Top Post Ad

पत्रकार सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्याचा शासन आदेश जारी


 बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून निवृत्त पत्रकारांना देण्यात येणा-या सन्मान योजनेची दरमहा देण्यात येणारी रक्कम ११ हजारा ऐवजी २० हजार करण्यात यावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आली होती. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने त्या संदर्भातील शासन निर्णय ( जीआर) जारी केला आहे. त्यामुळे आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. 

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना ११ हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते त्यात वाढ करून ती २० हजार रूपये करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ही मागणी तत्काळ मान्य करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सन्मान योजनेची रक्कम २० हजार रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचा शासन निर्णय जारी होत नसल्याने मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रविण पुरो यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांना जाब विचारून घेराव घातला होता. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी शासन निर्णय जारी होई पर्यंत पाठपुरावा केला.

अखेर आज राज्य सरकारने सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्यासंदर्भातील शासन निर्णय ( जीआर) जारी केल्याने राज्यातील जेष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांच्याह मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com