Top Post Ad

पियुष गोयल जाहीर माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन करु- सुरेशचंद्र राजहंस


  • मुंबईच्या झोपडपट्टीतील कष्टकरी गरीब कुटुंबांना हद्दपार करण्याचा भाजपाचा आणखी एक डाव - प्रा. वर्षाताई गायकवाड
  • उत्तर मुंबईतील झोपडपट्टीवासींना मीठागराच्या जागेवर पाठवण्याचा भाजपाचा अजेंडा गरिबांची थट्टा करणारा.
  • भारतीय जनता पक्षाचे धोरण गरिबी हटाव नसून गरीब हटाव.
  • झोपडपट्टीवासीयांबदद्लचे पियुष गोयल यांचे विधान निषेधार्ह, जाहीर माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन करु: सुरेशचंद्र राजहंस

केंद्रीय मंत्री व भाजपाचे उत्तर मुंबईचे लोकसभा उमेदवार पियुष गोयल यांचे मुंबईतील झोपडपट्टी हटवून गरिब, कष्टकरी लोकांना मीठागराच्या जागेवर पाठवणार असल्याचे विधान भाजपाची गरिबांबद्दलची मानसिकता दर्शवते. धारावीतील स्थानिकांना बेघर करण्याचा मोदानीचा प्रयत्न सुरु असताना आता उत्तर मुंबईच्या झोपडपट्टीतील कष्टकरी, गरीब कुटुंबांनाही हद्दपार करण्याचा भाजपाचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.

मुंबई काँग्रेसचे कार्यालय, राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईच्या उभारणीत इथल्या श्रमिक, कष्टकऱ्यांचा मोठा सहभाग आहे, मुंबईतील 65 टक्के लोक हे झोपडपट्ट्या आणि चाळीत रहातात, त्यांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेसने सातत्याने धोरणे आखली आहेत. झोपडपट्ट्यांच्या जागीच पुनर्वसन करण्याचा नियम असताना पियुष गोयल झोपडीवासियांना मिठागरांकडे हाकलणारे कोण आहेत? झोपडीवासियांचा हक्क नाकारण्याची ही झुंडशाही आम्ही चालू देणार नाही. झोपडपट्ट्या बाहेर हाकला, चाळीतील लोक बाहेर काढा ही भाजपाची कपट निती आहे. झोपडपट्टीत रहाणाऱ्यांना अशा पद्धतीने इकडून तिकडे हलवायला ते गुरांचे गोठे नाहीत. धारावीतील जनतेला मुलुंड येथे हद्दपार करत आहेत परंतु पियुष गोयल आणि भाजपालाच लोक लोकसभा निवडणुकीत हद्दपार केल्यावाचून रहाणार नाहीत. भाजपाचे धोरण गरिबी हटाव नसून गरीब हटाव असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. गरिबांचे हक्क हिसकावून आपल्या श्रीमंत मित्रांच्या झोळीत भर घालण्याचे भाजपाने मागील १० वर्षात केले आहे. झोपडीवासियांबद्दल भाजपा आणि पियुष गोयल यांच्या तिरस्काराचा मुंबई काँग्रेस जाहीर निषेध करीत आहे.

भाजपा नेते पियुष गोयल यांचे विधान मनुवादी मानसिकतेचे असून त्यांचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे, ही मानसिकता गरिबांना सन्मानाने जगू देणारी नाही. लोकसभा निवडणुकीत ही गरिब जनताच पियुष गोयल व भाजपाचा पराभव करुन त्यांची जागा दाखवून देईल. गोयल यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मुंबई काँग्रेस स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.


लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची जय्यत तयारी सुरु असून निवडणुकीसाठी विविध विभागांची आवश्यकता असते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मीडिया आणि कम्युनिकेशन कमिटी जाहीर झाली असून या कमिटीत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व मुंबई विभागीय काँग्रेसच्या स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांची सदस्यपदी वर्णी लागली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जाहीर केलेल्या या कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत तर सुरेशचंद्र राजहंस यांच्यासह १८ जणांची सदस्य म्हणून वर्णी लागलेली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षाताई गायकवाड यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करेन तसेच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा एक शिपाई म्हणून नेहमीच तत्परतेने काम करत राहिन, असा विश्वास सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com