Top Post Ad

आझाद मैदान येथील उपोषण आंदोलनात सह्यांद्री आदिवासी कोळी जमात महिला संघही सहभागी


 भारतीय अस्मिता पार्टी आदिवासी विद्यार्थी, गरीब मजूर शेतकरी कर्मचारी यांच्या हितार्थ दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे आज या आंदोलनास 17 दिवस झाले तरी सरकार याची दखल घेत नाही.  आज देखील गरीब आदिवासीना त्यांच्या हक्काच्या सरकारी नोक-या रिक्त असूनही मिळत नाही. त्यापासून आदिवासी युवकांना चार हात दूरच राहवे लागत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या जगदीश बहिरा सिव्हील अपील क्रमांक ८९२८/२०१५ दिनांक ६ जुलै २०१७ च्या निर्णय नुसार मूळ आदिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी बहाल करण्यात आलेल्या हजारो सरकारी नोकऱ्या अद्यापही प्रलंबित आहेत. परंतु सरकार त्याच रिक्त नोकऱ्या अधिसंख्य म्हणून प्रतिवर्ष कालावधी वाढवून बोगस अदिवासींना देत आहे.  
हा प्रकार मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा आहेच त्याच समवेत हजारो मूळ आदिवासींना नोकऱ्या पासून दूर ठेवणारा एक प्रकारे आसूडच आहे. या विरोधातही आमचा पक्ष लढा देत असून  धनगर हे कायद्याने तसेच आदिवासीसांठी लागु असलेल्या सर्व निकषांनुसार आदिवासी नाहीतच. तेव्हा २0  नोव्हेंबर 2023 रोजी काढलेला धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करणे बाबतचा अभ्यास गट तात्काळ रद्द करावा. मा.जगदीश बहिरा यांच्या 2017 च्या निर्णय नुसार राज्यातील 12500 आदिवासींची पद भरती विनापरीक्षा गुणवत्ता सिनियरीटी नुसार तात्काळ करावी. यासाठी आझाद मैदान येथे सुरू असलेले उपोषणास सह्यांद्री आदिवासी कोळी जमात महिला संघाने जाहीर पाठिंबा दिला. आदिवासीं महिला वर्गाने  या आंदोलनास कंबर कसली असून आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या आंदोलनाच्या समर्थनार्थ संघाच्या मंदाताई कचरे, सुशिलाताई कोकणे, रंजनाताई हिले, इंदुताई भांगे, कविताताई आढळ, कमलताई डगळे, भारतीताई उंडे, मिनाताई कोंडार यांच्यासह अनेक महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com