देशातील विविध राज्यांमधील ज्या राजकीय पक्षांचा इन्डीया आघाडीत किंवा एनडीए आघाडीत समावेश नाही. अशा राजकीय पक्षांना एकत्र करून त्यांची तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली असून राष्ट्रीय पातळीवरील बहुमताच्या तिसऱ्या राजकीय आघाडीला 'राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा' असे नाव देण्याची विधिवत घोषणा करण्यात आली असल्याचे आघाडीचे राष्ट्रीय समन्वयक वामन मेश्राम यांनी आज मुंबईत दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी याबाबत माहिती दिली.
भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त प्रयत्नाने 51 राजकीय पक्षांशी संपर्क साधून 28 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये देशातील तिसरी बहुपक्षीय राजकीय आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी 32 पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. देशातील विविध राज्यांतील राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आघाडीत एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक राजकीय पक्षांचा समावेश असलेली तिसरी राजकीय शक्ती उभी करण्याची नितांत गरज आहे असल्याचेही मेश्राम म्हणाले.
याबाबत राष्ट्रीय स्तरावर 28 सप्टेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या चार बैठका दिल्लीत झाल्या. देशातील विविध राज्यांतील एससी, एसटी, ओबीसी अल्पसंख्याकांचे ८३ राजकीय पक्ष राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आघाडीत सामील झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील मा. ॲड. अण्णाराव पाटील, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र विकास आघाडी आणि निमंत्रक, महाराष्ट्र विकास समिती, महाराष्ट्र राज्यात सुमारे 9 पक्षांचा समावेश आहे. जो राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा (तिसरा टप्पा) मध्ये समाविष्ट आहे.
आज संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. एससी आणि एसटीवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. आदिवासी समाज त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीतून विस्थापित होत आहेत. भटक्या जमाती वेगळ्या केल्या जात आहेत, मागासवर्गीयांची जातीच्या आधारावर गणना केली जात नाही. देशाची अर्थव्यवस्था पोकळ झाली आहे, वाढती बेरोजगारी आणि महागाईने तरुण आणि गरिबांचे कंबरडे मोडले आहे. वरील सर्व समस्यांवर उपाय म्हणजे राष्ट्र परिवर्तन मोर्चा असल्याचे यावेळी वामन मेश्राम म्हणाले.
इन्डीया आघाडीत समावेश होण्याबाबत राष्ट्र परिवर्तन मोर्चाच्या सर्व घ''क पक्षांशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल. आज सर्व परिवर्तनवादी, मानवतावादी पक्षांपुढे केवळ भाजपला २०२४मध्ये सत्तेतून पायउतार करणे हेच उद्दीष्'' आहे. त्यामुळे ही लढाई सर्व समविचारी पक्षांना एकत्रीत होऊन लढावी लागणार आहे. तेव्हा उद्या इन्डीया आघाडीने समान धोरण कार्यक्रम निश्चित केल्यास त्याचाही विचार केला जाईल. आज मोदी सांगत आहेत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. मात्र ज्या देशावर ४०५ लाख, करोड इतके कर्ज आहे तो कोणत्या पद्धतीने जगातील तीसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल हे प्रसार माध्यमांनी सांगायला हवे. ज्या देशावर भाजपचे मोदी सरकार येण्याआधी केवळ ५४ लाख करोड कर्ज असणाऱ्या या देशावर आज इतके प्रचंड कर्ज असतानाही कोणताही मिडीया याबाबत जनजागृती करत नाही याबाबत मेश्राम यांनी यावेळी खंत व्यक्त केली.
0 टिप्पण्या