Top Post Ad

ठाणे जिल्हयात आदिवासी न्याय महाअभियान


  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,शहापूर यांच्यामार्फत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या आदिम(कातकरी) वस्त्यामध्ये, गावांमध्ये, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानांतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या पीएम जनमन शिबिरांचे आयोजन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त दीपककुमार मीना व ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी  राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले आहे.

      या शिबिरामध्ये आदिम (कातकरी) समाजाच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड ,रेशन कार्ड, पी.एम,उज्वला योजना, आयुष्यमान भारत, पी.एम विश्वकर्मा, पी.एम.जनधन योजना, घरकुल  योजना, पी.एम.गरीब कल्याण अन्न योजना, पी.एम.किसान सन्मान निधी योजना ,किसान क्रेडिट कार्ड योजना, सुकन्या समृद्धी योजना, मातृ वंदना योजना, पी.एम.जीवन ज्योती बिमा योजना, पी.एम सुरक्षा बिमा योजना, पेंशन योजना, पी.एम.सुरक्षित मातृत्व अभियान, पी.एम.नॅशनल प्रोग्राम, सिकलसेल मिशन बाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. याच शिबिरात सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येतात. हे  दाखले, प्रमाणपत्र, तसेच विविध योजनांचे कार्डचे वाटप दि.१५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे. 

    या शिबिरास तहसिल कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी व तालुका कृषी विभाग,पोस्ट ऑफिस,उज्वला योजनेचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीकृत बँकेचेअधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, पुरवठा अधिकारी,आदिवासी विकास निरीक्षक ,आशा वर्कर हे एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,शहापूर यांनी आतापर्यंत शहापूर, भिवंडी, मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भागात जावून ही शिबिरे घेतली असून शेकडो लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. 

   अशाच प्रकारे दि.०८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० पासून ते दुपारी ०४ वाजेपर्यंत , ग्रामपंचायत कार्यालय,सोगाव ता.शहापूर, ग्रामपंचायत कार्यालय, वेळुक(वाशाला) ता.शहापूर,  मंगल कार्यालय, चिखलगाव (पो.खरिवली सो.) ता.शहापूर, ग्रामपंचायत कार्यालय, म्हसा, ता. मुरबाड, ग्रामपंचायत कार्यालय,आसोसे ता.मुरबाड,ग्रामपंचायत कार्यालय, दाभाड ता.भिवंडी,ग्रामपंचायत कार्यालय,मालबीडी ता.भिवंडी तर दि. ०९ जानेवारी २०२४ पासून सकाळी १० पासून ते पासून दुपारी ४ वाजेपर्यंत समाज मंदिर, दोऱ्याचापाडा (अंदाड) ता.शहापूर, ग्रामपंचायत कार्यालय, शेणवे ता.शहापूर, जि.प. शाळा, खरिवली (तुते) ता.शहापूर,जि.प.शाळा कळमगाव (कानविंदे) ता.शहापूर, तसेच शासकीय आश्रमशाळा खुटल (बारागांव) ता.मुरबाड येथे पीएम जनमन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . 

यापुढे दर दिवशी घेतल्या जाणाऱ्या पीएम जनमन शिबिरांची संख्या 10 पर्यंत वाढविण्यात येणार असून कल्याण, अंबरनाथ, ठाणे, बदलापूर येथेही शिबिरे सुरू करणार असल्याचे श्रीमती. तेजस्विनी गलांडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी दिली असून यासाठी विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे अमूल्य सहकार्य लाभत आहे. पीएम जनमन शिबिरे यशस्वीरित्या होऊन त्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, जि.ठाणे चे प्रकल्प अधिकारी  राजेंद्रकुमार हिवाळे व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत.  या शिबिरामध्ये आदिम(कातकरी) समाजाच्या सर्व लाभार्यांनी पीएम जनमन शिबिरामध्ये येऊन योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com