मागील २-३ वर्षापासून रखडलेले ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिम जोडणारे कल्याण व मुंबई दिशेकडील दोन नागरीक पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे, मध्य रेल्वेचे ए डी इ एन अल्लापुरे, सिनियर सेक्शन इंजिनियर बळीराम, ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे, सी सी आय मानवेंद्र सिंग, उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, सचिव सुरेश मोहिते, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सात ते आठ लाखाहून अधिक प्रवासी ये-जा करीत असताना ठाणे पूर्व व पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वेकडून दि. २८ मे २०१९ रोजी तोडण्यात आला होता. त्यामुळे ठाणे पूर्व व पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती. परंतु रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत होते. त्यामुळे सदर पुलावरून व्यवस्थित चालता येईना एवढी गर्दी सकाळी व संध्याकाळी होत होती.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी या दोन पुलाची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण व मुंबई दिशेस नवीन पादचारी पूल व मुंब्रा येथील पादचारी पूल अशा एकूण तीन पुलासाठी महापालिकेने २४ कोटी निधी रेल्वेला देण्याचे मंजूर केले. त्यातील पहिल्या टप्प्यात ८ कोटी दुसऱ्या टप्प्यात ४ कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्त केला होता. निधी अभावी या दोन्ही पुलांचे काम थांबल्याने रेल्वे पादचारी पुलावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती.
एलफिस्टनच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला ५ कोटी निधी रेल्वेकडे वर्ग करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली. त्यांना मुंब्रा येथील पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही परंतु ठाणे रेल्वे स्थानकात सुरू झालेल्या पादचारी पुलाचे निधी अभावी काम थांबवू नका अशी विनंती केली. त्यानंतर अखेर आयुक्त अभिजीत बांगर यांनी याची दखल घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलासाठी ५ कोटीचा निधी दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी रेल्वेकडे सुपूर्त केला.
. सध्यस्थितीत मुंबईकडील दिशेच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. कल्याण दिशेकडे पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेने आज पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने आज ठाणेकरांकरीता दोन नवीन पादचारी पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
पुलाची माहिती ........मुंबई दिशेकडील पादचारी पुलाची लांबी १३०मीटर × रुंदी ५:५० मीटर असून प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ए, ९/१०,७/८,५/६ उतरते जिने बसविण्यात आले आहे भविष्यात पुढे प्लॅटफॉर्म क्रमांक ३/४ व २/१ जोडण्याचे नियोजन रेल्वे करणार आहेकल्याण दिशेकडील पादचारी पुलाची लांबी ७६ मीटर × रुंदी ४.८० मीटर असून एसटी डेपो ते कोपरी चंदनी कोळीवाडा जोडणारा पूल असून या पुलाला ३/४ व ५/६ ला जोडण्यात आला आहे
0 टिप्पण्या