Top Post Ad

प्रगतीशील भारताच्या निर्मितीसाठी 'राष्ट्रीय विजय मोर्चा' आघाडीची स्थापना


 केंद्रातील व राज्यातील विद्यमान सरकार जनताभिमुख नसून मनमानी कारभार करत आहे. देशात जाती-धर्मा मध्ये द्वेष पसरवून अशांतता पसरवण्याचं व भ्रष्टाचाराला खतपाणी देण्याचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणूनच भ्रष्टाचार मुक्त व प्रगतीशील भारताच्या निर्मितीसाठी 'नवरत्न भारत' ही संकल्पना घेऊन आम्ही 'राष्ट्रीय विजय मोर्चा' या आघाडीची स्थापना करून जनतेसमोर एक जबरदस्त पर्याय उपलब्ध करून देत आहोत. देशातील  ३६ पक्षांना एकत्र घेऊन येत्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमिवर 'राष्ट्रीय विजय मोर्चा" या नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली असल्याची घोषणा सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ पारेख यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. 

याबाबत अधिक माहिती देतांना पारेख म्हणाले,  राष्ट्रीय विजय मोर्चा सत्तेत आल्यावर सर्वप्रथम कृषी क्षेत्र व ग्रामीण जनतेच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याचं आमचं ध्येय आहे. कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सींचन व्यवस्था पुरविण्याचं तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालला योग्य दर मिळवून देणं, गाव-तालुक्यांमध्ये खरेदी-विक्री व्यवस्था, शीत गृह व शीत परिवहन व्यवस्था, गावागावामध्ये शहरातील सुख-सोयी, कृषी विद्यालय, महाविद्यालय व विश्वविद्यालये अधिक संख्येने स्थापन करून ग्रामीण जनजीवन उंचावण्याचा आमच्या आघाडीचा प्रयत्न राहील. गोरगरीबांसाठी अल्प दरात अन्नदान केंद्र उपलब्ध करून देणे, झोपडयांच्या बदल्यात ५०० चौ. फूटाचे पक्के घर, ज्येष्ठ नागरिकांसाठी (५८+) सरकारतर्फे मोफत आरोग्य विमा, पेंशन, मोफत वृध्दाश्रम आदी कल्याणकारी योजना राबविल्या जातील. इनकम टॅक्स भरणाऱ्या व्यापाऱ्यांना पेंशन योजना, महिलांनां स्वावलंबनासाठी व त्यांचं सशक्तिकरण व्हावं या हेतुने लघु उद्योगासाठी नाम मात्र व्याजदरात कर्ज योजना, जनतेच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करून तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे करणार. पाचवी पर्यंत सर्वानाच मोफत शिक्षण देणार, सर्व महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेतले जाणारे डोनेशनवर कायद्याने बंदी आणणार,  शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी निवास व इतर सुविधा पुरविणार त्याच बरोबर २० ते २५ वयोगटातील बेरोजगार तरुणांना रोजगार प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देतानाच सर्वच बेरोजगाराना बेरोजगार भत्ता देण्याचा आमचा उद्देश असल्याचेही पारेख म्हणाले.

आरोग्य सेवेत सर्वतोपरी बदल करून सरकारी रुग्णालयांचं आधुनिकी करून सर्व रुग्णालयांत मोफत प्रसुतिकरण योजना व सरकारी रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या भवितव्यासाठी विविध योजना राबविण्याचा आमचा संकल्प राहील. घरोघरी सौर ऊर्जा उपलब्ध करून देणार, रिक्शा, टॅक्सी व इतर सार्वजनिक परिवहन सेवा, सी.एन.जी. बॅटरी व सौर उर्जेवर चालविण्यासाठी सरकारी योजना राबविणार, प्लास्टीक पिशव्यांवर पूर्ण बंदी घालणार व त्याच बरोबर सरकार तर्फे मोठयाप्रमाणात वृक्षारोपण व वनीकरण योजना राबविणार. शहरी भागातील जनतेसाठी कीमान १५० लिटर मोफत पाणी, दर महिन्याला ग्रामीण व शहरीभागातील सर्वानांच कीमान १०० युनिट मोफत वीज देणार तसेच भ्रष्टाचार मुक्त भारत बनवून, शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणून जनजीवन सुरळीत करण्यासाठी आम्ही कटिबध्द राहू. असे प्रतिपादन यावेळी जमलेल्या सर्व पक्षांच्या प्रमुखांनी केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com