Top Post Ad

जयचंद की डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कुणाचे वारसदार व्हायचे

 


   देशद्रोही,संविधान व लोकशाही विरोधी निरंकुश सत्तेला, सत्ताधाऱ्यांना हा देश साथ देत नाही, हा इतिहास स्वातंत्र्य भारताचा राहिला आहे . संघ व भाजपसारख्या देशविरोधी शक्तींनी या इतिहासाची पाने चाळून पाहवी म्हणजे त्यांना ते कळेल. तसेच संविधान व लोकशाही समोर आव्हान उभे करणाऱ्या संघ व भाजप या धर्मांध शक्तींना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या  प्रकाश आंबेडकर अन् मायावतीनी ही इतिहासाची पाने चाळली तर भविष्यातील आपल्या इज्जतीच्या चिंध्या झाल्याचे त्यांना आजच दिसतील. मतं विभाजन ही आज भाजपची गरज आहे. अन तेच राजकारण प्रकाश आंबेडकर व मायावती करीत आहेत. हे करीत असतानाच आरएसएसबाबत प्रकाश आंबेडकर यांचे प्रेम उफाळून आले आहे, तर गुजरातमध्ये अल्पसंख्यांक समाजाचे हत्याकांड करणाऱ्या मोदी अन् भाजपला मायावतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. ही आंबेडकरी विचार व संविधाना प्रति केलेली गद्दारी आहे. या गद्दारांना ही या देशातील जनता कधीच विसरणार नाही. जशी ती जयचंदला विसरत नाही. गद्दारी, धोका, विश्वासघात याचे प्रतिक असलेल्या/ ठरलेल्या जयचंदाला ही भारतीय जनता कधीच विसरु शकत नाही. विसरणार नाही. अन् इतिहास विसरू ही देत नाही. त्यामुळे गद्दार , धोकेबाज व विश्र्वासघातकी जयचंदाचे वारसदार व्हायचे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ? हे प्रकाश आंबेडकर व मायावतीने ठरवावे. 

जयचंद तूने ये क्या कर दिया,
 गौरी को लाकर हिंद में आबाद कर दिया !! 

हे जयचंद बद्दल बोलले जाते. मोहम्मद गौरीला सर्व प्रकारची मदत व सहाय्य करून राजा जयचंदने राजपुतांचा पराभव घडवून आणला व विदेशी मुस्लिम राजवट या देशावर कायम करण्यात मोठा हातभार लावला.  त्या दिवसांपासून जयचंद म्हणजे गद्दारी, जयचंद म्हणजे धोका अन जयचंद म्हणजे विश्वासघात हे भारतीयांच्या मनावर बिंबले आहे.  त्यानंतर ८०० शे वर्षांपेक्षा अधिक काळ या देशावर वेगवेगळ्या मुस्लिम बादशहांनी राज्य केले. नंतर दीडशे वर्ष ब्रिटीशांनी राज्य केले. त्यानंतर कुठे हा देश स्वतंत्र झाला. अन् या स्वातंत्र्य देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान व लोकशाही राज्य व्यवस्था दिली. मात्र मुस्लिम राजवट व ब्रिटिशांची दलाली करणाऱ्यांच्या औलादीची सत्ता आज देशावर आली असून त्यांनी संविधान व लोकशाही समोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी या धर्मांध शक्तींना पराभूत करण्याचे सोडून त्यांना मदत, सहाय्य व लाभदायक भूमिका आंबेडकरी विचारांची चळवळ चालविणाऱ्या नेत्यांनी व पक्षांनी घेणे म्हणजे आंबेडकरी विचार, समाज, संविधान, लोकशाही व देशाशी गद्दारी करण्यासारखेच आहे.

      देशात होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा भाजपला यश मिळाले तर ही निवडणूक शेवटीचीच ठरणार आहे. ही काही कोणी मतं मिळविण्यासाठी फुकटची भिती दाखवत नाही. गेल्या 10 वर्षाच्या सत्ताकाळात भाजपने हे दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपला रोखणे देशाच्या हिताचे आहे. पण आपण या शक्तीला रोखू शकलो नाहीतर संविधान व लोकशाहीचे राज्य राहणार नाही. त्यावेळी हा आजचा एकसंघ भारत कायम असेल की नाही, हेही कुणी ठामपणे सांगू शकत नाही. संविधान व लोकशाहीचे राज्य संपुष्टात येईल, त्या दिवशी या देशात किती हाहाकार माजेल ? यादवी सुरु होईल ? अन् त्यात कुठली हानी होईल ? याचा साधा विचार ही फार भयावह वाटतो. संविधान व लोकशाहीचा फेसला हा निवडणूक निकाल करणार आहे. अशा परिस्थितीत भाजपला रोखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य असताना संघ व भाजपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत फक्त संघ व भाजपच्या परिवारातील पक्ष व संघटनाच करू शकतात. अन यामध्ये डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे व रक्ताचे वारसदार असतील तर हे दुर्दैव आहे.

       सन 2019 च्या निवडणुकीत संयुक्त शिवसेना व भाजपची युती होती. त्यावेळी सेनेला 23 ते 24 % तर भाजपला 27 ते 28 % टक्के मतं मिळाली होती. याचा अर्थ असा आहे की मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या 50  ते 52 टक्के ज्यांना मिळतात ते निवडून येतात. वंचितला केवळ 7 ते 8 टक्याच्या आसपास मतं पडली होती. त्यात ही ओवेशीची मतं अधिक होती. असे असताना यावेळी इतके अंतर कापून वंचित आपले उमेदवार निवडून आणेल, ही निव्वळ बनवेगिरी आहे . तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार ) यांना पडलेल्या मतांची टक्केवारी 31 ते 32 टक्के इतकी मतं मिळून ही केवळ 5 जागा त्यांना मिळाल्या. मग वंचित कुठल्या मतांच्या भरवशावर निवडणूक लढवित आहे ? आपले उमेदवार निवडूण आणणार आहे ? हे वंचितसाठी अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या ही पुढे आघाडी शिवाय पर्याय नव्हता. पण त्यांना भाजपला रोखायचे नसल्याने ते विरोधकांच्या एकजूटीत सामिल होत नाहीत. झाले नाहीत.

       4 एम म्हणजे मॅन, मनी, मशीन अन् मसल पॉवर हाताशी असताना ही आज या निवडणुकीचे वातावरण भाजपसाठी अनुकूल नाही. सन 2019 मध्ये ही नव्हते. त्यामूळेच पुलवामा व सर्जिकल स्ट्राइक घडवून आणले होते. त्याशिवाय बी टीम सोबत होत्याच. आज सर्जिकल, पुलवामासारखी घटना घडवुन आणणे कठीण आहे. तसेच बी टीमच्या माध्यमातून मतं विभाजन करणे ही कठीण आहे. कारण जनतेच्या लक्षात हे आले आहे. तर बी टीम ही विश्वास हरवून बसल्या आहेत. पण निवडणुका जिंकायच्या आहेत.

        अन्...... पुढील वर्षात संघाच्या स्थापनेचा शतक महोत्सवी सोहळा होत आहे. त्यावेळी या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करायचे आहे. त्यासाठीच सत्ता हवी आहे. पण ती हातून जात असल्याचे संघाला दिसत आहे. त्यामुळेच सगळे हातखंडे ते अजमावित आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे संघ प्रेम व भाजप विरोधी मतांमध्ये विभाजन हे त्यांचे राजकारण हा या हातखंडाचाच एक भाग आहे. तुर्त इतकेच.

  •         राहुल गायकवाड,
  • महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com