Top Post Ad

सग्या-सोयऱ्याचे आणि घराणेशाहीचे एक जातीय राजकारण... कधी थांबणार ?


 वंचित बहुजन आघाडी  या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी व योग्य प्रतिनिधी देण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बरीच चर्चा सुरू आहे. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव यांची जी युती झाली होती. त्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्णविराम दिला व शिवसेनेची झालेली युती तोडली. यावर शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले बाळासाहेब आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडून चूक केली. दोन्ही पक्षांनी मिळून युतीची घोषणा केली तर दोन्ही पक्षांनी एकत्र बसून युती तुटल्याचे घोषित केले पाहिजे. ही दुर्दैवाची बाब आहे वगैरे वगैरे.

पण संजय राऊत किती धूर्त आणि कावेबाज आहे.  तो सरळ सरळ खोटे बोलत आहे. शिवसेना रोज एक उमेदवार जाहीर करीत आहे .घटक पक्ष म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना सोडा शरद पवार अथवा नाना पटोले यांनाही थुक लावण्याचे काम शिवसेना करीत आहे .बीजेपीला हरवायचं असेल तर ओबीसी आणि मायनॉरिटी समाज घटकाची मते तुम्हाला मिळाली पाहिजेत हा उत्तम फार्मूला बाळासाहेबांनी तुम्हाला सांगितला. त्यासाठी तुम्ही तिन्ही पक्षांनी मिळून 15+3  असा जागेचा बटवारा सांगितला पण कोणीच ऐकायला तयार नाही ."माझ्याच भाकरीवर जास्तीत जास्त डाळ कशी ओढून घेता येईल" यासाठी नुसती स्पर्धा सुरू आहे. रासपाचे महादेव जानकर यांनी तीन जागेची मागणी केली. सांगली ,परभणी आणि माढा .तीन सोडा त्यांना एक ही जागा द्यायला टाळाटाळ करून शेवटी त्यांना बीजेपीच्या गोटात घालून बसले. फक्त सग्या, सोयऱ्याचे आणि घराणेशाहीचे एक जातीय राजकारण सुरू आहे.

नुकसान वंचित बहुजन आघाडीचे होणार नाही ,तर तुमचे  होणार आहे . तुमचे राज्य गेले आहे. तुम्ही फूटपाथवर आलात. तुम्हाला आमची गरज आहे .आम्हाला तुमची गरज नाही. याचा एकदा शांत डोक्याने विचार करा. युती करा, आम्हाला मत द्या ,आमच्या मागं फिरा अन आमच्या खुर्च्या आणि सतरंज्या उचला ,पण सत्तेमध्ये वाटा मागू नका, सत्तेची मलाई मात्र आम्हीच चाखणार हे दिवस आता राहिले नाहीत. आता वंचित बहुजन आघाडीमुळे आणि  बाळासाहेब आंबेडकरांमुळे बहुजन समाज जागृत झाला आहे .त्याला खऱ्या खोट्याची, भूलथापाची चांगलीच ओळख झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रात राज्य नाही ,मंत्री, आमदार ,खासदार नाहीत युती झाली काय नाही झाली काय आमचं काय बिघडणार आहे. पण तुमचं मात्र आमच्या मदतीशिवाय काहीच होऊ शकत नाही हे ध्यानात ठेवा. 2019 च्या निवडणुकीमध्ये अशीच चूक केली आणि 42 लाख मत वंचितने घेतली. परिणाम काय झाला सर्वांना माहिती आहे. पाच, पाच टर्म पडलेल्या जागा वंचितने मागितल्या त्यासुद्धा तुमच्या हातून सुटवत नाहीत .आजही तीच मानसिकता प्रस्थापित पक्षांची आहे .आता 2024 आहे .आमची ताकद दुप्पट, तिप्पट वाढली आहे . बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला फरफटत घेऊन जाऊ असा जर तुमचा विचार असेल तर ती फार मोठे घोडचूक होणार आहे. उलट तुम्हीच अपयशाच्या खोल दरीत जाऊन कोसळणार एवढं नक्की .ज्याने तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचलं ,तुमचा विश्वासघात केला, त्यांना तुम्हाला धडा शिकवायचा आहे पण ते तुम्हाला शक्य आहे का? त्यासाठी आम्हाला सोबत घ्यावा लागेल.सविधान वाचवणं ही एकट्या बाळासाहेब आंबेडकरांची जबाबदारी नाही ती सर्वांची आहे .संविधान वाचलं तर सर्वजण वाचाल नाहीतर सर्वजणच बुडणार आहेत. आम्हाला माना सन्मानाने सत्तेमधला आमचा वाटा मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आणि अट आहे.  

  • महाकवी वामनदादाच्या शब्दात बोलायचे झाले तर-
  • सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठे आहे हो?
  • सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठे आहे हो?
अनिरुद्ध वाघमारे- जिल्हा महासचिव,
वंचित बहुजन आघाडी, सोलापूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com