Top Post Ad

बार्टीच्या विद्यार्थ्यांवर शासकीय अन्याय... सामुहिक आत्मदहन करणार...?

 


 फेलोशिप साठी बार्टीचे हे संशोधक विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. मात्र, सरकार हे जाणीवपूर्वक हया विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर अन्याय करीत आहे. कारण महाज्योती, सारथी आदीसारख्या विद्यार्थांना वेगळा न्याय आणि आम्हाला न्याय? नाही अशी खंत त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

 गेल्या ४५ दिवसांहून अधिक दिवस उलटून ही सरकार कसलीही दखल घेत नसल्याने सर्व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. त्यांना सरकार आणि त्यांच्या प्रशासनाकडून कुठलाही आशेचा किरण दिसत नसल्याने ते लवकरच न्याय मिळत नसल्याने सामुहिक आत्मदहन करणार असल्याची थक्कादायक माहिती समजते आहे. सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते अनेक पक्षाचे नेते आदींनी भेटी देऊन आश्वासने दिली.मात्र, त्यांच्या आश्वासनाला सरकारने दाद दिली नाही. एकंदरीत सरकारला आमचे बळी हवेत ? तेंव्हाच कुठे न्याय मिळेल अशी परिस्थिती निर्माण केली असल्याचे ही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

- सुरेश गायकवाड (पत्रकार)

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकरिता बार्टी ही संस्था स्थापन केली गेली आहे या संस्थेचे उद्देश हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संशोधनात आर्थिक मदत फेलोशिपच्या माध्यमातून करणे परंतु या संस्थेच्या वतीने मागच्या अनेक वर्षापासून वि‌द्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा हा विविध कार्यक्रमांवर खर्च करण्याचा सपाटा लावला आहे.  ह्यामधे प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा संशय देखील व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी बार्टी ने 1 जाने ला उपस्थित राहणाऱ्या आंबेडकरी जनतेच्यासाठी भोजनाची सोय व्हावी म्हणून ६० लाख रुपयांचे टेंडर ५० हजार लोकांसाठी काढण्यात आले याची खरच गरज होती का? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला व चळवळीतील अनेक सहकान्यांनी हा प्रश्न सरकारला विचारला. एकीकडे सरकार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता फेलोशिप साठी पैसा नाही म्हणत आहे व दुसरीकडे हा राखीव निधी असा खर्च करत आहे. विधानसभेत आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळत नाही हा प्रश्न विचारला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करुन काय दिवे लावणार असा उलट प्रश्न केला ह्यातून शासन आणि प्रशासनात असलेल्या प्रस्थापितांना गोरगरीब विद्यार्थ्यांच्या  प्रश्नांचे काही देणे घेणे नाही हे स्पष्ट होत आहे.



  शनिवारी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करेल. त्यानंतर आचार संहिता अंमलात येईल. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा दादरच्या चैत्यभूमीवर समारोप होणार आहे. अन् रविवारी १७ मार्च रोजी त्यांची शिवाजी पार्कवर ' न्याय गर्जना सभा ' होणार आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारने फेलोशिपपासून वंचित ठेवलेले बार्टीचे अनुसूचित जातींचे पीएचडी संशोधक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. उद्या मुंबईत येणाऱ्या राहुल गांधी यांना त्या ७६३ तरुण विद्यार्थ्यांच्या वतीने आज एक पत्र ई मेलद्वारे धाडले आहे. त्यांचा टाहो, आक्रोशाचे प्रतिबिंब काँग्रेसच्या न्याय गर्जना सभेत रविवारी पाहायला मिळेल का - दिवाकर शेजवळ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com