Top Post Ad

दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक यांच्यासह आरोग्यदूत मंगेश चिवटे, पत्रकार विवेक भावसार याचा सन्मान


   मुंबई मराठी पत्रकार संघ येथे होणार 24 फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा

 'पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार' या पुरस्काराने दैनिक महासागर चे संस्थापक संपादक श्रीकृष्ण चांडक यांना सन्मानित करण्यात येणार असून त्यासोबतच आरोग्यदूत मंगेश चिवटे, पत्रकार विवेक भावसार यांनाही सन्मानित केले जाणार आहे. धगधगती मुंबई या वृत्तपत्राच्या वतीने  मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शनिवार दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता  समारंभ पूर्वक मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

  धगधगती मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनिय व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, आजपर्यंत ७५ लोकांना सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, उद्योग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी सुद्धा राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना, आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा देखील सन्मान करण्यात येतो. या वर्षी पत्रकारिता जीवन गौरव - श्रीकृष्ण चांडक  सर, संपादक दै. महासागर, सहकार रत्न -  हरिश्चंद्र बाबलिंग जंगम, शिक्षण रत्न -  जगदीश मरागजे सर,  युवा राजकीय नेता - ऍड संग्राम शेवाळे, वारकरी भूषण - ह.भ.प. प्रवीण शेलार महाराज, समाज भूषण -  एम.ए. सुसाई (फादर), समाज रत्न - श्री दीपक लोखंडे समाजसेवक, उद्योग रत्न - कौतिक दांडगे - महाराष्ट्र बाजार पेठ अध्यक्ष, 

पत्रकारिता गौरव - विवेक भावसार- राजकीय विश्लेषक,जेष्ठ पत्रकार (मंत्रालय), तसेच   कलारत्न  - दिगंबर नाईक, कलारत्न -  सिने अभिनेते किरण माने, आरोग्यदूत-वैद्यकिय रत्न - मंगेश चिवटे, कक्षप्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी विभाग,  युवा उद्योजक - श्रेयस मोहन नायकवडी, साहित्य रत्न  - इसहाक बिराजदार,  कायदा रत्न (भूषण) - ऍड रिना संदीप कोरडे, संगीत रत्न (कोयना भूषण) राजाराम बुवा शेलार  (भजन सम्राट) नवी मुंबई, शिवाजीराव माटेकर - सहकार क्षेत्र व्यवस्थापन रत्न, गोरखनाथ पोळ सर - मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्था नवी मुंबई या मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी कर्तुत्ववान महिलांचाही सन्मान करण्यात येणार आहे ज्यामध्ये ममता सकपाळ (सिंधुताई सकपाळ यांच्या कन्या) अध्यक्षा- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था पुणे,  सौ. कविता पांचाळ - महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट कापसेवाडी, जावळी,सातारा, डॉ. प्राची ढोले - पत्रकारीता  महिला गौरव पुरस्कार (मुंबई), सौ. विनया महेश निंबाळकर (स्नेहग्राम सामाजिक व शैक्षणिक संस्था) व अजित फाऊंडेशन, बार्शी-सोलापूर, ऍड. स्मिता चिपळूणकर - कायदेविषयक सल्लागार यांचा समावेश आहे. 

 धगधगती मुंबई हे शासन यादीवरील वृत्तपत्र १४ वर्ष पूर्ण करून २०, फेब्रुवारी २०२४ रोजी १५ व्या वर्षात पर्दापण करत आहे.  वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे. जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे वृत्तपत्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाबरोबर इतर कार्यक्रम राबविले जातात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com