मुलुंड डिपार्टमेंटल स्टोअरच्या ग्राहकांकरता विशेष ऑफर आणल्या आहेत या ऑफर्ससचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

अपना बाजार ग्राहकांचे हक्काचे ठिकाण आहे. कित्येक वर्षांपासून ते ग्राहकांच्या सेवेत आहे. मुलुंड पूर्व पश्चिम, नाहूर, भांडुप येथील ग्राहकांनी अपना बाजारच्या सेवेचा लाभ घ्यावा. येथे मिळणाऱ्या वस्तू दर्जेदार आणि गुणवत्ता धारण करणाऱ्या असतात, असे अनिल ठाकूर- पालक संचालक यांनी सांगितले.

मुलुंडचे जे. एन रोड येथील अपना बाजार कित्येक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने अपना बाजाराशी नवनवीन ग्राहक दररोज जोडले जात आहेत, असे वसंत भोसले-अध्यक्ष यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com