आपल्या देशातील जनतेला कुठल्यान कुठल्या प्रकारे गुलामीचे जीणे जगावे लागते आहे हीच खरी वस्तुस्थिती आहे. कारण क्षुत्लकशा कारणावरून थर्माधर्मात, जातीजातीत दंगेधोपे झाले आहे. त्यामध्ये निरपराधांना बळी पडावे लागले आहे. त्यांचे या घटनेशी यत्किंचितही देणे घेणे नसते. त्या व्यक्तीला त्या त्या थर्मापायी,जातीपायी आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा लागला आहे. परंतु अशा जीवघेण्या घटनेला जबाबदार असणाऱ्या माथेफिरू नेत्यांचा, समाजकंटकांचा, धर्मांधांच्या जीव जातो का? त्यांचे सर्वस्वपणाला जाते काय? हा खरा संशोधनाचा भाग आहे. थोडक्यात ही चांडाळ चौकडी मंडळी आगी लावायची कामे करतात आणि आपण मस्तपेकी पंचताराकित हॉटेलांमध्ये मेजवानी झोडत बसतात. त्यामध्ये त्यांच्या नंगानाचेचा कळस बघण्या सारखा असतो अशी ही देशद्रोही मंडळी सामान्य जनतेच्या भावनिकतेला हात घालून त्यांना भडकावून आगी लावायची कामे करीत असतात.
आणि ही सामान्य लोक या भिकार देशद्रोह्या नेत्याच्या म्हणण्यावरून एकमेकांचे मुडदे पाडीत असतात. एकमेकांच्या आया बहिणीची अब्रू लुटत असतात. एकमेकांची संपत्ती लुटत असतात आणि देशाच्या बसेस, रेल्वे , टॅक्सी, हॉटेल्स आदी सार्वजनिक संपत्तीचा ऱ्हास करीत असतात. हे कृत्ये . करण्यामागे ठराविक समाजकंटकांचा हात असतो. ज्यामुळे ही मंडळी अशी कृत्ये करण्यास सर्वतोपरी सहभागी होत असतात. आणि या देशद्रोही फितुरांचा गेरफायदा आपल्या देशाचा शत्रू घेत असतो. आणि सहजगत्या आपल्या देशाची समाजव्यवस्था खिळखिळी करून टाकतो. आपले सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकीत असतो. एकंदरीतच या घटनांमध्ये आपल्या देशातील माफिया नेतेमंडळीच्या संबंधांचा विचार होणे गरजेचे आहे. ज्यामुळे एवढी हिंमत शत्रूंना होते आहे कि ते बिनदिक्कतपणे संहार घडविण्यात अंग्रेसर ठरता आहेत. खरे पाहिले तर परकीय शत्रूंपेक्षा हितशत्रूंपासून थोका अधिक आहे. अशा हितशत्रूंचा, फितुरांचा, माफियांचा शोध घेण्याची गरज आहे आणि ही शोध मोहिम व्यापक प्रमाणात राबवून अशा माफियांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. परंतु ते आपल्या देशात होत नाही. त्यामुळे देशद्रोही मंडळीचे नीतीधैर्य बळावते. त्यातून ते बॉम्बस्फोट, जातीय दंगली घडवितात. त्यामुळे करोडो अब्जो रुपयांचा चुराडा होतो. कित्येकांचा जीव जातो. त्यामुळे सामान्य लोकांनी या धर्मांध नेत्यांची खेळी ओळखून या धर्मांध नेत्याचाच जीव घेतला पाहिजे. यांनाच यमसदनी धाडले पाहिजे. कारण आपआपसांतील भांडणात शत्रूला आपली कृष्णकृत्ये करता येतात याची साधी जाणीव नसावी अशा नेत्यांसाठी मरण्यापेक्षा अशानांच यमसदनी धाडले पाहिजे. कारण आपआपसातील धर्मांतील जातीतील लोकांमध्ये भांडणे लावून दयायची आणि प पाहात बसयाचे हीच खेळी या माथेफिरू, धर्मांध नेत्यांची आहे अशा धर्मांधांना मानवधर्म श्रेष्ठ आहे हे कडू नये?
एकीकडे महागाई, बेरोजगारी, दारिद्रय, गरीबी या समस्याबाबत कुणा नेत्यांनी रान पेटविले? कुणा नेत्यांनी आपल्या जवळील काळ्या पेशाचा वापर जनतेसाठी केला? याउलट त्यांनी आपले करोडो रुपयांचे वाढदिवस साजरे करण्यात घालविले, परंतु त्या कार्यकर्त्यांना ,जनतेला काय दिले? त्यासाठी त्यांनी आपआपसात खूनखराबे करावे. एकमेकांची संपत्ती लुटावी. . मात्र माणसामाणसांमध्ये विष पेरण्याचे, धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये रक्तपात घडविण्याचे मनसुबे रचण्याचे सोडून मानवधर्मासाठी भव्यदिव्य शाळां ,कॉलेज , हॉस्पिटल, होसिंग सोसायटया यांच्यासहित मानव धर्माच्या निगडीत ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि जे कुणी धर्मांध नेतेमंडळी आहे त्यांना ठेचण्यासाठी जनतेने एक होऊन लढा दिला पाहिजे. तेंव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्योदय होईल, अन्यथा काळोखच... काळोख.....!!
सुरेश गायकवाड / ९२२४२५०८७३
0 टिप्पण्या