Top Post Ad

भारतीय सैनिक शेतकऱ्यांसह येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सक्षम पर्याय उभा करणार

  लोकसभा २०२४ निवडणुकीची घोषणा झाली आहे. प्रत्येक पक्ष आपआपले उमेदवार जाहीर करीत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीला काही वेळ असला तरी महाराष्ट्रात अनेक आघाड्यांनी तिसरा पर्याय देण्याचा चंग बांधला आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी सर्व सामान्य जनतेपासून ते शेतकरीवर्ग आणि सैनिकांनाही वेठीस धरले आहे. यासाठी सेवानिवृत्त सैनिकांनी आपल्या हक्काच्या पक्षाची घोषणा केली आहे. सर्व सैनिकांनी शेतकऱ्यांसह स्थापन केलेला भारतीय जवान किसान पक्ष  येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुक रिंगणात उतरला आहे. सैनिक आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देत संपूर्ण भारतात आपले उमेदवार उभे करणार असून महाराष्ट्रातही ४८ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या उमेदवारांविषयी आणि येणाऱ्या निवडणुकीतील पक्षाच्या भूमिकेविषयीची माहितीबाबत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला,

रात्र आणि दिवस मेहनत करून टॅक्स भरायचा आणि त्या टॅक्स वर या नेत्यांनी फुकट पेन्शन घ्यायचे, जनतेच्या कष्टाच्या पैशावर मौजमजा करायची, देश-विदेश यात्रा करायच्या. सर्व सामान्य जनतेने मात्र कर्जाच्या ओझ्याखाली मरायचे. मागच्या चाळीस वर्षात वडिलोपार्जित जमिनी आम्हाला विकाव्या लागल्या मात्र राज्यकर्त्यांच्या मालमत्तेत  हजारो पटीने वाढ होत आहे. ७६ वर्ष झाली राज्यकर्ते मुखवटे बदलतात पण जनतेला लुटण्याचे काम मात्र करतात. मग त्यांनाच पुन्हा पुन्हा मतदान का करायचे. तेव्हा एक वेळेस आमच्यावर विश्वास ठेऊन पहा कसा बदल घडतोय असे आवाहन आज जय जवान जय किसान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकूश यांनी केले.  

भारतीय सैनिक आणि शेतकरी यांचा संपूर्ण सहभाग असलेली जय जवान जय किसान पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागेवर उमेदवार उभे करण्यात येणार असून ४० उमेदवारांची अधिकृत नावे घोषित झाली आहेत. उर्वरीत ८ जागांवर लवकरच निर्णय होईल. या वेळी आमचे मतदान आमचेच सरकारचा नारा देत या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पोपटराव दाते म्हणाले.  सर्व देशवासीयांना विनंती आहे की बरेच न्यूज चैनल विकले गेले आहेत त्यांना सर्वसामान्य जनतेचे, शेतकरींचे व सैनिकांचे सरकार नकोय, जन्मभर आपण फक्त कार्यकर्ता बनून यांच्या सतरंज्या उचलून कार्यकर्ता बनून राहावे आणि विधान सभा लोकसभा मध्ये घराणेशाहीची मुले, त्यांच्याच सुनाने त्यांच्याच नातवाने बसावे अशी या विकलेल्या काही मीडियाची इच्छा आहे, त्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही दाते यांनी केला.

महागाई कमी करण्यासाठी  पेट्रोल डिझेल चे किंमत २०% ते ५०% कमी केले जाईल. संपूर्ण देश टोल मुक्त केला जाईल.  घराच्या लाईट बिलाचा बोजा कमी करण्याकरता सोलरवर ९०% पर्यंत सबसिडी दिले जातील,  प्रायव्हेट शाळेच्या फि मध्ये ८०% पर्यंत सूट दिली जाईल.  जुनी पेन्शन योजना (OPS) लागू केली जाईल. सर्व सामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळण्याकरिता जिल्हा न्यायालयाचा निकाल १ वर्षात, उच्च न्यायालय १ वर्षात, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १ वर्षात घेण्याची तरतूद केली जाईल व जरुरती नुसार इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात येईल. तिरंग्याचा व संविधानाचा अपमान केल्यास देशद्रोहीचा गुन्हा लावला जाईल. सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्यात येईल.
शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव (एम एस पी) दिली जाईल. बियाण्यांवर व खतावर ५०% सूट दिली जाईल. कर्ज माफी दिली जाईल.  शेतकऱ्यांच्या दुधाला हमी भाव दिला जाईल. शेती पंपावर ९०% अनुदानावर सोलर जोडून दिली जातील. शेतकऱ्यावर आंदोलनाच्या दरम्यान झालेली केस मागे घेतल्या जातील.  शहराला व शेतकऱ्याला पाणीपुरवठा करण्यासाठी देशात नवीन धरणांची उभारणी केली जाईल. महिलांना सम्मान आणि सुरक्षा प्रधान केली जाईल.  महिलांच्या रोजगारासाठी ५,००० करोडच्या बजेटची व्यवस्था केली जाईल. सैनिकांना पूर्ण (OROP) दिले जाईल. प्रत्येक तालुक्यात (CSD) कॅन्टीन व (ECHS) ची सुविधा देण्यात येईल.
युवकांना २० लाख पर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. युवा वर्गाला १५,००० ते २५,००० पर्यंत उत्पन्न  मिळवण्याकरिता सरकारी योजना निर्माण करण्यात येतील.  युवकांना रोजगार मिळण्याकरता ५ लाख कोटीची तरतूद बजेटमध्ये केली जाईल. सेनेमधील युवकांचे मनोबल कमजोर करण्याकरिता सुरु करण्यात आलेली अग्नीवीर योजना युवकांच्या व सेनेच्या हितासाठी बंद केली जाईल. भारतातील कोणत्याही राज्यातील युवकांना दुसऱ्या देशात रोजगारासाठी जात असताना एजन्ट मार्फत न पाठवता त्याचे  सरकार नियोजन करील. अशी आश्वासने भारतीय जवान किसान पार्टीने आपल्या जाहिरनाम्यात अंतर्भूत केली आहेत. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com