Top Post Ad

इंडिया अलायन्सची महासभा मुंबईत शिवाजी पार्कवर संपन्न

 


 भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तसेच  इंडिया अलायन्सची महासभा मुंबईत शिवाजी पार्कवर संपन्न झाली.  या सभेसाठी काँग्रेस नेते राहूल गांधींसह सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा,  शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरजेडीचे तेजस्वी यादव, जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य,  वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर आणि इंडिया अलायन्सचे इतर नेते उपस्थित होते.  

आमची लढाई भाजपविरुद्ध नाही, नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध देखील नाही. पण त्याच्या मागील शक्तीविरुद्ध आहे. राजाचा जीव इव्हीएममध्ये आहे. त्याचा जीव ईडीमध्ये आहे, सीबीआयमध्ये आहे,  नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोग मशिन का दाखवत नाही? ईव्हीएमच्या कागदाची मोजणी करण्यास सरकार तयार नाही,  जेव्हा चीनला फायदा होतो, तेव्हा इथल्या करोडपतींना लाभ होतो. मोदींकडे भ्रष्टाचार नावाची मोनोपॉली आहे. आज देशातील प्रमुख मीडियासह सोशल मीडियावरही या शक्तीचे कंट्रोल आहे. अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव टाकला जातोय आहे. आज आम्ही विविध पक्षातील नेते एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व एका पक्षाविरोधात किंवा नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तिविरोधात लढत आहोत. काँग्रेसचा एक बडा नेता माझ्या आईसमोर ढसाढसा रडला. माझी या शक्तीविरुद्ध लढण्याची ताकद नाही, मला जेलमध्ये जायचं नाहीये, असं त्या नेत्याने सांगितलं. जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवून लोकांना धमकवलं जातंय,   हे एकच नाहीत, तर अशाप्रकारे हजारो लोकांना घाबरवले गेले आहे. शिवसेना, राष्ट्रवादीतील लोकही अशाचप्रकारे भाजपात गेले आहेत.  पण मला विश्वास आहे, 'आप नफरत के बाजार मैं मोहोब्बत की दुकान खोलेंगे',  गेल्यावर्षी आम्ही कन्याकुमारीपासून यात्रेची सुरुवात केली. नंतर आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा करावी लागली. या यात्रेत अनेक दिग्गज नेत्यांनी समाभाग नोंदवला. त्यामुळे ही फक्त राहुल गांधीची एकट्याची यात्रा नव्हती,  , -राहुल गांधी 

 भाजप ४०० पार म्हणतात हे काय फर्निचरचे दुकान आहे का?,  मोदींच्या कुटुंबात ते आणि त्यांची खुर्चीच आहे. तोच मोदींचा परिवार आहे. घटना बदलण्यासाठी भाजपला ४०० पार हवे आहेत, पण सगळे एकवटतात तेव्हा हुकशाहीचा अंत होतो. हातात मशाल घेऊन आम्ही रणशिंग फुंकले आहे.  भाजपच्या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं, नि आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय. गांधीजींनी मुंबईतून इंग्रजांना ‘चले जाओ’ सांगितलं होतं, आता लोकशाही मारण्यासाठी टपलेल्या हुकूमशाहीला तडीपार करण्यासाठी ‘शिवाजी पार्क’ निवडलेलं आहे. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू. व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे, देशाची ओळख ही एक व्यक्ती होता कामा नये, अबकी बार भाजप तडीपार - उद्धव ठाकरे 

देशात परिवर्तनाची गरज आहे, देशात दुही माजवणाऱ्या लोकांना सत्तेतून हाकलावे लागेल. मोदींनी दिलेली गॅरंटी ही कधीच पूर्ण न होणारी आहे. मोदींची गॅरंटी चालणार नाही .  देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व सामाजिक घटकांचा हिरमोड केलाय. तुम्हाला त्यांच्याकरून केवळ आश्वासने दिलं जातील, पण तुम्ही बळी पडू नका. आजपर्यंत तुम्हाला खूप आश्वसने दिली गेली आहेत. याच मुंबईतून महात्मा गांधींनी चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होतं. पण आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ आलीये, भारताच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. - शरद पवार

महाराष्ट्रात लिडर नाहीत तर डीलर आहेत. घाबरलेले लोक गेले त्याने काही फरक पडत नाही,  महाराष्ट्रात फक्त आमदार पळवून नेलंय, पण बिहारमध्ये आमच्या चाचाला पळवून नेलंय. माझे काका पुन्हा पलटणार नाहीत याची मोदींनी गॅरंटी द्यावी,  भाजपच्या लोकांना शेण पण हलवा म्हणून खायला घालतात. मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी आहे. आम्ही राहुल गांधींचे आभार मानतो की त्यांनी देशभर प्रवास केला आणि आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा संदेश देण्याचे काम केले. आज एकीकडे द्वेष पसरवला जात आहे, जिथे संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. दुसरीकडे राहुल गांधींनी सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, द्वेषाचा पराभव करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली. मी त्यांचे आभार मानतो, -  तेजस्वी यादव 

हा भारत आहे आज मी पाहतेय की इथे वेगवेगळ्या विचारांचे आणि विचारांचे लोक जमले आहेत.  निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि संविधानाचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे तुमचे मत, त्याचा वापर तुम्ही योग्यरित्या कराल, यावर माझा विश्वास आहे, - मेहबुबा मुफ्ती 

 ईव्हीएम मशिन अमेरिकेतून येते पण त्यातील चिप २० ते २५ रुपयाला बाजारात विकत मिळतात. ईव्हीएम चौकशीसाठी सर्वांना लढावं लागेल. राहुल गांधींनी पुढाकर घेतला तर आम्ही लढायला तयार आहोत,  आपल्या सर्वांना लढावं लागेल. एकत्र लढू किंवा वेगळं लढू, पण आपल्याला लढावं लागणार आहे,   अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहीजे. मोदींचा देश परिवार आहे असे म्हणतात पण त्यांचा परिवारातील व्यक्ती त्यांच्यासोबत राहत नाहीत. मोदींनी त्यांच्यासोबत राहायला हवं. कारण ही आपली संस्कृती आहे. आरएसएसने याबाबत सांगितले आहे..  - प्रकाश आंबेडकर 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील येणार होते. मात्र, ते येऊ न शकल्याने त्यांनी राहुल गांधी यांना पत्राद्वारे संदेश दिला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, आज मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत आहे. असा प्रवास करू शकणारे फार कमी लोक असतात. राहुल गांधी तुमच्या संकल्पासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भाजप सरकारच्या अपयशामुळे धगधगत असलेल्या मणिपूरपासून तुम्ही या प्रवासाला सुरुवात केली. ईशान्येतून तुम्ही हुकूमशाही सरकारविरोधात जोरदार संदेश दिला. या संपूर्ण प्रवासात तुम्ही शेतकरी, तरुण, महिला, ज्येष्ठांसह समाजातील प्रत्येक घटकाला भेटला आहात, त्यांच्या समस्या तुम्ही मांडल्या. तसेच निवडणूक आयोगाने काल निवडणुका जाहीर केल्या, २० मार्चपासून उत्तर प्रदेशमध्ये नामांकन सुरू होत आहे, त्याच तयारीमुळे मी यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. शेतकरी, तरुण, मागास, दलित आणि महिला विरोधी असलेल्या भाजपला जनता या निवडणुकीत उखडून टाकेल, अशी आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल यातच या यात्रेचे खरे यश असेल, असेही अखिलेश यादव यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com