Top Post Ad

पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ठाण्यात मेट्रो धावणार ?

 


 शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरु झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.  मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून २०१६ रोजी १४,५४९ कोटीची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली.  मेट्रो -४ मार्गाचे काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे तीन ते चार महिन्यापासून बंद पडले होते. मात एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांची दि.१८/०२/२०२२ रोजी खासदार राजन विचारे यांनी भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्याचे काम प्रगतीपथावर सुरू झाले.

पॅकेज क्रमांक 11, 12 व 4A चे अभियंता निलेश महाले, सुरेंद्र शेवाळे, भूषण मैसके, नगर अभियंता ठामपा सोनाग्रा तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुशा भोंगाळे, गोरख पाटील यांच्यासह खासदार राजन विचारे यानी या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.  कापुरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सुरज वाटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदर पाडा अशा व इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे करण्यात आली. ज्या ठिकाणी मेट्रोनी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिगेट लावून ती जागा बंद करावी जेणेकरून अपघात टळू शकतील प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सर्विस रोड डीपी मध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंतांना करण्यात आल्या.

हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूस ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांसाठी सर्विस रोड तयार केले होते. परंतु घाटकोपर वरून येणारी कासारवडवली ठाणे मेट्रो ४ चे काम सुरू झाल्यानंतर त्याचे पिलर हायवेवर येत असल्याने हायवे वरील सर्व वाहतूक सर्विस रोडवरून फिरवली असल्याने हाजुरी, लुईसवाडी या परिसरातील नागरिकांना नितीन कंपनी सिग्नलवर जाण्याकरिता हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करावा लागत आहे. त्याचा त्रास तेथील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना होत आहे. लुईसवाडी येथील स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार लुईसवाडीतील शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना दळणवळणासाठी ठाणे शहरात ये-जा करावी लागते. या ठिकाणी असलेल्या उचं पादचारी पुलाचा वापर जेवढा करायला पाहिजे तेवढा करत नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची स्वतःची वाहने शहराच्या दिशेने जाण्याकरिता नितीन सिग्नल पर्यंत किंवा तीन हात नाका सिग्नल पर्यंत पोहोचविण्यासाठी विरुद्ध दिशेचा वापर करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. हे रोखण्यासाठी ज्ञानसाधना कॉलेज येथे केलेल्या भुयारी मार्गाच्या धरतीवर लुईसवाडी ते धर्मवीर मार्ग पाचपाखाडी येथे नवीन भुयारी मार्गाची निर्मिती करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी एम एम आर डी ए आयुक्तांकडे यावेळी केली.


*मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली कामाची स्थिती (एकूण ६५.३२% काम पूर्ण)*
*पॅकेज क्रमांक ८ - भक्ती पार्क ते अमर महल*
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके - भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टी टी, अनिक नगर बस डेपो, सिद्धार्थ कॉलनी
कामाची स्थिती - ४६.५३%
*पॅकेज क्रमांक 9- गरोडिया नगर ते सूर्या नगर*
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सुर्यानगर
कामाची स्थिती - ८७.८१ %
*पॅकेज क्रमांक १०- गांधिनगर ते सोनापूर*
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गांधिनगर, नवल हाऊसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शंग्रीला, सोनापूर
कामाची स्थिती - ५४%
*पॅकेज क्रमांक ११- मुलुंड ते माजिवडा*
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका स्टेशन, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा
कामाची स्थिती – ९०.९८%
*पॅकेज क्रमांक १२- कापूरबावडी ते कासारवडवली*
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- कापूरबावडी, मानपाडा, टीकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली
कामाची स्थिती - ५५.३८ %
*मेट्रो मार्ग क्रमांक ४A कासारवडवली ते गायमुख*
भाग क्रमांक १- कासारवडवली ते गायमुख
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गोवनी पाडा ,गायमुख
कामाची स्थिती - ६७.३१%

अंतर्गत मेट्रोसाठी महापालिकेने १० हजार ४१२.६१ कोटी इतक्या रकमेचा डीपीआर तयार असून तो आपल्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु अद्याप केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने अंतर्गत मेट्रो प्रकल्प रखडला आहे.

*मेट्रो मार्ग क्रमांक १० गायमुख ते मीरा भाईंदर*

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्ग क्र ९ व ठाणे मेट्रो ४ ए याला जोडण्यासाठी या मेट्रो मार्ग क्र १० गायमुख ते मीरा भाईंदर यालाही जोडण्यासाठी सर्वात पहिली मागणी करण्यात आली होती. या मेट्रो मार्गालाही राज्य शासनाची ०६ सप्टेंबर २०१९ रोजी ४ हजार ४७६ कोटीची मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, अमर मेहल, शिवाजी चौक काशिमिरा या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अद्याप केंद्र शासनाची परवानगी मिळालेली नाही.

*मेट्रो मार्ग क्रमांक ५ कापुरबावडी, ठाणे ते भिवंडी*

याचे काम प्रगतीपथावर सुरु असून ८४.१३% काम पूर्ण झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com