ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांची बदल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. मुंबई सेट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ हे नाव ठेवण्यात यावं असा प्रस्ताव केंद्राला देण्यात आला आहे. किंग्ज सर्कलचं तिर्थकर पार्श्वनाथ करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई सेंट्रल, मरीनलाईन्स, डॉकयार्ड स्टेशनची नावे बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याशिवाय करीरोड, सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड, चर्नीरोड आणि कॉटनग्रीन या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंदर्भात देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर होईल, असंही राहुल शेवाशे यांनी सांगितलं आहे. ज्या-ज्या मागण्या आल्या आहेत, त्यानुसार ती नावांची बदल करण्यात येईल, असं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, करीरोड स्टेशनचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनचं नाव डोंगरी, मरीनलाईन्स स्टेशनचं नाव मुंबादेवी, डॉकयार्ड स्टेशनचं नाव माझगाव स्टेशन, चर्नीरोड स्टेशनचं नाव गिरगाव, कॉटनग्रीन स्टेशनचं नाव काळाचौकी या नव्या नावांचा प्रस्ताव आहे.
'मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करा,' यासाठी आंबेडकरी जनता गेल्या काही वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. मात्र याकडे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याची बाब यावेळी निदर्शनास आली आहे. दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का दिलं जात नाही, असा प्रश्न आंबेडकरी जनतेने उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक स्टेशनची नावे बदलण्याचा प्रस्ताव केंद्राकडे देण्यात येणार असल्याचे कळते यामध्ये दादर चे नामांतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याबाबत मात्र कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही.
0 टिप्पण्या