Top Post Ad

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जनजागृती मोहीम


 मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने "आजचा निश्चय, पुढचं पाऊल" ही ७४ पानी पुस्तिका लवकरच प्रसिध्द करणार आहोत, या पुस्तिकेचे मुखपृष्ठ   आज प्रसिध्द करीत आहोत. त्याकरिता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रमोदराव जाधव यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रमोद जाधव, नरेश मोरे, प्रकाश निपाणे, धर्मराज जाधव, शामराव मोहिते, सचिन शिंदे, अशोक देसाई, वाबळे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पुस्तिकेच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तिकेबाबत अधिक माहिती देतांना जाधव म्हणाले,   ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवावे, प्रगत शेती, विधिसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्याच MPSC च्या वाटा, स्मार्ट फोन सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी १२५ शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता, अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत असणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची संकल्पना आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबाना भेट देऊन वितरीत करणार आहेत. त्यामुळे सुमारे ३ लाख व्यक्तीच्या पर्यंत समाज संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम असून आपल्या जिल्ह्यामध्ये महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद हे जनजागृतीसाठी घरोघर संपर्क साधणार आहेत. 

या पुस्तिकेच्या माध्यमातून QR Code च्या द्वारे नामवंत व्यक्तींच्या समाजाला संदेश तसेच विविध प्रकारची माहिती महासंघातर्फे बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ. गिरीष जाखोटिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ डॉ. अरुण अडसुळ, ज्येष्ठ विधिज्ञ मा. उज्वल निकम, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्था मा. बाबा भांड, अध्यक्ष बीव्हीजी ग्रुप पुणे मा. हनुमंतराव गायकवाड, अध्यक्ष सह्याद्री फार्म नाशिक मा. विलास शिंदे, चेअरमन मगरपट्टा सिटी पुणे मा. सतीष मगर, अध्यक्ष ग्लोबल कोकण स्वराज्य भूमी अभियान मा. संजय यादवराव, इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत, संवाद कौशल्य, वकृत्व कला प्रशिक्षक मा. शशांक मोहिते इ. मान्यवरांचे संदेश या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरुन दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com