छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी गावातल्या नाभिकांनी मराठ्यांचे केस कापापचे नाहीत असे विधान केले याबाबत जनमानसातील सलोखा बिघडू नये. तसेच भुजबळ यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवण्याकरिता ओबीसी मेडिकोज असोसिएशनच्या वतीने डॉ. राहुल घुले यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रात शांतता नांदावी असे मत आमचे आहे. वंचित, मुस्लिमसह संपुर्ण भारतीय समाज याच मताचा आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी सामाजिक सलोखा परिषद आयोजित करून त्यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, मंत्री छगन भुजबळ तसेच मनोज जरांगे यांना भेटणार आहोत. पुढील पधरा दिवसात शिर्डी या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची योजना आहे. महाराष्ट्रात शेतकरी, वंचित, अल्पसंख्यांक, मराठा, ओबीसी हे सर्व घटक एक आहेत एक राहू. महात्मा फुले यांच्या स्वप्नातील एकसंघ समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी ओबीसी मेडिकोज असोसिएशन, महाराष्ट्र ही संस्था निश्चितच महत्त्वाची भूमिका पार पाडेल असे घुले यांनी यावेळी स्पष्ट केले.
भुजबळ यांच्या विधानाबाबत बोलतांना धुले म्हणाले भुजबळ कुणाच्या तरी हातातले बाहुले झाल्यासारखे वागत असून त्यांच्या स्क्रिप्ट नुसार ते जातीयवाद वाढवण्याचे काम करत आहेत. भुजबळांनी वंजारी, धनगर, नाभिक, सुतार, कुंभार, तेली यांना त्यांच्या MET संस्थेत किती नोकऱ्या / ऍडमिशन ? किती ओबीसींचे भले केले? असा सवाल करीत धुले पुढे म्हणाले, महाराष्ट्रात कधीही मराठा ओबीसी दंगली होऊ शकतात, ओबीसींना देशोधडीला लावण्याचे छगन भुजबळ पांचे कारस्थान करत आहेत. तेव्हा महाराष्ट्राला वाचवण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने पुढे यावे. मराठा समाज ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करतोय, ती योग्य की अयोग्य हे कायद्याच्या पातळीवर ठरेल. आपल्या हक्कांसाठीची लढाई कायदेशीर पातळीवर लढण्याचा अधिकार मराठा आणि ओबीसी या दोन्ही घटकांना आहे. आरक्षण लढाई लढायला कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. परंतु ती लढताना चिथावणीखोर भाषणे करून गावगाड्यात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या समाजघटकांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे कारस्थान ही राजकीय मंडळी करीत आहेत हे दुर्लक्षित करून चालणार नाही. छगन भुजबळ यांनी प्रचंड मापा कमवून ठेवलीय. भुजबळ यांच्या MET पा शिक्षण संस्थेत त्यांनी किती ओबीसी बांधवाना नोकन्या किंवा शिक्षण सोयी सवलती दिल्या? या प्रश्नाचे उत्तर कुणालाही नकारार्थीच आहे. स्वतःच्या कुटुंबियांना त्यांनी मोठे केले त्यासाठी संस्था वापरली, आज ते समाजाच्या भल्याची भाषा करू लागलेत. मात्र त्यांनी केलेले वक्तव्य हे समाजातील दुरी वाढवणारे आहे. छगन भुजबळ यांच्या चिभावणीवरून गावातल्या नाभिकांनी मराठ्यांचे केस कापापचे नाहीत अस ठरवले किंवा प्रत्त्युत्तरादाखल गावात बहुसंख्प असलेल्या मराठ्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकायचं ठरवलं तर नाभिकांवर उपाशी मरायची वेळ येईल. त्यांच्या नादाला लागले तर नाभिकय काय गावपाडपातले सगळेच ओबीसी देशोधडीला लागतील असेही घुले म्हणाले.
भुजबळांना मराठा आरक्षणावर आक्षेप घेण्पाचा अधिकार आहे पण नाभिकांनी मराठ्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मर्यादा ओलेडणारे आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूढे आली तेव्हापासून म्हणजे साधारणपणे पंधरा वर्षांपासून ओबीसी समाजघटकातील काही मंडळी मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण करू लागली. छगन भुजबळ पांच्या नेतृत्वाखालील विचारवंतांची फौज त्यात आघाडीवर होती. हा संघर्ष उभा करणारी सगळी नेतेमंडळी, विचारवंत मंडळी शहरामध्ये राहतात. गावखेड्यात काय चालतय याच्याशी त्यांना देणंघेणं नाही. त्रिंबक नारायण आत्रे यांच्या गावगाडा पुस्तकापुरतं याचं गावगाड्याचे आकलन मर्यादित आहे. प्रत्यक्ष गावखेड्यात आणि गावगाड्यात त्यापलीकडे बरंच काही आहे. तिथं सगळे समाजघटक गुण्यागोविंदानं नांदताहेत. सगळे परस्परावलंबी आहेत. कितीही मोठा घटक असला तरी त्याला छोट्यातील छोट्या घटकाची गरज लागत असते. हे संबंध केवळ व्यावसायिक नाहीत, तर ऋणानुबंधाच्या पातळीवरील आहेत. त्यात वितुष्ट आणण्याचे काम ही राजकारणी मंडळी सातत्याने करीत आहेत. नाही म्हटले तरी सतत प्रसारमाध्यमांतून त्यासंदर्भातील बातम्यांचा मारा होत असल्यामुळे त्याचा तरुण पिढीच्या मनावर परिणाम होऊन दुरावा निर्माण होऊ शकतो.
विधवांच्या केशवपनाविरोधात महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी नाभिकांचा संप घडवून आणला होता. आणि फुल्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेणारे भुजबळ नाभिक समाजाला मराठा समाजाचे केस न कापण्याचे आवाहन करून समाजात विद्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत. आतातायी घटक सगळीकडे असतात. त्यातून कुठेतरी एखाद्या गावात घडलेल्या कथित घटनेचे भांडवल त्याला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण भलत्या दिशेने नेण्याचे कारस्थान राजकारणी मंडळी करीत आहेत आज शहरांमधून आता विविध क्षेत्रांत परप्रांतीय कारागीर वाढत आहेत केशकर्तनाच्या व्यवसायातही उत्तर भारतीयांची संख्या वाढू लागलीय, हा धोका लक्षात घेतला तर हे आवाहन नाभिक समाजाचे नुकसान करणारे असल्याचे लक्षात येते, यातला व्यावसायिक नफा-नुकसानीचा भाग दुय्यम आहे. मुळ प्रश्न आहे तो समाजा समाजामध्ये भिंती उभ्या करण्याचा. जो राजकारणी मंडळी पद्धतशीरपणे करीत आहेत. याला आमचा कायम विरोध राहील आणि त्यासाठी जनजागृती करीत आहोत. लवकरच संस्थेचे यू-ट्यूब चॅनल, आणि फेसबूक चॅनल सुरू करून या माध्यमातून सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे प्रत्येकाला आवाहन करू असेही ओबीसी मेडिकोज असोसिएशन, महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांनी शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या