Top Post Ad

धारावीतील कामराज मेमोरियल इंग्लिश हायस्कूलच्या कॅन्टीन मधून विद्यार्थ्यांना विषबाधा

 :

धारावीतील ९०फिट रोड येथील कामराज मेमोरियल इंग्लिश हायस्कूल जुनियर कॉलेजच्या कॅन्टीन मधून विद्यार्थ्यांना  अन्नातून विषबाधा झाल्याची घटना  आज २० मार्च रोजी    घडली आहे. 35 ते 40 विद्यार्थ्यांना या विषबाधेचा त्रास झाला असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवराम कासारे यांनी माहिती दिली. 
रमजानचा महिना असल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांना कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी पैसे दिले होते. दुपारच्या सुमारास या विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधले पदार्थ खाल्ले असता त्यांना उलट्या होऊ लागल्या.  याबाबत संबंधितांनी माहिती घेतली असता जेवणामध्ये पाल पडली असल्याचे समजले.    तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर येणे, ताप येत असून शेजारील खाजगी दवाखाना आयुष हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत आहे. तर काहींनी इतर रुग्णालयातून धाव घेतली. घटनास्थळी शाहूनगर पोलीस स्टेशनचे पथक तसेच सायन हॉस्पिटलचे डॉक्टर रुग्णवाहिकेसह या ठिकाणी आले. उर्वरित विद्यार्थ्यांवर देखील उपचार सुरू आहेत. शाहूनगर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी शाळेमध्ये येऊन याबाबत चौकशी केली. मात्र फूड पॉयझन बाबत कोणतीही अधिकृत माहिती आम्ही देऊ शकत नाही असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या सर्व प्रकाराबाबत शाळेने कोणतीही प्रतिक्रिया अथवा जबाब नोंदवला नाही. शाळेचे चेअरमन सायमन यांनी चुप्पी साधली आहे. 

कामराज  मेमोरियल इंग्लिश हायस्कूल  शाळेची कॅन्टीन सायमन नावाचा  व्यक्ती चालवत आहे. शाळेच्या समोरच त्याचे हॉटेल देखील आहे. सदर कॅन्टीन चालक हा शाळेच्या ट्रस्टी असलेल्या नाडार समाजाचा असल्यामुळे त्याला ही कॅन्टींन चालवण्यास दिली असल्याचे समजते.  दोन वर्षा अगोदरही असाच प्रकारचा प्रकार घडला होता. त्यावेळी देखील संबंधित शाळेने या प्रकरणावर पडदा टाकला होता. आणि त्याच व्यक्तीला पुन्हा कॅन्टींन चालवायला दिली आहे. याबाबत लवकरच शाळेला जाब विचारण्यात येईल असे यावेळी उपस्थित मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com