Top Post Ad

ठाण्यात प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वच्छ गृहनिर्माण सोसायटी स्पर्धा


 ठाणे शहराचा नावलौकिक स्वच्छ शहर असा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्याअनुषंगाने क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांनी स्वच्छ गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्पर्धा घेतली आहे. विजेत्या सोसायट्यांना ठाणे जिल्हा हौसिग फेडरेशन पुरस्कार-२०२४ ने सन्मानित केले जाईल. यामध्ये ठाणे शहर व ठाणे जिल्ह्यातील प्रत्येकी ८ गृहनिर्माण सोसायट्यांना रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे. गृह उत्सव-प्रॉपर्टी प्रदर्शनात १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उत्कृष्ट गृहनिर्माण सोसायट्यांच्या विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त गृहनिर्माण सोसायट्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जितेंद्र मेहता यांनी केले आहे.

ठाणे शहराच्या विविध भागातील परवडणाऱ्या घरांपासून सर्व सुविधांयुक्त जीवनशैली असलेली घरे ग्राहकांना उपलब्ध व्हावी. त्यांना याबाबत एकाच ठिकाणी आवश्यक ती माहिती मिळावी. त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. तसेच विविध पर्याय उपलब्ध व्हावेत याकरिता मागील २० वर्षापासून ठाण्यात एमसीएचआयच्या माध्यमातून भरवण्यात येत असलेल्या गृह प्रदर्शनाचा सिंहाचा वाटा आहे. या वर्षी देखील १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान गृह उत्सव प्रॉपर्टी २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील रेमन्ड गार्डन येथे होणाऱ्या या गृहउत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनाकरिता  रेमंड उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

 गतिमान अर्थव्यवस्थेमुळे या प्रॉपर्टी २०२४ ठाणे प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसादाची अपेक्षा क्रेडाई-एमसीएचआय' ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आज व्यक्त केली. या प्रदर्शनाची माहिती देण्याकरिता आज ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भावेश गांधी (रिजन्सी ग्रुप)  जय व्होरा (अध्यक्ष, युवा विंग),. सचिन मिराणी (उपाध्यक्ष),  संदीप माहेश्वरी (प्रदर्शन समिती अध्यक्ष),  मनीष खंडेलवाल (सचिव),  गौरव शर्मा (खजिनदार),. निमित मेहता (खजिनदार, युवा शाखा).इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ठाणे शहरातील पोखरण रोड क्र.१ वरील रेमंड मैदानावर येत्या १६ फेब्रुवारी रोजी भव्य प्रदर्शनाला सुरुवात होणार असून, ते १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला मोफत प्रवेश देण्यात येईल, या प्रदर्शनाचे हे २१ वे वर्ष असून हे भव्य प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी व सदस्य नियोजन करीत आहोत, असे मेहता म्हणाले. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहराला समृद्ध व संपन्न इतिहास आहे. सध्या शहरात विविध सुविधा उपलब्ध असून, शांत व सुरक्षित वातावरणात निवासासाठी ठाणे शहराची राज्यात रिटेल हब' म्हणून ओळख झाली आहे. तर विश्वासार्ड बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई-एमसीएच आय, ठाणे संस्थेने आयोजित केलेला गृह उत्सब प्रॉपर्टी २०२४ मधून ग्राहकांना सुरक्षित व माफक दराने गृहकर्जाद्वारे घरखरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत, असे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता यांनी सांगितले. घर खरेदी करणाऱ्यांसाठी अनेक वर्षांपासून एकमेव विश्वासार्ह पर्याय ठरलेल्या क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे पेथील प्रदर्शनातून इच्छूक ग्राहकांचे घराचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकेल. असे आश्वासन त्यांनी दिले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com