Top Post Ad

पन्नास हजार महिलांचा समावेश असल्याचा दावा खर्च फक्त ७० हजार रूपये... निवडणूक आयोगाची फसवणूक


  •  शिवसेनेकडून निवडणूक आयोगाची फसवणूक
  • अजय जया यांनी पुराव्यानिशी केला खुलासा..! 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खर्च सादर करताना चक्क निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. पन्नास हजार महिलांचा समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सखी कार्यक्रमासाठी फक्त ७० हजार रूपये खर्च केल्याचे विवरणपत्र सादर करण्यात आले आहे .  शिवसेनेच्या वतीने हायलँड मैदानात रविवारी सखी नावाने महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. सुमारे ५० हजार महिला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या एवढ्या मोठ्या कार्यक्रमास ६९ हजार ६५० रूपये खर्चाचे विवरण पत्र सादर करण्यात आले आहे. २०×३० चा स्टेज आणि खुर्च्या १५,०००/- , कमान १०००/- ,  १५ टेबलसाठी ७५०, डनलप खुर्ची आणि सोफ्यांसाठी २३००/-  , पोस्टर्स २४,०००/-, डिजीटल फलक ५०००/-  , जनरेटर १०,०००/- आणि इतर असे सत्तर हजार रूपयांचे विवरण देण्यात आले आहे.  याबाबत जेया यांनी सांगितले की, एवढा मोठा मंच उभारणी, जनरेटर आदी खर्च प्रचंड असूनही कमी खर्च दाखवून शिवसेनेने निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. सदर प्रकरणी शिवसेना यांच्यावर कार्यवाही करावी ही मागणी अजय जेया यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com