Top Post Ad

ठाणे जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीचा निकाल जाहीर

 


 ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रशांत कदम सचिवपदी जगदीश शिंगाडे यांची बहुमताने निवड

ठाणे जिल्हा बार असोसिएशनची (वकील संघटना) सन 2024-2026 साठी निवडणूक 6 एप्रिल 2024 रोजी पार पडली. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी अ‍ॅड. प्रशांत गणपत कदम (आप्पा) यांना 859 मते मिळाली तर त्यांचे विरोधक अ‍ॅड. संजय अनंत म्हात्रे यांना 497 मते मिळाली. कदम यांना 362 मतांनी दणदणीत विजय संपादन केला. तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. सलिल श्रीकांत बुटाला यांचा बहुमताने विजय झाला. तसेच सचिवपदी अ‍ॅड. जगदीश शिंगाडे यांची निवड झाली. तर खजिनदारपदी अ‍ॅड. रेखा नरेंद्र हिवरे तसेच उपसचिवपदी (पुरुष )अ‍ॅड. भरत सोनावणे व महिला गटात अ‍ॅड. कविता सचिन चौधरी यांची निवड झाली. तर कार्यकारी सदस्यपदी अ‍ॅड. नारायण अवचर, अ‍ॅड. सोपान चव्हाण, अ‍ॅड. शैलेश कदम, अ‍ॅड. पुनम कामतकर, अ‍ॅड. पुजा कासळे, अ‍ॅड. प्रशांत लिहिनर, अ‍ॅड. संतोष पांडे व अ‍ॅड. सायली वालमे आदींची निवड झाली. सर्व विजयी उमेदवारांचे ठाणे जिल्ह्यांतून अभिनंदन करण्यात येत आहे. 

ठाणे जिल्हा बार असोसिएशनची सन 2024 ते 2026 या कालावधीसाठी पदाधिकार्‍यांची निवडणूक 6 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 1467 मतदारांनी सहभाग घेतला. पैकी 1379 जणांचे मतदान झाले. अध्यक्षपदाची निवडणूकीत अ‍ॅड. प्रशांत कदम यांनी  362 मतांची आघाडी घेत 859 मते मिळाली तर विरोधी उमेदवार अ‍ॅड. संजय म्हात्रे यांना 497 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी 4 जण रिेंगणात होते. त्यामध्ये अ‍ॅड. सलिल बुटाला यांना 568, अ‍ॅड. हेमलता देशमुख यांना 531, अ‍ॅड. मनोजकुमार राय यांना 133 मते तर अ‍ॅड. कुंदा सावंत यांना अवघी 87 मते मिळवून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर सचिवपदाची निवडणूक अटीतटीची झाली. अ‍ॅड. जगदीश शिंगाडे यांना 725 मते मिळाली तर अ‍ॅड. नरेंद्र गुप्ते यांना 610 मते मिळाली. अ‍ॅड. शिंगाडे यांचा 115 मतांनी विजय झाला. सर्व विजयी उमेदवारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com