देवाच्या डोक्यातून किरण आपोआप बाहेर पडले तर त्याला चमत्कार म्हणतात. आणि असे कुठेही, कधीही दिसलेले नाही. देवाच्या डोक्यावर विज्ञानाचा आधार घेऊन किरण पाडला तर तो विज्ञानाचा चमत्कार ठरतो. हा विज्ञानाच्या ऑप्टोमेकॅनिकल पद्धतीचा वापर आहे. थोडक्यात यात विज्ञान आहे. देव आणि त्याचा चमत्कार नाही.
देवाला विज्ञानाचा आधार घ्यावा लागणे यासारखी शरणागती कोणती नाही. आणि हा देवाचा चमत्कार म्हणणारे नेते राजकारणासाठी खोटे सांगून समाज भ्रमिष्ट करतात. धर्म आणि राजकारण जेव्हा एकत्र येते तेव्हा समाजाचा विनाश होण्यास ते मोठे कारण बनते. तो "विनाशाचा चमत्कार" देव, भक्त आणि त्याचे राजकीय भांडवल करणारे नेते-पक्ष करतात. देव-देव नावाच्या भ्रमात वावरणारे भक्त हे वास्तवात न राहता काल्पनिक जगात वावरत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले भारावून जातात. त्यांना उल्लू बनविणारे नेते आणि पक्ष खुर्चीसाठी असले खोटारडे खेळ खेळतात हे जितके खरे तितकेच मेंदूचा वापर न करणारे त्यांच्या मागे भक्त बनून धावतात हेही खरे.
देवाच्या नावाखाली सर्वनाश! ....सर्वनाशाची गॅरंटी!
0 टिप्पण्या