Top Post Ad

हिन्दू नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


 ठाणे महानगरपालिका  विद्यमाने मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी हिन्दू नववर्ष दिवशी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.  

या कार्यक्रमाच्या तयारीकरिता आज 20 मार्च रोजी  ठामपा. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे निमंत्रक तनय दांडेकर, संजीव ब्रह्मे, डॉ. अश्विनी बापट, भरत अनिखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.  9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता श्रीकोपिनेश्वर मंदिरापासून या हिन्दू नववर्ष स्वागतयात्रेस सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व रस्त्यांची साफसफाई करणे, मंदिराशेजारी असलेल्या भाजीमार्केट परिसरात स्वच्छता ठेवणे, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहिल या दृष्टीने कार्यवाही करणे, स्वागतयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कामगार तसेच यात्रेदरम्यान रुग्ण्वाहिका उपलब्ध करावी. तसेच या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टीनेही सदरचा परिसर स्वच्छ करुन घेण्याबाबतच्या सूचना  माळवी यांनी यावेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.

 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणाईंमध्ये मतदान करणेबाबत जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे. तसेच महापालिकेच्यावतीने शिक्षणविभाग, आरोग्य, प्रदुषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे. वाढता उन्हाळा लक्षात घेता उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याबाबत ठाणे महापालिकेने हिट ॲक्‌शन प्लॅन तयार करण्यात आला असून याची माहिती प्रदुषण विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथातून देण्याच्या सूचनाही संबंधितांना या बैठकीत देण्यात आल्या.

               श्रीकौपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणारी स्वागतयात्रा चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मठ, तीन पेट्रोलपंप मार्गे हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राममारुती रोड मार्गे जाणार आहे. जांभळीनाका, हरिनिवास सर्कल व समर्थ भांडार गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.  श्रीकौपिनेश्वर मंदिर येथून निघणारी ही मुख्य स्वागतयात्रा असून शहरातील विविध भागातून 14 उपयात्रा निघणार आहेत. या उपयात्रांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घ्यावे व त्या ठिकाणीही आवश्यक त्या सोईसुविधा महापालिकेच्यावतीने पुरविण्यात याव्यात असेही  अतिरिक्त आयुक्त   1 संदीप माळवी यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com