Top Post Ad

लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी चलो दिल्ली...

 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने गुरुवारी अटक केली. त्यानंतर, आम आदमी पक्षाकडून सातत्याने आंदोलने, निदर्शने करण्यात येत आहेत.  इंडिया ब्लॉक पक्षांनी  केजरीवाल यांच्या बेकायदेशीर आणि अन्यायकारक  अटकेच्या निषेधार्थ आज मुंबईतील आझाद मैदानावर संयुक्त 'सत्याग्रह' आयोजित केला.  भाजपचा दारुण पराभव करा आणि मोदींच्या जुलमी राजवटीचा अंत करा असे आवाहन केले.' मोदी सरकारच्या जुलमी कारभाराविरुद्ध त्यांच्या एकत्रित संघर्षासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, भाई जगताप एम.एल.सी. - काँग्रेस, राखी जाधव - मुंबई अध्यक्ष, एन.सी.पी. (एस.सी.पी.), प्रीती शर्मा मेनन - मुंबई अध्यक्षा, आम आदमी पार्टी, विद्या चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस (एस.सी.पी.), शैलेंद्र कांबळे - सी.पी.आय.(एम.), साम्या कोरडे - शे.का.प. आणि इंडिया ब्लॉक पक्षांचे इतर काही नेते सत्याग्रहात उपस्थित होते.

"तुरुंगात असलेले मनीष सिसोदिया नाहीत, तर तुरुंगात असलेले भारतातील शिक्षण आहे. तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन नाहीत, तर भारतातील आरोग्यसेवा आहे आणि अरविंद केजरीवाल तुरुंगात नाहीत, तर तुरुंगात भारताची आशा आहे.  हे अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पार्टी विषयी नाही, खरंतर हे भारतातील लोक विरुद्ध अत्याचारी नरेंद्र मोदी आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेने भारतीय जनता खवळली आहे. इंडिया ब्लॉक पक्ष एकजुटीने भाजपचा पराभव करतील आणि मोदींच्या जुलमी राजवटीचा अंत करतील. आम्ही आमचा देश वाचवू, आम्ही आमचे संविधान वाचवू. आम्ही विजयी होऊ.", असे आम आदमी पार्टीचे मुंबई अध्यक्षा, प्रीती शर्मा मेनन म्हणाले.

 लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी चलो दिल्ली... 
केजरीवाल यांच्या अटकेविरोधात राष्ट्रीय राजधानीच्या प्रतिष्ठित रामलीला मैदानावर आम आदमी पार्टी (आप) आणि INDIA ब्लॉकचे सहयोगी 'महा रॅली' काढणार आहेत  देशात घडत असलेल्या घटनांविरोधात ही महासभा होणार असून, त्यात ‘इंडिया’चे सर्व नेते सहभागी होणार आहेत. देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही व देशाच्या हिताची सुरक्षा करण्यासाठी ही महासभा होईल देशातील लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी रामलीला मैदानावर महासभा होणार असल्याची माहिती आप ने दिली आहे. 

केवळ अरविंद केजरीवाल यांचा प्रश्न नाही. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. ‘इंडिया’तील नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दिल्लीचे रुपांतर किल्ल्यात केले आहे. आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांना अटक करण्यात येत आहे. केजरीवाल यांच्या कुटुंबालाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आमच्या पक्षाचे कार्यालयही सील करण्यात आले आहे. भाजप भ्रष्टाचाराचे कारण देत आहे, पण या प्रकरणांमधील व्यवहारांची साखळी काढता आलेली नाही,’ असा आरोप आप चे दिल्लीचे मंत्री गोपाल राय  यांनी केला.

दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी रामलीला मैदानाला ‘ऐतिहासिक ठिकाण’ म्हटले आहे. देशातील सर्वात मोठ्या क्रांतीची सुरुवात रामलीला मैदानापासून झाली. 1965 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना 'जय जवान जय किसान' ही प्रसिद्ध घोषणा दिली होती. रामलीला मैदानावर पहिला निषेध 1975 मध्ये झाला जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी प्रमुख विरोधी नेत्यांसह, 25 जून रोजी एक लाखाहून अधिक लोकांसह एक विशाल रॅली संबोधित केली. इंदिरा गांधींच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 1977 मध्ये भारतात आणीबाणी हटवल्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. फेब्रुवारी 1977 मध्ये रामलीला मैदानावर संयुक्त रॅली आयोजित करण्यात आली होती आणि त्याचे नेतृत्व अनेक विरोधी नेते जगजीवन राम, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, चरणसिंग आणि चंद्र शेखर यांनी केले होते.  अलिकडच्या काळात येथूनच अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले आणि अरविंद केजरीवाल यांनी 2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com