Top Post Ad

रिपब्लिकन पक्ष खोरिपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार , -मा. आमदार उपेन्द्र शेंडे

 


 देशात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच सरकार आल्यास लोकशाही संपुष्टात येईल असे असताना भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली आहे मात्र राज्यातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना भाजपला रोखण्याची इच्छा आहे काय? असा प्रश्न रिपब्लिकन पक्ष खोरिपा राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेेंद्र शेंडे यांनी उपस्थित केला आहे काही महिन्यांपासून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना रिपब्लिकन पक्ष खोरिपाच्या वतीने प्रत्यक्ष भेटून इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र ह्या नेत्यांना रिपब्लिकन पक्ष खोरिपा ला इंडिया आघाडीचा घटक करून घेण्याची आवश्यकता नाही असे दिसून येत आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्ष खोरिपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे

रिपब्लिकन पक्ष खोरिपा राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची  बैठक संपन्न झाली यावेळी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चर्चा झाली यावेळी आंबेडकरी चळवळीतील इतर पक्ष संघटना,दलित, आदिवासी,ओ बी सी, समाजाच्या विविध पक्ष संघटनांना एकत्र करून आघाडी करून निवडणूक लढवायची असल्याची माहिती भाऊ निरभवणे यांनी दिली आहे

राज्यातील नागपूर, रामटेक, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, बीड, संभाजी नगर, धुळे, जळगाव, पुणे, नाशिक, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, इशान्य मुंबई, ठाणे, कल्याण आदी विविध मतदार संघात रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे उमेदवार निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याव्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांत सुद्धा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज केले असल्याचेही  भाऊ निरभवणे यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com