Top Post Ad

मातंग समाजाच्या विविध मागण्यांकरिता आझाद मैदानात धरणे आंदोलन


   अनुसूचित जातीचे आरक्षण आरक्षणाचे अ ब क ड असे वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.  अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्टीची निर्मिती करण्यात यावी. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकरिता  28 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य  संघटनेच्या निवडक पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले.  या माध्यमातून मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीने व जिव्हाळ्याच्या मागण्या संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र शासनाने नुकतेच या अधिवेशनात अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्टीची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा केली असल्याने यावेळी संघटनेच्या वतीने शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. 

ज्या ठिकाणी मांगवाडा आहे त्या ठिकाणी आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व्यायामशाळा तसेच मुक्ता साळवे अभ्यासिकांची निर्मिती करण्यात यावी.  क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे बजेट किमान 500 कोटी करण्यात येऊन समाजातील युवकांना थेट कर्ज पुरवठा करण्यात यावा.  मुंबई मधील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात यावे (सन २०१५ च्या झोपडपट्टीना अधिकृत मान्यता द्यावी) या आणि इतर या आणि समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करून, या मागण्यांवर लवकरात लवकर शासकीय स्तरावरून निर्णय घेऊन, त्याची योग्य अंमलबजावणी करून मातंग समाज हा सर्वच क्षेत्रांमध्ये गतिमान करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. 

महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत प्रथम क्रमांकाची लोकसंख्या ही मातंग समाजाची असून मातंग समाज हा विकासाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेले जीवन जगत आहे. मातंग समाजाच्या प्रगतीसाठी किंवा विकासासाठी शासकीय स्तरावरून विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्‌योगिक या सर्वच क्षेत्रात मातंग समाज मागासलेला आहे. एवढी मोठी लोकसंख्या मागासलेल्या केवळ शासकीय उदासीनतेमुळे किंवा शासकीय योजना योग्य पद्धतीने राबवल्या गेल्या नसल्यामुळे मागासलेले जीवन जगत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळेच आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य अत्यंत जबाबदारीने संपूर्ण राज्यात मातंग समाजाच्या युवकांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औ‌द्योगिक, स्पर्धात्मकता वाढावी यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. जवळजवळ तीन वर्षापासून आधुनिक लहुजी सेनेच्या माध्यमातून गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवरून समाजाला शासकीय स्तरावर दखलपात्र करण्यासाठी काम करत आहे. त्यासाठीच आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने ठराविक निवडक पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने आज 28 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com