नरेंद्र मोदी व भाजपाचा लोकसभा निवडणूकीत पराभव करणे म्हणजेचं "देशभक्ती होय"
चिपळूण येथील कामगार मेळाव्यात राष्ट्रीय कामगार नेते कॉ डॉ.डी.एल.कराड यांचे आवाहन.
: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांनी भारतीय नागरिकांना दिलेले सुरक्षा कवच म्हणजे भारतीय संविधान दिले.हे संविधान नरेंद्र मोदी,भाजपा आणि आरएसएस यांनी नाकरले आहे.संविधान बाजूला सारले असल्याने आपले जीवन असुरक्षित झाले आहे. म्हणून आम्ही सर्व कामगार,मजूर,कर्मचारी, शेतकरी, शेतमजुर,कष्टकरी आणि भारतीय नागरिकानी नरेंद्र मोदी व भाजपासह त्यांचा सहकार्यांना पराभूत केले पाहिजे.आता सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे म्हणजेचं देशभक्ती होय.असे आवाहन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते कॉम्रेड डॉ.डी.एल.कराड यांनी केले.
परिवर्तन स्वयंरोजगार सेवा, उद्योग सहकारी संस्था मर्यादित,पाथर्डी आणि तथागत सेवा संघ,खेरशेत चिपळूण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात "असंघटित कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.असंघटित कामगार कर्मचारी यांना संबोधित करतांना डॉ.कराड पुढे म्हणाले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानिक कायद्या आधारे सुरक्षा दिली. मतदानाचा आधिकार दिला.संविधानात ४४ कामगार कायदे देऊन भारतातील कामगार, कर्मचारी व कष्टकर्यांना कवच कुंडल दिली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्व कामगार कायदे रद्द करून त्यांनी नव्याने ४ काळे कायदे आणले आहेत. या नव्या कायद्यामुळे आणि खाजगीकरणामुळे कामगार कर्मचारी उघड्यावर पडले,देशोधडीला लागले आहेत.असा आरोप कॉम्रेड कराड यांनी केला.नरेंद्र मोदी आणि त्यांचा सहकारी पक्षांनी मिळून भारतीय संविधान संपवून नव्या स्वरुपात मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची 'घटना' बाजूला ठेवली आहे. म्हणून नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांचा सहकार्यांचा या लोकसभा निवडणूकीत पराभव करणे म्हणजेचं "देशभक्तीचे काम आहे. शेतकरी कामगार यांची लढाई पुढे घेऊन जायची असेल तर पहिल्यांदा आपण शेतकरी,शेतमजुर,कामगार,कर्मचारी,कष्टकरी,सर्व सामान्य नागरीकांनी नरेंद्र मोदी यांचा पराभव केला पाहिजे. असे आवाहन कामगार नेते कॉ.डी.एल.कराड यांनी कामगार कर्मचार्यांना केले.
या मेळाव्याला रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर,गुहागर, चिपळूण,दापोली,मंडणगड व खेड तालुक्याच्या गावातील असंघटित कामगार,कर्मचारी मोठया संखेने सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिरा कामगार, दगड,खडी,वाळू कामगार, बांधकाम मजूर,गिग वर्कर्स,काजू फॅक्टरी,छोट्या मोठ्या आस्थापना, दुकाने मॉल मध्ये काम करणारे असंघटित कामगार आहेत.त्यांना संघटीत करणे आवश्यक आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोहिते होते,तर असंघटित कामगार कर्मचारी यांचा प्रश्नाबाबत काम करणारे संदीप पवार यांनी प्रास्ताविक केले.या मेळाव्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. बुक्टू या प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रो.जी.बी.राजे,जेष्ठ विचारवंत प्राचार्य राजेंद्र कुंभार, इंडि जर्नल चे मुख्य संपादक प्रथमेश पाटील, नाटककार नागेश धुर्वे, जेएनपीटीचे विश्वस्थ आणि कामगार नेते भूषण पाटील, रायगड ,जेष्ठ गिरणी कामगार नेते कॉ.विठ्ठल घाग,जेष्ठ पत्रकार दीपक पवार, सीफेअर्स युनियनचे कामगार नेते कॉ.मनोज यादव, बीएमसी कामगार नेते कॉ. शैलेन्द्र कांबळे,जेष्ठ साहित्यिक पत्रकार सुबोध मोरे आदि विचारवंतांनी असंघटित कामगार कर्मचारी यांच्या प्रश्नांनाबाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक कार्यकर्ते रमेश साळवी खेरशेत, शिक्षणविस्तार अधिकारी सशाली मोहिते, रिया अमित साळवी,प्राचार्य टि.वाय. कांबळे, सावर्डे,विलास डिके आदी अन्य संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 टिप्पण्या