Top Post Ad

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.....!

 


        दलितांचा कैवारी, परमपूज्य, महामानव, क्रांतीसुर्य, भारतरत्न, विश्वरत्न आदी.व्यक्तीची महानता सिद्ध करणारी विशेषणे ,पदव्या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे आले की खूप छोट्या वाटायला लागतात. अपुऱ्या पडतात,  वर्गात बसून शिक्षणच घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती असताना " नॉलेज ऑफ सिम्बॉल " बनने, हे खरे जगातील पहिले अन् शेवटचे आश्चर्य आहे. भारतीय समाजात आमूलाग्र बदल घडवून त्या समाजाला संविधान व लोकशाहीचे दान देण्याचे महान कार्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असून हा देश पुढील हजारो वर्ष या महान सुपुत्राचे ऋण फेडू शकणार नाही. मला मातृभूमी नाही (I have no mather land) या पासून सुरु झालेला बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय प्रवास " मी प्रथम भारतीय आहे व नंतर ही भारतीयच आहे, " असा निरंतर सुरु राहिला. त्यांचा हा प्रवास या देशावर अनंत उपकार करुन गेला आहे. नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून जगभराने गौरवलेल्या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.....!

                देशाच्या साधन संपत्तीवर हजारो वर्षांपासून मनुवाद्यांची मक्तेदारी होती. पिण्याच्या पाण्यावर ही पहारे होते. ही मक्तेदारी व पहारे तोडून बहुजनांना धर्मांधांच्या बंधनातून मुक्त करण्याचे काम सोपे नव्हते. पण २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करुन त्या पाण्याला आग लावली व त्याच आगीत २५ डिसेंबर १९२७ रोजी त्यांनी मनुवाद्यांच्या अधिकाराची सनद असलेल्या मनुस्मृतीचे दहन केले.

      पुढे संधी मिळताच धर्मांध व जाती व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच या देशाचे संविधान लिहून एक लोकशाही राज्य व्यवस्था या देशात कायम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वत्र विषमतेच्या गटार गंगा वाहत असलेल्या या देशात समतेचे साम्राज्य स्थापित करणे अवघड होते. पण डॉ. आंबेडकरानी ते अथक मेहनत करुन शक्य करुन दाखविले. आज सर्वच क्षेत्रात जगाचा बरोबरीने हा देश उभा आहे.विकास करीत आहे. तो केवळ या संविधानामुळेच. बाकी गोबर व गोमूत्र भक्तांच्या हातात हा देश गेला असता तर आपण आज ही हा देश कुणाच्या तरी अधिपत्याखाली असता. गुलामीत असता. आज आपण स्वातंत्र्य आहोत. हजारो जाती व पंथात विभागलेला हा देश आज एकसंघ आहे, तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच. त्यामुळेच अतिशय बहिस्कृतपणाची वागणूक देणाऱ्या या देशावर ही डॉ. आंबेडकरांनी अतोनात प्रेम केले.

        अखं जग. जगातील असा कुठला कानाकोपरा नाही, जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुक्तीचे विचार पोहचले नाहीत. जातीय व वर्ण व्यवस्थेच्या बंधनात खितपत पडलेल्या सर्व शोधितांना डॉ. बाबासाहेब आपला मुक्तिदाता वाटतात. आपले वाटतात. अन् त्यांनी लिहिलेले संविधान आपल्या मुक्तीची सनद वाटते.....!

       जयभीम ! जय संविधान....!


  •     राहुल गायकवाड
  • महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com