महाराष्ट्र शासन - उद्योग संचालनालय मुंबई कार्यालय पुरुस्कृत, मैत्री मुंबई व जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे* यांच्या सहकार्याने तथा उद्योग विभागा अंतर्गत कार्यरत *MCED ठाणे* कार्यालया च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत *महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जाती (SC)* * प्रवर्गातील युवक - युवती, महिला व पुरुषां करिता *45* दिवसांचा, *निवासी, मोफत,सोलर व पॅकेजिंगवर आधारित दोन तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत .
*1) सोलर PV इंस्टॉलेशन प्रशिक्षण कार्यक्रम :* ( तांत्रिक प्रशिक्षण हे सोलर प्रशिक्षण क्षेत्रात *देशात अग्रमांनाकित असलेल्या तथा जगप्रसिद्ध असलेल्या टाटा कं.* च्या टाटा पॉवर स्किल डेव्हलोपमेंट इन्स्टिटयूट [ *TPSDI* ] ) तर्फे देण्यात येणार आहे. सोलर प्रशिक्षणात सोलर संदर्भातील अत्यन्त उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोलर पॅनल्स ची उभारणी - जोडणी,सोलर पॅनल्स म्हणजे काय, उच्च दर्जाच्या सोलर पॅनल्स ची निवड कशी करावी तथा मोठया प्रमाणात सोलर एनर्जी ची निर्मिती करणारे सोलर पॅनल्स कोणते या बद्दल ची माहिती, सोलर पॅनल्स चा सोलर एनर्जी निर्मितीत सहभाग, उपयोगिता व महत्व, सोलर PV सिस्टिम्स, सोलर PV इंस्टॉलेशन,सोलर PV ऑपेरेशन्स - कमिशनींग सोलर PV ची देखभाल व दुरुस्ती,सोलर साईट ची निवड, सोलर प्लॅन्ट ची उभारणी,सोलर एनर्जी ची निर्मिती, अँगल्स ची जोडणी, सोलर फंडामेंटल्स, सोलर मोड्युल्स, ट्रबल शूटिंग, प्रत्यक्ष सोलर साईट वर प्रॅक्टिकल्स व प्रॅक्टिस इत्यादी अभ्यासक्रम *टाटा...* च्या *25 वर्षां* पेक्षा अधिक चा अनुभव असलेल्या, उच्च दर्जाच्या तांत्रिक प्रशिक्षका तर्फे शिकविण्यात येणार आहे.
*2)“पॅकेजिंग अँड डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम "* ( तांत्रिक प्रशिक्षण हे *भारत सरकारचा नामांकित उपक्रम* असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग *( IIP) मुंबई* तर्फे देण्यात येणार आहे.
" पॅकेजिंग अँड डिझायनिंग प्रशिक्षण " *IIP मुंबई* तर्फे हे अत्यन्त उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पॅकेजिंग संदर्भातील विविध मशिन बनविण्या संदर्भातील ज्ञान,पॅकेजिंग फ्रेश फ्रुट अँड प्रोसेस फूड, पॅकेजिंग मटेरियल,बॉक्स रोल, पॅकेजिंग डिझाईन, प्रिंटिंग, लेवल ऑफ पॅकेजिंग, प्रोडक्ट पॅकेजिंग डिझाईन, इ. प्रॅक्टिकल्स व प्रॅक्टिस इत्यादी अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट मधील प्रदीर्घ अनुभव असलेल्या व उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांच्या टीम मार्फत लाभार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. सोलर व पॅकेजिंग प्रशिक्षणात सोलर व पॅकेजिंग क्षेत्रातील उद्योग - व्यवसायातील अनेक संधी, मार्केटिंग, यशस्वी उद्योजकांचे मनोगत, रजिस्ट्रेशन, सोलर व पॅकेजिंग उद्योग - व्यवसाय सुरु करण्यासाठी च्या शासनाच्या अनेक कर्ज व सबसिडी योजनांची माहिती, बँकेच्या विविध कर्ज योजनांची सवीस्तर माहिती, कागदपत्रासह MCED तर्फे दिली जाणार आहे. दोन्ही प्रशिक्षण संपल्या नंतर लाभार्थ्यांना सोलर व पॅकेजिंग क्षेत्रात उद्योग - व्यवसाय सुरु करण्या बाबत MCED तर्फे हॅन्ड होल्डिंग सपोर्ट देखील दिला जाणार आहे.
यशस्वी रित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना *शासनाचे महत्वपूर्ण असणारे प्रमाणपत्र* दिले जाणार आहेत.
*मुंबई* येथे उपरोक्त दोन ही प्रशिक्षण हे *दि.10/02/2024 ते दि.25/03/2024* दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम हे *मोफत- Free* असून कार्यक्रमात सहभागी होहू ईच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील SC लाभार्थ्यांचे *शिक्षण : सोलर साठी -किमान 10 वी.+ ITI / डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेकॅनिकल, फिटर, इन्स्ट्रुमेंटेशन ) आवश्यक तर पॅकेजिंग प्रशिक्षण कार्यक्रमासाठी किमान 7 वी*, व *वय 18-50* पर्यंत असणं गरजेचे असून प्रशिक्षणात सहभागी होणे करिता दि.08/02/2024 रोजी च्या मोफत - FREE उद्योजकता परिचय कार्यक्रम व मुलाखत कार्यक्रमासाठी* अचिएव्हर्स कॉलेज ऑफ मॅनॅजमेण्ट, संतोषी माता रोड, जोशी बाग,कल्याण पश्चिम, कल्याण येथे दुपारी 12 :00 वा. *उपस्थित राहणे अत्यावशक आहे.*
अधिक माहिती व अर्जा साठी *संपर्क :*
- 1) सोलर प्रशिक्षण :
- डॉ. संध्या येवले,कार्यक्रम समन्व्यक, MCED, ठाणे 7020616492,
- श्रीमती माधुरी गाडे,कार्यक्रम समन्व्यक, MCED, ठाणे 7208602550
- 2) पॅकेजिंग प्रशिक्षण :
- वैशाली सोनावणे, कार्यक्रम समन्व्यक, MCED, ठाणे *7038760047
- .विवेक बच्चाव, कार्यक्रम समन्व्यक, MCED, ठाणे *+919653351664
- संजय गायकवाड,कार्यक्रम समन्व्यक, MCED, ठाणे *+919881846413
- जिल्हा प्रकल्प अधिकारी,* MCED, ठाणे *7774053014
उपरोक्त दोन मोफत - FREE प्रशिक्षण कार्यक्रमां ची माहिती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील *SC* युवक - युवतीं पर्यंत पोहचवावी असे आवाहन राजेश कांदळगांवकर ( विभागीय अधिकारी, MCED, मुंबई ), श्रीमती सीमा पवार (महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे ) व विजू सिरसाठ ( उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे ) यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या