Top Post Ad

रिपाई आठवले गटाच्या कोकण प्रांत अध्यक्षपदी प्रकाश मोरे तर कार्याध्यक्षपदी राहुल डाळिंबकर

 


 रिपाइं पक्ष जिवंत ठेवण्यात तळागळातील कार्यकर्त्यांचं योगदान - गौतम सोनवणे 

महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोकण प्रांत अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते प्रकाश मोरे तर  कार्याध्यक्ष पदी राहुल डाळिंबकर यांची निवड जाहीर केली.

 रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने आज गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ,आझाद मैदान येथे पत्रकार परिषदेची आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी कोकण प्रांतातील विविध पदे जाहिर केली.या पत्रकार परिषदेत सुरेश बारसिंगे, रमाकांत जाधव, सुमित वाजळे, संजय पवार, प्रकाश जाधव,नरेंद्र गायकवाड, शिरीष चिखलकर , बाळासाहेब गरुड, सुमित मोरे, मोहन खांबे, सुशांत सकपाळ आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सोनावणे म्हणाले कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात रिपाइं पक्षसंघटना व्यापक स्वरूपात विस्तारत आहे. महाराष्ट्रासह कोकणात रिपब्लिकन पक्ष जिवंत ठेवण्यात तळागळातील कार्यकर्त्यांचं मोठं योगदान राहील आहे. मागील अनेक वर्षे प्रकाश मोरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सेवाभावी क्षेत्रात आपल्या कुशल कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. याबरोबरच आंबेडकर चळवळ वाढीसाठी योगदान दिले आहे. मोर्चे, धरणे आंदोलन आदींच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे. मोरे  यांचे उत्तम संघटन कौशल्य व दांडगा जनसंपर्क याचा पक्ष वाढीसाठी लाभ होणार असून कोकण अध्यक्ष पदाला योग्य न्याय देतील  तसेच येणाऱ्या लोकसभेत रिपब्लिकन पक्ष आपली ताकद दाखवून देईल असा विश्वासही सोनावणे यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची छोटी ताकद आहे. निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असते, ती जबाबदारी आरपीआयची आहे. त्यामुळे नेत्यांना नम्र विनंती आहे, की मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही मी लोकसभेचा माणूस आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणं आवश्यक आहे. लोक मला विचारत आहेत. आरपीआयला शिर्डीतून एक जागा द्यावी. येथून आरपीआयचा उमेदवार जिंकून यावा अशी लोकांची मागणी आहे. शिर्डीतील लोकांचीही ही भावना आहे. मी तिथून निवडून आलो तर मोदींच्या मंत्रिमंडळात मला नक्कीच संधी मिळेल. त्या मंत्रिपदाचा मी उपयोग करेन. शिर्डी लोकसभेचा कायापालट करेन, न्याय देण्याचं काम मी मंत्रिपदाच्या माध्यमातून करू शकेन. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना विनंती आहे की, लोकांच्या भावनांचा आदर राखणं गरजेचं आहे. आम्हाला एकतरी जागा मिळावी. आम्हाला एकही जागा मिळाली नाहीतर आम्हाला तोंड दाखवणं अवघड होऊन जाईल. दलित मतं ट्रान्सफर करायची असतील तर आरपीआयला जागा द्यावी”, - केंद्रीय मंत्री रामदास आठवले (अध्यक्ष : रि.पा.इं.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com