जेएनयुमध्ये एबीव्हीपीचे सघी गुंडे जिंकले तर विद्यापीठात रोजच मणिपूर घडेल....! समाजवादी छात्र संघाच्या आराधना यादव यांचा इशारा...
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संचाच्या निवडणूकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गुंड निवडूण आले तर विद्यापीठाच्या परिसरात रोजच मणिपूरसारख्या घटना घडतील. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सुरक्षित राहणार नाहीत, असा इशारा समाजवादी छात्र संघाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आराधना यादव यांनी आज विद्यापीठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रेसिंडेशियल डिबेटच्या वेळी बोलताना केला. संघ, भाजप, मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार हमला केला. यावेळी आराधना यादवने शेती मालाला हमी भाव मिळण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला. हा देश तोडण्यासाठी, या देशाच्या धर्म निरपेक्ष व्यवस्थेला व संविधानाला संपविण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून जमा केलेल्या निधीचा वापर संघोटे करीत आहेत, असा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
देशातील प्रत्येक निवडणुक ही पिछडे, दलित अन् अल्पसंख्यांक यांच्या न्याय, हक्क अन् अधिकारांचे रक्षण, संरक्षण करण्यासाठीच होत आहेत. अन् भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतांचा अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा योग्य तोच वापर करून लोकशाही, संविधान व देश वाचविण्यासाठी वापर केला पाहिजे, हे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. जे एन यू ची निवडणूक ही तितकीच महत्त्वाची आहे. जितकी लोकसभेची निवडणूक. नॉलेज ऑफ इंडिया अशी जगभरात ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाची निवडणूक उद्या २२ मार्च रोजी होत असून देश व संविधान विरोधी देशद्रोही संघ व भाजपप्रेणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दारूण पराभव होणार आहे. आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने या देशद्रोही शक्तींनी मतदार असलेल्या विद्यार्थ्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
आज जे एन यू विद्यार्थी संघाची निवडणूक होत असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेली ही निवडणूक अतिशय महत्त्वाची अन् देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. या निवडणुकीतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव म्हणजे लोकसभा निवडणुकीतील भाजप व त्याचा रिमोट कंट्रोल असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव ठरणार आहे. बाकी आजची रात्र ही वैऱ्याची आहे. समाजवादी छात्र संचाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आराधना यादव म्हणत्यात त्या प्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघीं गुंड निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही गैर मार्गाचा अवलंब करू शकतात. जसे मोदी अन् शहा करीत आलेले आहेत.
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0 टिप्पण्या