Top Post Ad

भारतीय लोकशाही आणि संविधान वाचविण्याची मक्तेदारी....


 देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहील्याच सार्वत्रिक निवडणूकीत या देशाच्या राज्यघटनेचे प्रमूख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरेतर बिनविरोध निवडून देता आले असते. परंतू तत्कालीन कॉंग्रेस पक्षाने तसे केले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत निवडून जाता कामा नये यासाठी जंग जंग पछाडले आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याे विरोधात नारायण काजरोळकर यांना कॉंग्रेंसने उभ केले. शेवटी त्यांचा  पराभव केला. त्यानंतर झालेल्या पोट निवडणूकीत सूध्दा अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्यात आले. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, ज्या प्रमाणे अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून देणारे जॉर्ज वॉशिंग्टन यांना अमेरिकन जनतेने  दोन वेळा बिनविरोध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्ह‍णून निवडून दिले. एवढे मोठे मन भारतीय जनतेचे अजिबात नाही. कींबहूना त्यावेळी सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे नाही.   

          नऊ खासदार निवडून आलेल्या रिपब्लीकन पार्टी ऑॅफ इंडिया या पक्षाचे गेल्या 70  वर्षात  सर्वात जास्त नूकसान कोणी केले असेल तर ते कॉंग्रेसने.  ज्या‍ ज्या  वेळी स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ उभी  रहाते त्या  वेळी या चळवळीतील काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून एखाद दुसरे मंत्रिपद देऊन कींवा एक दूसरी जागा देऊन संपूर्ण आंबेडकरी मते आपल्याकडे ओढण्याचे महापाप याच कॉंग्रेंसने केले आहे. आजमितीला रिपब्लीकन पक्षाचे कीती गट आहेत ते मोजता येणार नाहीत. अशा परिस्थितीत आंबेडकरी चळवळ एकसंघ होऊ पहात आहे. आंबेडकरी जनता एकसंघ पणे वंचित बहूजन आघाडी या पक्षाला भरभरुन पाठींबा देत आहे. गावागावातील, तळागाळातील जनतेमध्ये पून्हा एकदा स्वाभिमान जागृत होत असताना आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जनता एकसंघपणे वंचित बहूजन आघाडी या पक्षाच्या  मागे उभी रहात असताना आंबेडकरी चळवळीतील काही झारीचे शुक्राचार्य जे आजपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाच्याा वळचणीला होते ते आज सोशल मिडीयावर वंचित बहूजन आघाडीच्या बद्दल चूकीची आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ टाकत आहेत.  

          या तथाकथीत विचारवंताना माझा एक प्रश्न आहे. 1952 च्या निवडणूकीत त्या वेळचा जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पार्टी या पक्षाला केवळ 3 जागेवर विजय मिळाला होता. 1952 ते 2014 या 62 वर्षाच्या  काळात या पक्षाचा चढता आलेख पहाता या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान गहाण न ठेवता 62 वर्षे अहोरात्र मेहनत केल्यामुळे त्यांना 2014 मध्ये  एकहाती सत्ता मिळविता आली यामधून आपण काही शिकणार आहोत की नाही. या तथाकथीत आंबेडकरी विद्वानांना आयते आणि तात्काळ पाहीजे. म्हणजेच वंचित बहूजन आघाडी या पक्षाची स्थापना पाच वर्षापुर्विची. पहील्या सहा महीन्यातच या पक्षाने स्वतः च्या ताकतीवर 25 लाख मते घेतली आहेत. 1952 च्या नंतर आंबेडकरी पक्षाला मिळालेली सर्वांत जास्त मते आहेत. अशा वेळी वंचित बहूजन आघाडीला आपल्या मताची टक्केवारी वाढविणे, जनमाणसांत आपली मते रुजविणे आणि संघटना मजबूत करण्यासाठी अजून पाच वर्षे देणे आवश्यक आहे. त्यानंतरच या पक्षाची स्वतःची एक ताकद निर्माण होऊ शकते. परंतू कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाच्या वळचणीला लागलेल्या या तथाकथीत विद्वानांना वंचित बहूजन आघाडी पेक्षा कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाची जास्त काळजी आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, वंचित बहूजन आघाडी स्वतंत्र पणे लढली तर महाविकास आघाडीचे नूकसान होऊ शकते आणि त्यामूळे भारतीय जनता पार्टी सत्तेवर  येऊन भारतीय संविधान बदलू शकते आणि भारतीय लोकशाही संपुष्टात येऊ शकते.   

         माझा साधा प्रश्न आहे , भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान वाचविण्याचा ठेका फक्त  वंचित बहूजन आघाडीनेच घेतला आहे काय ?  उत्तर प्रदेशात बहन मायावती स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामूळे भाजपाला फायदा होत नाही काय ?, आमचे आदरणीय मंत्री रामदासजी आठवले हे थेट भाजपाच्या गोटात आहेत. त्यांचे मतदार म्हणजेच रिपब्लीकन पक्ष ( आठवले ) या पक्षाचे कार्यकर्ते आंबेडकरी कार्यकर्ते नाहीत काय? आणि ते भाजपाला मतदान करून लोकशाही वाचवत आहेत की संविधान वाचवित आहेत ? , माननीय जोगेंद्र कवाडे  (पिपल्स  रिपब्लीकन पार्टी) महायूतीमध्ये आहेत ते सूध्दा आंबेडकरी नेते आहेत. ते सूध्दा महायूती म्हणजेच भाजपाला मतदान देणार आहेत मग माननीय जोगेंद्र कवाडे हे संविधान आणि लोकशाही वाचवत आहेत का ? याचे उत्तर तथाकथीत आंबेडकरी विचारवंतानी दयावे.  

         वंचित बहूजन आघाडीचे प्रमूख  बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचे आजोबा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहीले म्हणून त्यांनीच संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला बिनशर्त पाठींबा दयावा असे आपल्याला वाटते का ? महाविकास आघाडी ही भारतीय लोकशाही आणि संविधान वा‍चविण्यासाठी लढत नसून आपण केलेली दृष्कृत्ये लपविण्यासाठी आणि आपली घराणेशाही टिकविण्यासाठी लढत आहे. यामध्ये  वंचित बहूजन आघाडीने आपला बळी दयावा असे कोणाला वाटत असेल तर ते कदापी चालणार नाही.        

    कोणतीही स्त्रि आपले सर्वस्व  गहाण ठेऊन एकनिष्ठ  राहू शकत नाही. आंबेडकरी चळवळ ही स्वाभिमानी चळवळ आहे. ती लफंग्यांची चळवळ नाही. त्यामूळे एक दोन जागेसाठी अख्खी आंबेडकरी चळवळ  दुस-यांच्या दावणीला बांधण्याचे दिवस आता संपले आहेत. या देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आले तर फक्त  आंबेडकरी जनतेलाच त्याचा त्रास होणार आहे का ? या देशातील लोकसंख्येच्या  50 टक्के असणा-या स्त्रियांनाच सर्वात जास्त त्रास हा त्यांना होणार आहेत. उदया मनूस्मृती लागू झाली तर याच 50 टक्के स्त्रियांवर बंधने आल्याशिवाय रहाणार  नाहीत. या देशातील ओबिसी, आदीवासी, मुस्लिम यांना सूध्दा याचा फटका बसणार  आहे याचा विचार मत देताना प्रत्येक मतदारांनी विचार करावा. त्यामूळे भारतीय लोकशाही आणि संविधान वा‍चविण्याच्या नावाखाली आपण केलेली दृष्कृत्ये लपविण्यासाठी आणि आपली घराणेशाही टिकविण्यासाठी, महाविकास आघाडीसाठी तथाकथीत आंबेडकरी विचारवंतानी आपली बुध्दी पाजळू नये हीच विनंती.

 वंचित बहूजन आघाडीने लोकसभा निवडणूकीत 9 मतदार संघामध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामूळे तथाकथीत आंबेडकरी विद्वानांनी सोशल मिडीयावर कमालीचा हैदोस घातला आहे. अशा तथाकथीत आंबेडकरी विद्वानांसाठी हा लेखन प्रप्रच. -           प्रा.सुबोध कुमार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com