Top Post Ad

आमचे मत स्वाभिमानासाठी....


  भा.ज.प. पूर्वी जनसंघ नावाने निवडणूक लढवत होता त्यांना माहीत होते आमचा उमेदवार निवडून येणार नाही तरी पण RSS आणि सर्व बामण पन्नास वर्षे जनसंघालाच मते देत होते. यांच्या उमेदवाराला जेमतेम हजार मते मिळायची तरी पण यांनाच मते द्यायचे. नंतर जनता पक्ष झाला, पुढे भाजप झाला तेव्हा दोन खासदार झाले. परंतू RSSने आपली मतं देणे थांबवले नव्हते. तेव्हा  RSSवाल्यांनी विचार नाही केला की आमची मतं वाया जातील म्हणून निवडून येणाऱ्या पक्षाला द्यावीत. आजसुद्धा दक्षिणेत तामिळनाडू, केरळ इथे भाजपचे काहीही अस्तित्व नाही तरी पण तेथील RSSचे बामण मंडळी फक्त भाजपला मतदान करतात तेव्हा ते विचार नाहीत करत की आमचे मत वाया जाईल. ते विचार करतात की आमच्या मतांची नोंद तरी होईल. म्हणूनच आमचे मत वाया गेले तरी चालेल पण आम्ही तर आमचे मत वंचित बहुजन आघाडीलाच देणार कारण दुसरे आहेच कोण? .आमची इतिहासात नोंद होईल  आमचे मत स्वाभिमानासाठी आमच्या नेत्याला देऊन राजकीय बळ देण्यासाठी....

बरेचजन म्हणतात संविधान वाचवण्यासाठी महा विकास आघाडीला मते द्या. यांचा पण काय भरोसा आहे. उद्या हे पण भाजप मध्ये जाणार नाहीत याची काय शाश्वती आहे कारण महा विकास आघाडीत शिल्लक राहिलेल्या अनेक जनावर कारवाई चालू आहे. हे वाचवण्यासाठी यांना सत्ता हातात पाहिजे. शरद पवार, उध्दव ठाकरे यांचे चाळीस पेक्षा जास्त आमदार, मंत्री, नेते गेले आहेत जे शिल्लक आहेत त्यांचापण केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल हे सांगता येत नाही. कॉंग्रेसची पण हिच अवस्था झाली आहे. तसे पाहिले तर पवार, ठाकरे यांचा पक्षच आताच्या घडीला नवीन आहे. आता यांना नव्याने  पक्षबांधणी करावी लागणार आहे. तीच गत कॉंग्रेसची पण झाली आहे. यांचे पण एक एक जन फुटून जात आहे.कॉंग्रेस नेते मंडळी पण ED, CBI च्या कचाट्यात सापडली आहे .      मा. प्रकाश आंबेडकर हे चाळीस वर्षे खस्ता खाऊन आज इथपर्यंत आले आहेत. आणि आता संघटन मजबूत केले आहे. भले वंचित कडे आमदार खासदार नाहीत पण सध्या मतदार आहेत. यापूर्वी प्रस्थापित लोकांच्या याच पक्षांनी प्रकाश आंबेडकर यांना राजकीय दृष्ट्या उभे राहू दिले नाही.

 यासाठी  वेळोवेळी साम, दाम दंड भेद नीतीचा वापर केला. आता पण यांच्या डोक्यात हिच कल्पना आहे. दलित बौद्ध यांना संविधान खत्रेमें है... ची भिती घालायची आणि मुस्लिमांना मुस्लिम खत्रेमें है...ची भिती दाखवून आपली मते वंचित बहुजन आघाडीला जाऊ नये ही यांची आयडियाची कल्पना आहे. जर यांना संविधान वाचवायचे आहे तर इतके दिवस संविधान मजबूत का केले नाही अनेक वर्षे सत्ता यांच्या कडे होती. संविधानाचा आताच यांना एवढा पुळका का आला?? मागे दोन वर्षांपूर्वी दिल्लीत संविधान प्रत जाळली तेव्हा यांच्या पैकी कोणत्याही पक्षाने विरोध केला नाही. संविधान धोक फक्त  नाटक आहे खरे कारण तर या विरोधकांवर ED, CBI, Income Tax चे  यांच्यावर झालेले गुन्हे आहेत. हे मिटवण्यासाठी यांना सत्ता पाहिजे. मग  सत्ता कशी मिळणार तर दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी यांची  वंचित कडे जाणारी मते वळवून.ठाकरे, पवार, कॉंग्रेस यांच्या कडे आता स्वाताचे शिल्लक खूप कमी आहेत याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्याकडे खूप प्रमाणात मतदार गेले आहेत म्हणून ते संविधानाला धोका आहे हि भिती घालून वंचितला जाणारी मते थोपवू पाहात आहेत. आम्ही तर म्हणतो की, संविधान संरक्षण करण्यासाठी काय आम्हीच ठेका घेतलाय काय

जे नुकसान आमचे होणार आहे त्यापेक्षा जास्त तुमचेही होणारच आहे ना? जेव्हा संविधान जाईल तेव्हा आम्हाला पण काठ्या, कु-हाडी, तलवार, भाले, बरच्छे घ्यायची वेळ आलीच तर जरूर घेऊ अन् मुकाबला करू. परंतु आमचे मत वाया जाऊ देणार नाही. आमचे मत स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी, आंबेडकरी चळवळ  जिवंत ठेवण्यासाठी आणि राजकीय दृष्ट्या ठामपणे उभे राहाण्यासाठी आमचे मत फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीलाच देणार. मा. प्रकाश आंबेडकर  आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष राजकीय दृष्ट्या मोठा होऊ नये ही प्रस्थापित पक्षांची  चाल रोखण्यासाठी आम्ही सर्व वंचित बरोबर म्हणजेच मा. प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर आहोत. सध्या वंचित बहुजन आघाडी ला राजकीय दृष्ट्या सक्षम करणे ही आपल्या आंबेडकरी जनतेचे कर्तव्य आहे. ते आपण सर्व मिळून पूर्ण करू असा सुर उपस्थित जनसमुदायातुन उमटत होता.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com