देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय संविधानाने बहाल केलेली लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातूनच टिकून आहे. याकरिता प्रत्येकाला या निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे विद्यमान लोकसभेत आपले प्रतिनिधी पाठवण्याकरिता अनेक पक्ष या गुंतले आहेत. शेतकरी शेतमजूर बहुजन सारे एक होऊ या, देशाची सत्ता आपल्या हाती घेऊ या असा नारा देत राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी देखील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. महाराष्ट्रात अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहिर करण्यास सुरुवात केली असतानाच राष्ट्रीय किसान बहुजन पक्षाने देखील आपले उमेदवार जाहिर केले आहेत.
- अरुण भाऊराव निटुरे- कल्याण
- अर्जुनराव भगवाराव गालफाडे- छत्रपती संभाजीनगर
- मारोतराव गणपतराव गोरलेवार- नागपुर
- अमित लक्ष्मणराव इंगळे- रामटेक
- चंद्रशेखर नामदेवराव भोंडवे- गडचिरोली
- सौ. अनिता थुल- चंद्रपूर
- नदीम अहमद जावेद अहमद- धुळे
- शालीग्राम बनसोडे- नाशिक
- कन्नूभाई वाळा- ठाणे
- परमेश्वर माधवराव सोळंके- परभणी
- हेमंत राधाकिशन कनाके- हिंगोली
आम्ही राजकारणात भले नवखे असू पण मागील अनेक वर्षापासून आम्ही समाजकारण करीत आहोत. अनेक आंदोलने, मोर्चे काढली. जनतेच्या दैनंदिन गरजा त्यांच्या मागण्यांकरिता सातत्याने शासनाशी भांडत आहोत. मात्र प्रत्येक वेळी शासनाने केवळ आमची उपेक्षाच केली. तेव्हा आम्ही ठरवले आहे की हे शासनच आता ताब्यात घ्यायचे. आमच्या मागण्या आमचे प्रश्न आम्हीच सोडवणार. याकरिता आमचा पक्ष प्रयत्नांची पराकाष्टा करणार. भले आम्ही राजकारणात नवीन असून पण समाजकारणाच्या माध्यमातून आमचा सर्व सामान्य जनतेशी चांगला संपर्क राहिला आहे. तेव्हा त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत नक्कीच होईल - अरुण भाऊराव निटुरे
0 टिप्पण्या