Top Post Ad

प्रियंका निकम एम ए पाली आणि बुध्दीझम या विषयांत फर्स्ट रँक मध्ये उतीर्ण

 


आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तसेच कोविड काळात गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारे  भीमराव निकम-चिलगावकर यांची ज्येष्ठ कन्या  प्रियंका निकम एम ए पाली आणि बुध्दीझम या विषयांत फर्स्ट रँक मध्ये उतीर्ण झाल्याने तीचे सर्वत्र कुतूहल होत आहे.  जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे इंदीराबाउ ललवाणी  महाविद्यालयांतून १२वी सायन्स उतीर्ण होवून  २००९ मध्ये मालेगाव, जि.नाशिक उत्तर महाराष्ट विद्यापीठातून डीएड ७९ टक्के मार्कांनी पास, २०१३मध्ये यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए द्वीतीय श्रेणी मध्ये ,२०१६ या वर्षात मुंबई विद्यापीठातून एमए सेकंड क्लास,तर २०२१ मध्ये एमएसडब्ल्यु ही पदवी टिळक महाराष्ट विद्यापीठ पुणे येथून ७१ टक्के मार्कांनी उत्तीर्ण,आणि आता नुकतीच  २०२४ मध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील मिलींद महाविद्यालय संभाजीनगर येथून पर्सिंग एमए (पाली आणि बुध्दिझममध्ये) फर्स्टइयर, फर्स्ट सेमिस्टर ७८ टक्के गूण प्राप्त करून फर्स्ट रँक मध्ये पास झाली आहे, महत्त्वाची बाब म्हणजे प्रियंकांच्या आईचे कोरोना जागतीक महामारीच्या संकटकाळात १६ एप्रिल २०२१ मध्ये निधन झाले, तरीही या परीवाराने आपल्या मातेचे दुख: शिरावर ठेवून, पचवून आपल्या आई वडीलांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण केले आणि यश संपादन केले याबाबत सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.  

विशेष वाखाण्यासारखे म्हणजे, प्रियंकाने या सर्व ४ ते ५ पदव्या विवाह झाल्यानंतरच अहोरात्र अभ्यास करून प्रचंड मेहनत घेवून   प्राप्त  केल्या आहेत. अर्थात, तिचे पती सचिन गायकवाड यांचा भक्कम पाठींबा, प्रोत्साहन आणि तनमनधनाच्या पतीच्या सहकार्यामुळेच तिला या इथपर्यंतच्या यशाचे शिखर गाठणे तिला शक्य झाले आहे. तिने फर्स्ट रँक मधून हे घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिच्या  नातेवाईंकांत, तिच्या मित्रमंडळींकडून प्रियंकावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.  प्रियंका निकम दि नोबल पथ फाऊंडेशन (रजि.) सामाजिक, विधायक व सेवाभावी संस्थेत कार्यरत आहेत. आरटीई (शिक्षण हक्क कायदा) या कायद्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील आर्थिक, दुर्बल घटकांच्या आजतागायत शेकडो मुलांना नामांकीत शाळांमधून प्रवेश मिळवून देण्याचे काम अविरत व सातत्याने करत आहे. 

प्रियंका निकम ही बहुजन संग्राम या संघटनेचे महाराष्टाचे अध्यक्ष व "वृत्तदर्शन मिडीया" या राज्यस्तरीय  वृत्तसंस्थेचे संपादक भीमराव निकम-चिलगावकर यांची ज्येष्ठ कन्या आहे." प्रियंकाला दोन भाऊ व एक बहीण आहे. तिच्या पाठचा भाऊ राहूल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर येथे बीई सिव्हील इंजिनियरींगच्या  शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असून बहीण सूप्रिया ही कल्याण येथील प्रख्यात व नामांकीत  बिर्ला महाविद्यालयात एम कॉमच्या फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट क्लास मध्ये उतीर्ण झाली  आहे, तर सर्वात लहान भाऊ राजरत्न हा खा,शरद पवार यांच्या माळेगांव साखरखान्याच्या, बारामती येथील इंजिनियरींग महाविद्यालयांतून बी ई सिव्हील ही पदवी  डिस्टींक्शन मधून उत्तीर्ण झाला असून त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. 

बाशी कुशीचं खाणारे, झाले न्यायदान देणारे, एका पाटलाला भिणारे, झाले डिएसपी होणारे. या नेमक्या आणि परीणामकारक शब्दात ही सारी "भीमरायाची कमाई" आंबेडकरी चळवळीतले प्रख्यात कवी-गायक प्रतापसिंग बोदडे यांनी सांगीतली आहे. ही कमाई सारी माझ्या भीमाची, अस म्हणताना हीच कमाई जगात ठरली पहील्या क्रमाची असेही ते छातीठोकपणे सांगून टाकतात. त्याचाच प्रत्यय प्रियंका निकमने दिला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला "सुशिक्षित बना"चा संदेश पूर्णपणेअंमलात आणण्याचा ध्यासच प्रियंकाने घेतलेला आहे. - भीमराव चिलगावकर (प्रियंकाचे वडील)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com