Top Post Ad

तीन नेते व तीन पत्रकारांनी लावले सत्ताधाऱ्यांच्या स्वप्न व अजेंड्याला सुरुंग.....!


 अखिलेश यादव, तेजस्वी यादव व अरविंद केजरीवाल हे तीन नेता. अन् पुण्यप्रसून वाजपेयी, अभिसार शर्मा व रवीश कुमार हे तीन पत्रकार देशभरातील लाखो संघोटे, तितकेच भाजपाई, दंगाई, गोदी - मोदी मिडिया, चवान्नी फेम अंधभक्त यांच्यावर भारी पडताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर न्यायालयातील लढाईत स्वतः केजरीवाल व त्यांच्या वकिलांनी भाजपच्या भ्रष्ट्राचाराची लक्तरे वेशीवर टांगली, तर न्यायालयाच्या बाहेर या तीन पत्रकारांनी सोशल मिडियावरून तेच काम केले. अन अखिलेश यादव अन् तेजस्वी यादव जनतेच्या न्यायालयात संघ अन् भाजपला देश, संविधान व जनविरोधी ठरविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत. संविधान बदलण्याच्या, हिन्दु राष्ट्र निर्मितीच्या संघाच्या अजेंड्याला व स्वप्नाला या सहा जणांनी चोहो बाजूने सुरुंग लावले आहेत.

हर हर मोदी, घर घर मोदी, आता हा नारा जसाच्या तसा दिला जाणार नाहीतर , चंदा चोर ???? ,  हर हर फेकुचंद ????, असा नारा दिला जाईल.  चोर ही प्रतिमा बनविण्यात विरोधकांना यश आले असून या यशाचे खरे मानकरी हे सहाजण आहेत. देश व संविधानाची लढाई याच सहाजणांच्या खांद्यावर असून RSS व भाजप विरोधातील या लढाईत जिंकण्याची उमीद व प्रेरणा याच सहाजणांकडून मिळत आहे.     ईडी, सीबीआयच्या नोटीसा सोबत भाजपकडून एक तहनामा येतो. वॉशिंग मशीनमध्ये जायचे की जेलमध्ये ? यावर भ्रष्टाचारी नेते वॉशिंग मशीनचा पर्याय निवडत होते. पण हा प्रयोग अखिलेश यादव, तेजस्वी यादव व महराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यावर करताना भाजपला खूप विचार करावा लागतो. कारण या नेत्यांची लोकप्रियता अफाट आहे . त्यांना अटक केली तर त्यानंतर उसळणाऱ्या  लाटेत RSSची सारी स्वप्न व अजेंडा वाहून जाईल, अशी भीती भाजपला होती अन् आज ही आहे.  त्याची टेस्ट म्हणून अरविंद केजरीवाल यांना अटक केली अन् भाजपला वाटणारी भीती खरी ठरली.

 केजरीवाल यांच्या अटकेसोबत दिल्लीतील शराब भ्रष्ट्राचारावर न्यायालयात सुनावणी सुरु झाली अन ईडीने माफीचे साक्षदार म्हणून उभे केलेले साक्षीदार भाजपला इलेक्ट्रोरल बाँडच्या माध्यमातून चंदा देणारे असल्याचे केजरीवालने उघड केले. इलेक्ट्रोरल बॉण्ड हा देशातील सर्वांत मोठा भ्रष्ट्राचार असल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी न्यायालयात आपली बाजू मांडण्याची संधी मिळताच केजरीवाल यांनी केली अन् भाजपची पंचायत झाली.  केजरीवाल यांच्या अटकेनंतर जगभरातून भाजप सरकारवर टीका होत आहे. हे अटक सत्र पुढे चालू ठेवले तर जगभराचा रोष ओढवून घेतला जाईल. त्यामुळे आणखी बदनामी होईल. इलेक्ट्रोरल बॉण्डनंतर भाजपच्या समर्थकांमध्ये ही चलबिचल सुरु झाली असून अभिसर शर्मा, पुण्यप्रसून वाजपेयी अन् रविशकुमार यांनी मोर्चा सांभाळत या प्रकरणी भाजपला उघडे पाडण्याचा सारा इंतजाम केला आहे.

  • राहुल गायकवाड,
  • महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com