Top Post Ad

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी ?

मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस  ' मराठी राजभाषा दिन ' म्हणून साजरा केला जातो.मराठी भाषा राज्यात ही प्राचीन समृद्ध आणि गौरवशाली परंपरा असलेली भाषा आहे.महानुभवानी मराठी भाषेला धर्म भाषा मानली, संत ज्ञानेश्वरांनी ' अमृताने ही पैजा जिंके  ' असे मानून त्यांनी सर्व सामान्य माणसाच्या मनात आवडेल, अशी रचना करून मराठी भाषेचा मोठेपणा सांगितला. संत तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

मराठी भाषेची समृद्धता आणि तिच्या वैभवाने या राज्याला मिळालेली एक सांस्कृतिक ऐतिहासिक देणगी ही मोठ्या अभिमानाने जपण्याची संधी प्राप्त होत असते. मराठी भाषेच्या संस्कारामुळे अनेक मराठी पिढ्यांनी  आज आपापल्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध  केले आणि करीत आहेत. मराठी भाषा सर्वांग सुंदर भाषा असून हिंदुस्थानातील अधिकृत २२ भाषांपैकीं एक भाषा आहे.मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15  वी भाषा आहे. तर हिंदुस्थानात तिसरी भाषा आहे.अशी ही मराठी भाषा आज गोवा, बडोदे, गुलबर्गा, इंदूर अशा ठिकाणी मराठी उच शिक्षण विभाग आहे. महाराष्ट्राबाहेर पंधरा  विद्यपीठात मराठी भाषा शिकवली  जाते. जगातील ५२ देशात मराठी भाषिक प्रामुख्याने आहेत. अशा या मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभलेली आहे.

सन  १९६५ ला  मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि मान्यतेची राजभाषा ही झाली आपले हिंदुस्तान सरकार हिंदुस्थानी भाषा आणि संस्कृतीला सर्वोच्य प्राधान्य देते. आतापर्यंत या तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया अशा  सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपली मराठी भाषा ही प्राचीन आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी विचारविनिमय सुरू झाला. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते. महाराष्ट्र सरकारने १० जानेवारी २०१२ रोजी प्रा.रंगनाथ पाठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन  केली.  समितीने मराठी भाषेवर संशोधन करून तिच्या विषयीची अभ्यास करावा.त्याप्रमाणे समितीने मराठी भाषेचे प्राचीनत्व २००० वर्षांपूर्वी चे असल्याचे सिद्ध करीत, समृद्ध मराठी साहित्याचा ही मागोवा घेतला गेला.मराठी भाषेतील शिलालेख, ताम्रपट, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू, संतांचे अभांग आणि साहित्य हे मराठी भाषेचे अमूल्य रत्नभंडार असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.हा अहवाल २०१५ साली केंद्र सरकारकडे दिला.तेव्हा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. 

नुकतेच मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे पार पडले.तिथे सुद्धा दरवर्षी प्रमाणे मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर केला गेला.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात  आली.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक विचावंतांनी सुद्धा पुरावे दिले आहेत. अनेक साहित्य संस्थानी लोक चळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला .तरीही राज्य सरकार कडून आणि लोकप्रतिनिधींनी तसेच मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी या अभिजात भाषेच्या दर्जाकररता आवश्यक ते प्रयत्न होताना दिसत नाही.जे प्रयत्न केले त्याला केंद्रीय स्तरावर योग्य तो मान दिला जात नाही. केंद्र सरकार कडून मराठीच्या अभिजात दर्जावरून ' सकारात्मक ' टोलवाटोलवी सुरू आहे. 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न होणे गरजेचे असताना दुसरीकडे या भाषेच्या दुर्दशेला रोखणे आपले कर्तव्य आहे. मराठी शाळांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मराठी व्यावसायिक आणि  ज्ञानभाषा नाही असे अलीकडच्या युवा पिढीचे मत आहे. मराठी भाषेपेक्षा इतर भाषांमध्ये अधिक रस वाटतो, मराठी भाषा शिकणे सोपे आहे असे अनेक जण आपले मत व्यक्त करतात.परंतु  रोजच्या व्यवहारात  मराठी भाषा बोलण्याचा आग्रह आपण किती धरतो ? रोजच्या व्यवहारात आपण किती हिंदी आणि इंग्रजी  शब्द वापरतो. मराठी भाषेने संवर्धन करायचे असेल तर व्यावसायिक वापर वाढायला हवा. ज्ञानभाषा होण्याच्या तज्ज्ञांच्या मते पर्याय नाही.मराठी भाषेची दुरवस्था रोखण्यासाठी ती नुसती शिकणे पुरेशी नाही.तिच्या विषयी प्रेम आणि आपुलकी वाटायला हवी . मराठी माणसाला मराठी  भाषा लिहिता  वाचता आली पाहिजे.मराठीत साहित्य मोठ्या  प्रमाणावर आहे.त्याचा उपयोग करून आपल्या ज्ञानात भर घालून मराठी भाषा समृद्ध करायला हवी.परंतु इंग्रजीत शिक्षण हे इथल्या उचमध्यम वर्गाचे काय सामान्य वर्गाचे पालकांचे सुद्धा स्वप्न मध्यम वर्गाच्या सहवासातल्या आर्थिक दुर्बल घटकाला इंग्रजी ही आर्थिक प्रगतीची भाषा आहे असे वाटू लागले आहे.तसेच मराठी असूनही चांगली मराठी भाषा येत नाही हे सांगताना अनेक लोकांना अजिबात लाज वाटत नाही, हे वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे. मराठी भाषा अभिजात आहे हे आता तज्ज्ञांनी मान्य केले आहे. तेव्हा मराठी भाषेचा अभिमान बाळगताना त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना त्याचवेळी ती ज्ञानभाषा व्हावी. तसेच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी भाषेविषयी आदर निर्माण होण्याची जास्त गरज आहे.इतर राज्यातील लोक आपापल्या राज्यातील प्रादेशिक  भाषेचा जसा आदर करतात तेवढाच आदर आपण आपल्या मराठी भाषेचा करावा.याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सुनील कुवरे ,
शिवडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com