Top Post Ad

पत्रकार, पुढारी, पोलीस आणि खंडणी - दरोडा


 लोकशाही ही सांसद, न्यायपालिका, कार्यपालिका, पत्रकारिता या चार स्तंभावर उभी असते. हे चार स्तंभ एकमेकाला पुरक असतात. या चार स्तंभापैकी एकही स्तंभाचा घात झाला वा त्याला वाळवी लागली, तर लोकशाहीचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या देशातील लोकशाही ही देखील चार स्तंभावरच उभी आहे.या लोकशाहीला स्वातंत्र्यासाठी ७७ वर्षाचा कालावधी लोटतो आहे. आणि प्रजासताक दिनाला ७४ वर्षाचा अवधी झाला आहे. मग, आपल्या देशातील लोकशाही लोकशाही पद्धतीने हाकली जाते काय ? हाकली गेली आहे काय? तर त्याचे उत्तर हे नाहीच असे असेल. कारण इथली संपूर्ण व्यवस्थाच मनुवाद्याच्या, भांडवलदारांच्या, लुटारुंच्या हातात कायम राहिली आहे. त्यामुळे त्यांनी लोकशाहीची पुरती वाट लावून टाकली आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका लढल्या जात आहेत त्या पूर्णतः पैशाच्या - ताकदीच्या जोरावर. त्यासाठी कितीही पोलीस बंदोबस्त लावला वा सीबीआयचे जाळे पेरले तरी सामान्य जनतेला वेगवेगळी आमिषे दाखवून, भीती दाखवून, प्रसंगी जीवे ठार मारण्याची थमकी देऊन, किंवा त्यांच्या कुटुंबाला वेठीस धरून निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. आणि जात आहेत, जाणार आहेत. हा, निवडणुकीचा डाव कित्येक दशके सुरूच आहे. 

या निवडणुकीच्या काळात वेगेवेगळे राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आपल्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात जनतेसाठी आश्वासनाची खिरापत वाटत असतात. आणि सर्व जनता ही मोठ्या विश्वासाने त्या पक्षावर अंधविश्वास ठेवून त्या पक्षाला निवडून देत असते. मग, निवडून आलेल्या पक्षाने त्या लोकांना दिलेल्या जाहिरनाम्यातील वचनपूर्ती केलेली आढळून येते का? तर त्याचे उत्तर नाहीच असे असेल . त्याचे कारण अजूनही सामान्य जनता अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, औषधे, शिक्षण, आरोग्य, आदी मुलभूत गरजांपासून कोसो दूर आहे. ह्या, मुलभूत समस्यांवर करोडो - अब्जो रुपयांचा निधी खर्च केला जातो, त्या निधीचा विनियोग खरोखर तेव्हढा वास्तवात होतो  का? हा खरा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नांच्या विळख्यात सामान्य जनता भरडली गेली आहे. कारण इथेच भ्रष्टाचाराचे कुरण संपता - संपत नाही. आणि हे विदारक सत्य सामान्य जनतेला समजत नाही असे नाही. परंतु ही सामान्य जनता तीन माकडासारख्या अवस्थेत जगू पाहते आहे. त्यांना त्यासंबंधी विचारले असता, आपल्याला काय करायचे? सर्व राज्यकर्तेच नालायक!!! मग, ते कोणत्याही पक्षाचे असो, सर्व सारे एका माळेचे मणी अशी मानसिकता असल्याने लोकशाहीत राज्यकर्त्याच्या विरोधान कुणा पुढाऱ्याने वा सामाजिक कार्यकर्त्याने विरोधात आवाज उठविला तर ही सत्तेतील राजकीय मंडळी आपल्या राजकीय शक्तीचा गैरवापर करून पोलीसांना हाताशी धरून त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा, पत्रकारांचा, वा पुढाऱ्याचा काटा काढते. आणि त्याला आयुष्यातून उठविण्याचा घाट घालते. अथवा त्यांचेवर खोटेनाटे आरोप करून त्यांना बदनाम करून संपविते. 

असेच कटकारस्थान रचून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या कार्यकाळात बहुजन मुक्ती पार्टीचे नेते राजरत्न आंबेडकर हे आमदारकी पदाच्या शर्यतीत उभे ठाकलेले पाहून त्यांना शह देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आपल्या साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर करून त्यांचेवर खंडणी - दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांना मारझोड केले होती. त्यासाठी पोलीस प्रशासनातील सुपारी बहादुर पोलीस अधिकारी कबाडे आदीनी त्यांना मारझोड केली होती. आणि हे कृत्य त्यांनी सत्तेचा माज आल्याने त्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्याचा प्रयत्न केला त्यांचा उद्देश्य काय होता तर त्यांनी निवडणूकीतून माघार घ्यावी वा तडजोड करावी. परंतु बहुजन मुक्ती पार्टीचे नेते राजरत्न आंबेडकर यांनी या भिकाऱ्यांना कसलीच भीक घातली नाही .त्यामुळे त्यांनी ही खेळी खेळली. याठिकाणी सांगण्याचे तात्पर्य असे कि, लोकशाहीतील ही मस्तवाल, मुजोर, राजकीय नेते मंडळीच्या विरोधात कुणाही ब्र केला तर त्याचा गेम झाल्याशिवाय राहणार नाही असे हे बोलके उदाहरण आहे. अशी बोलकी उदाहरणे भरपूर आहेत . ज्यामुळे ईडी, आयकर विभाग, सीबीआय विभागाच्या धाडसत्राने कित्येकांची पाचावर धारण बसली आहे. यासंबंधी त्यांचा मागोवा घेतल्यास त्यासंबंधी एक पुस्तक लिहिले जाईल. परंतु हे सूडाचे राजकारण समाजाच्या, देशाच्या हिताच्यादृष्टीने योग्य आहे का?

ही गत सामाजिक कायकर्त्याची - पुढाऱ्यांची आहे. तीच गत पत्रकारांची होते. कुणा एका पत्रकाराने राजकीय पुढाऱ्यांची वा नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांच्या अनैतिकतेची प्रकरणे उजेडात आणली तर ती राजकीय नेते मंडळी पुन्हा एकदा कुणा लोंबत्या? पोलीस प्रमुखांना हाताशी धरून त्या पत्रकाराच्या आर्थिक परिस्थितीचा, कमजोरीचा आढावा घेऊन त्या पत्रकाराला पैशाच्या आभिषाद्वारे, लाचेद्वारे , गप्प करण्याचा प्रयत्न करतात . त्यांचेवर खोटेनारे आरोप करून खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद करून त्याचे आयुष्य उध्वस्त करतात आणिआणि हे न जमल्यास त्या पत्रकाराची मजबूरी ओळखून कुणा विषकन्येचा वापर करून रूपवान, गोऱ्यापान तरुणीला त्या पत्रकाराकडे पाठवितात. आणि मग, ती विषकन्या योजलेल्या करकारस्थानाप्रमाणे त्या पत्रकाराला जाळ्यात अडकवते. आणि त्याचेकडून आपली नको तो हौस भागवून घेते आणि नंतर मोठमोठ्याने आरडाओरड करून विनयभंग झाल्याचा कांगावा करून गुन्हा दाखल करून त्या पत्रकाराचे आयुष्य बरबाद करते. त्यावेळी देखील सुडाने पेटलेली ही राजकीय मंडळी ( लॉबी ) त्या पत्रकाराला आयुष्यातून उठविते.

: त्यावेळी देखील पत्रकार क्षेत्रातील स्वतःला जगमान्य म्हणणारी पत्रकार मंडळी त्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्यतेचा शोध घेत नाही. त्यावेळी कुणीही हा सूर्य आणि हा जयद्रथ असा भेद करीत , अगदी बैलाप्रमाणे, गुलामाप्रमाणे, मालकांच्या पुढे गोंडा घालीन राहतात. त्यामुळे पोलीसांना सामाजिक कार्यकर्त्यांना, गुंडांना, माफियांनां, पत्रकारांना बळी देणे हा हातचा मळ झालेला आहे. अगदी कुणीही यावे अन् टपली मारून जावे अशी करून घेतली आहे. त्यामुळेच पत्रकारांच्या मागण्या अजूनही मान्य होत नाही. याउलट त्यांच्या हत्येत वाढच होत चालली आहे. ज्याचा दुष्परिणाम शशिकांत वारिशे सारख्या पत्रकाराला भोगावा लागला आहे. तसाच भोग दै. आपलं महानगर चे संपादक निखिल वागळे यांना ही भोगावा लागतो आहे. ज्यामुळे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून बचावले, अन्यथा त्यांचेही काही खरे नव्हते. एवढी भयावह अवस्था सत्ताधीशांनी करून ठेवली आहे. तरी देखील ह्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, राजा आदाटे, दिपक केतके, सानप, दिपक पवार यांचे सह मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सचिव संदीप चव्हाण, राही भिडे, विष्णू सोनवणे, स्वाती घोसाळकर, तसेच प्रेस क्लबचे आणि त्यांचे सहकारी आणि मुंबई महानगर पालिकेचे अध्यक्ष मारुती मोरे सह त्यांचे सहकारी, मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता डोईफोडे सह त्यांचे सहकारी , टिव्ही व फोटो जर्नालिस्टचे अध्यक्ष सह त्यांचे सहकारी यांनी तातडीने निषेध मोर्चाचे आयोजन केले. आणि त्यात सरकारच्या दडपशाही विषयी रोष व्यक्त करून पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्या वियेधात, अन्याय -अत्याचार विरोधात कठोर उपाययोजना करून पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमबजावणीची मागणी केली गेली. परंतु सरकारची उदासिन भूमिकाच याकामी दिसून येत आहे.

कुणी ही त्या दडपशाही विरोधात बंड करीत नाही . कारण सारी जनता षंढ झाली आहे? काय?सारा समाज षंढ झालाय? अरे, चोरांची टोळी असते, त्या चोरांच्या टोळीला हात लावून दाखवा. त्या चोरांचा थाडसीपणा पाहून आपण हतबल होऊ, इतकेच काय तर त्या वारांगणेला इमान आहे. त्या एका बाईला भररस्त्यात कुणी शरीर सुखाची मागणी केल्यास तोचेही इमान जागे होईल अशी माणसे स्वतःच्या अस्मितेसाठी पेटू शकतात तर हा मर्दमुकीचा डंका मारणारा षंढ ? समाज मर्द केंव्हा होणार? का? षंढ म्हणून जगणार आणि षंढ म्हणूनच मरणार.? अर्थात लोकशाहीत लोकांनी आपल्या हक्कांसाठी जीवाचे रान केले पाहिजे. त्यासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे. त्यासाठी संविधानाचे वाचन केले पाहिजे . प्रत्येक कलमांचे अध्ययन केले पाहिजे . आपल्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे. आणि ही अभिनव मोहिम आपण राबविली पाहिजे. ज्यावेळेस संविधानातील ज्ञानरूपी अमृताचा एकएक कण आपण प्राशन करू त्यावेळी जगण्याची उर्मी वाढत जाऊन राजकिय पुढाऱ्यांनी - पोलीसांनी आपल्यावर किती - किती अन्याय अत्याचार केले तर त्याचे यथार्थ दर्शन घडेल कारण आजमितीला अनेक आरोपींना खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात शिक्षा भोगावी लागते आहे. अशा कित्येकांना खोट्या गुन्ह्याखाली अटक झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याची वाताहत झाली आहे हे सारे कशाचे द्योतक आहे.:

 परंतु अशीच पत्रकारांच्या हत्येत वाढ होत राहिली तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री महोदयांना हर्षवायू भरणार आहे काय? का? स्वतःला अत्यंत मोठे पत्रकार म्हणवणाऱ्या त्या पत्रकाराच्या लॉबीला आनंद होणार आहे? ज्याच्यामुळे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक अगदी नियतकालिका इतकेच काय तर अनियतकालिकांतील ही पत्रकारांना ( सुखसुविधांपासून ) शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही तसेच शासकीय कार्यक्रमाचा वृत्तांत घेता येत नाही. अगदी षंढा प्रमाणे पत्रकारांची ही वाताहात सुरूच आहे अशी ही पत्रकारांची दयनीय अवस्था असताना आपल्या देशातील मुर्दाड झालेली जनता ही काहीही बोलत नाही.

: काही पोलीस प्रशासनातील काही सुपारी ... पोलिसांनी आपल्या खुर्चीखाली किती.... अंधार आहे हे पाहिजे. कारण सामाजिक कार्यकर्ते, पुढारी, पत्रकार, सामान्य जनता आदी घटकांनी तुमच्याही मुळाशी जाऊन तुमचा पिच्छा पुरविला तर किती... किती ... गुन्हयाखाली तुम्हीही तुरुंगात जाऊ शकता याचाविचार केला काय? अगदी मटका, जुगार, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, आदी अवैध धंद्यापासून ते हातभट्टीच्या धंदयापर्यंत लाखो करोडो रुपयांचा हप्ता राजरोसपणे मिळत असतो त्याचे काय? हमाम में सब नंगे है! ना! अशी ही वास्तविकता असल्याने मालवणीच्या हातभट्टीकांडांत जवळजवळ १५०व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळेस कारवाई म्हणून त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांपासून अंमलदारांना सस्पेन्ड केले गेले. परंतु हीच कारवाई अगदी कठोर कारवाई केली असती तर त्या पोलीस आयुक्त ,सहपोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त पर्यंत तडकाफडकी सेवामुक्त केले पाहिजे होते. ज्यामुळे अशाप्रकारच्या अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळणार नाही आणि नाही कुणा निरपराधांचे..... जाणार. परंतु अशा सुपारीबाजांना,हफ्तेखोरांना? तुरुंगात टाकल्यास कुणा निरपराधांचा बळी घेताना हजारदा विचार करतील? आणि कुणा राजकीय... पुढाऱ्यांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे, पत्रकारांचे आयुष्य उध्वस्त करताना त्यांचे हात थरथरल्या शिवाय राहणार नाही. मग, त्यासाठी कुणा पोलीस प्रशासनातील ही पोलीस अधिकाऱ्यांचा वा पोलीसांचा बळी जाता कामा नये.

: त्यासाठीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री महोदयांनी देखील सामान्य जनते सह विरोधी पक्षीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना शिक्षकांना, चित्रकारांना, पत्रकारांना, वकिलांना, अभियंत्यांना, साहित्यिकांना, उद्योगपतीना आदीसारख्या सर्व घटकांना दडपशाहीने दडपून न टाकता समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाऊले उचलावी तरच लोकशाहीला सोन्याचे दिवस येतील. कारण तुम्हा आम्हा आणि सर्वांच्या रक्षणासाठी सरहदीवर जे जवान तैनात आहेत, जी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून आपले रक्षणार्थ उभे ठाकले आहे त्यांच्या त्यागाचे काय? त्या ,शहिदांच्या, क्रांतीकारांच्या बलिदानाचे काय?
म्हणून 
ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी...
जो शहीद हुअ हे उनकी याद करो कुर्बानी!!!!
जय हिंद... जयहिंद... जयहिंद.....

  • सुरेश गायकवाड
  • मुंबई 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com