Top Post Ad

... तर त्यांच्याइतके आपणही जबाबदार


  बिहारमध्ये नितीशबरोबर पुन्हा कधीच युती करणार नाही असे छाती बडवून सांगणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा सत्तेसाठी नितीशकुमार यांच्या दरवाजात पायघड्या टाकल्या. काहीही करून सत्ताच पाहिजे.  २०२४ मध्ये सत्ता आली नाहीतर जेलची हवा आपल्यालाही खावी लागणार अशी भीती कदाचित मोदी, शहा यांच्यासह संघ, व  भाजपच्या अनेक नेत्यांना वाटू लागली की काय अशी यावरून शंका येते. सत्तेच्या मस्तीत जगत असतानाही तुरुंग, बेड्या समोर दिसत असल्याने ते संतुलन हारवून बसल्यासारखे वागत आहेत. नैतिक अनैतिक यामध्ये त्यांना फरक दिसत नाही. बिहारमध्ये नितीश व भाजपची जी युती पुन्हा स्थापन झाली आहे. ती अनैतिकतेचा कळस आहे. पण ते सत्ता जाण्याच्या भीती पोटी  करावे लागले. अशा अनेक अनैतिक घटना भाजपला कराव्याच लागणार आहेत. 

अनैतिकपणाच्या दलदलीत पुरते फसले असल्याने भाजपचे मोदीसरकार करीत असलेल्या हरकती यापुढे अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच  विरोधकांना धमकावणे अद्यापही सुरू आहे. जे घाबरतात ते सरळ भाजपात जातात. अन् जे घाबरत नाहीत, ते या धर्मांध शक्तींशी मुकाबला करण्यासाठी अधिक आक्रमक होत आहेत. राहुल गांधी, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत ही काही नाव आहेतं ज्यांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडविली आहे. आज भाजपाचे मोदी सरकार राज्यातील विरोधकांची लोकनियुक्त सरकारं पाडण्याचे व आमदारांचा घोडेबाजार करीत आहे, ही लोकशाही व संविधान विरोधी कृती असून ती मतदारांचा ही अपमान व अवमान आहे,  विरोधकांना संपविण्यासाठी ईडी अन् सीबीआयचा गैरवापर करीत ज्या राज्यात निवडणुका होत आहेत, होणार आहेत अशा राज्यांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर या सीबीआय व ईडीच्या धाडी पडत आहेत. हे जगजाहीर आहे, सर्वत्र चर्चाही होत आहे.  सर्वांना दिसत आहे. दिसत नाही ते फक्त गोदी मिडियाला. 

     ईडीच्या धाडीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत  सोरेन २४ तासासाठी मिडियापासून दूर राहिले. या दरम्यान, त्यांनी आपल्या सल्लागारांशी. पक्षातील नेत्यांशी चर्चा केली. पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री म्हणून जे करणे गरजेचे होते. तेच  त्यांनी केले. पण इकडे मिडिया हेमंत सोरेन यांना फरार घोषित करून मोकळा झाला. कुठल्या जेलमध्ये कसा राहणार यावर चर्चासत्र प्रसारित करीत होती. यावेळी भाजपचे सर्व नेते गप्प होते.  केवळ गोदी मिडिया व अंधभक्तांची फौज जोरदार चर्चा करीत होती. आपली वफादारी मालकाच्या नजरेत यावी म्हणून या गोदी मिडियात चढाओढ सुरू होती. हे करीत असताना किमान पाळायची पथ्य ही त्यांनी पाळली नाहीत. आदिवासी जमात ही जंगली आहे. जंगलात राहण्याच्याच लायकीची आहे, असे बोलण्यापर्यंत त्याची मजल गेली.  ज्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती एक आदिवासी आहेत. त्या देशात आदिवासी समाजाबाबत इतक्या खालच्या पातळीवर बोलणे. याला काय म्हणावे. अन् त्यामुळे दलाल अँकर सुधीर चौधरीवर गुन्हा दाखल झाला आहे. पण भाजपच्या या कारभारात त्या गुन्ह्याचे काय होणार हे सुज्ञास न सांगणे. सोरेन यांना अटक होण्याच्या अगोदरच गोदी मिडियाने दोषी ठरवून त्यांना जेलमध्ये टाकले होते. अशी एक नाही अनेक उदाहरणे आहेत.  या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे  ती म्हणजे ईडी, सीबीआय अन् गोदी मिडियाच्या भरवशावर देशातील भाजपचे मोदीसरकार चालत आहे. ईडी, सीबीआय अन् गोदी  मिडिया सोबत असल्यानेच भाजपचे मोदी सरकार हम करे सौ वागत आहे. 

 1700 कोटी सिडको खारघर जमीन घोटाळा / मुंबई डीपी घोटाळा /  2800 कोटी युएलसी जमीन घोटाळा  / महा ई- परीक्षा पोर्टल घोटाळा.   206 कोटी चिक्की घोटाळा / 7200 कोटी टी.एच.आर घोटाळा.   एम पी मिल कंपाऊंड एफएसआई घोटाळा 1200 कोटी.   तूर भरडाई घोटाळा 2000 कोटी / लोकमंगल बोगस कागदपत्रे अनुदान लाटणे घोटाळा.   तोरणमाळ हिल रिसॉर्ट घोटाळा 49 कोटी रुपये / रावळ बँक घोटाळा 369 कोटी रुपये / गड किल्ले हॉटेल्स बार ला विक्री करणे घोटाळा.  अग्निशमन यंत्र खरेदी घोटाळा 191 कोटी रुपये / 114 कोटी रुपये राष्ट्रपुरुष तस्वीर व अर्ली रीडर्स बुक खरेदी घोटाळा.   आदिवासी विद्यार्थी साहित्य खरेदी घोटाळा.   तूरडाळ घोटाळा.   पुणे जमीन घोटाळा. तसेच अंगणवाडी मोबाइल खरेदी, सॅनिटरी नॅपकिन घोटाळा. बीएमसी रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा. धर्मा पाटील मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दोंडाईचा भुसंपादन घोटाळा.  एकही वीट न लावता 80 कोटी शिवस्मारक घोटाळा.  वैद्यनाथ साखर कारखानावर सुमारे 900 कोटी रुपयाचे कर्ज थकीत. शेकडो कोटींचा तोटा.  भिमा पाटस कारखान्यावर ५०० कोटीच्या कर्जाच्या खाईत गेल्यामुळे निराणी या खाजगी व्यक्तीला 25 वर्षासाठी चालवला दिला  अशा अनेक घोटाळ्यांची यादी सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. तरीही कोणताही मिडीया याबाबत चर्चा करीत नाही किंवा ईडी चौकशी करीत नाही.  

    मिडिया, प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथा खांब आहेत. याबद्दल कुणाच्या ही मनात कसली ही शंका असण्याचे कारण नाही. भले ही आजचा मेन स्ट्रीम मिडिया गोदी मिडिया होऊन मोदींची चाकरी करीत असेल, दलाली करीत असेल. पण तो स्वतः ही स्वतः ला चौथा खांबच मानत आहे. आज भाजपसरकार जे काही या दलाल गोदी मिडिया, ईडी, सीबीआयला सोबत घेऊन करीत आहे. ती शेवटची धडपड आहे. देश अन् देशातील जनता  अधिक काळ हे सहन करणार नाही. हे खरे. मात्र हा सर्व प्रकार जनतेच्या दरबारात मांडण्याचा जोरदार प्रयत्न झाला पाहिजे. भाजपच्या मोदीसरकारला २०२४ साली सत्तेवरून पायउतार करण्यासाठीं हे फार गरजेचे आहे. हे न करताच भाजपच्या मोदीसरकारला सत्तेवरून पायउतार करू, अशा भ्रमात आपण राहिलो तर देशाचें वाटोळे करण्यात त्यांच्याइतकेच आपणही जबाबदार असू, म्हणूनच प्रसिद्धी माध्यमांनी अर्थात मिडीयाने आता तरी आपली भूमिका चोख बजावली पाहिजे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com