Top Post Ad

आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे? - उद्धव ठाकरे


 

आपल्या बापाचा चेहरा वापरून आपल्याला कुणी मतदान देणार नाही, हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी दुसऱ्याच्या बापाचा राजकीय पक्ष पळवला. आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे? त्यांना अपात्र का केलं नाही?  विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत,  ज्या पक्षाची स्थापना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली, तो पक्ष कुणाचा हे ठरविणारे हे कोण टिकोजीराव? लहान मुलाला विचारलं तर तो ही सांगेल की शिवसेना कुणाची? मुळात शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. त्याच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला धरून नार्वेकरांनी आजचा निर्णय दिलाय,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वागणूक आधीचपासून संगनमत झाल्याची दाखवणारी होती. लोकशाहीची हत्या करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का याची शंका आपण आधीच व्यक्त केली होती. राहुल नार्वेकर यांनी स्वत:हून आरोपीची दोनदा भेट घेतली त्याचवेळेला हा निकाल अपेक्षित होता,  आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतर कसे करावे, अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवलं. त्यांनी स्वत तीन चार वेळा पक्षांतर केलंय. भविष्यातील मार्ग त्यांनी मोकळा केला. सगळे नियम धाब्यावर बसून नार्वेकरांनी निर्णय दिला. आमच्यामागे महाशक्ती आहे, सुप्रीम कोर्टालाही आम्ही जुमाणनार नाही, असंच त्यांनी दाखवून दिलं. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, नार्वेकर यांनी आपल्या पदाचा, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला. सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी,  - उद्धव ठाकरे 

राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांनी केला. शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाला धक्का देऊन नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या (बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. भरत गोगावलेंचा व्हीप योग्य असल्याचेही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.  राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता मिळाली आहे. सुनावणीवेळी ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, अंबादस दानवे, वैभव नाईक, सुनिल शिंदे तर शिंदे गटाचे राहूल शेवाळे, मंगेश कुडाळकर,भरत गोगावले, बालाजी किणीकर, संजय शिरसाठ उपस्थित होते. 

शिवसेनेत 2022 मध्ये बंडखोरी झाली. शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे सुरुवातीला 16 आमदारासोबत गुवाहाटीला गेले होते. या मोठ्या घडामोडीने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरवण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर, शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटातील 14 आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी कोर्टात धाव घेतली. यावर तब्बल दीड वर्ष सूनवणी झाली.  एकनाथ यांच्याबरोबर 40 आमदारांनी बंड केलं. त्यानंतर  शिंदे गट आणि ठाकरे गटाने एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला. ज्यामध्ये 1. एकनाथ शिंदे, 2. अब्दुल सत्तार, 3. संदीपान भुमरे, 4. संजय शिरसाट, 5. तानाजी सावंत, 6. यामिनी जाधव, 7.चिमणराव पाटील, 8.भरत गोगावले, 9.लता सोनवणे, 10. प्रकाश सुर्वे, 11. बालाजी किणीकर, 12. अनिल बाबर, 13. महेश शिंदे, 14. संजय रायमूलकर, 15. रमेश बोरनारे, 16 बालाजी कल्याणकर यांना पात्र ठरवण्यात आले आहे.

राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उध्दव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविषयी आपण मिळुन लढू - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर 

'आजचा आश्चर्यकारक निकाल आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना, मुख्यमंत्र्यासह त्यांना खात्री निकाल काय लागणार याची खात्री होती. या निकालानंतर उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात यांना जावं लागेल. त्याच ठिकाणी त्यांना न्याय मिळण्याची खात्री आहे. या निकालात विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये विधीमंडळ पक्षाला महत्व दिले आहे. सुभाष देसाई यांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पक्ष संघटना महत्वाची आहे असा निकाल दिला आहे', सुप्रीम कोर्टाच्या आदेशात स्वच्छ म्हटले आहे की, व्हीपची निवड राजकीय पक्ष करेल. उद्धव ठाकरे गटाने व्हीप मोडला म्हणून शिंदेंवर कारवाई करावी असे म्हटले होते . पण त्यावर कारवाई नाही. तसेच, शिंदे गटाच्या मागणीवरुन ठाकरे गटावर व्हीप मोडला म्हणून कारवाई नाही. ही गंमतीशीर बाब आहे, - शरद पवार (पुण्यात माध्यमांशी संवाद साधतांना)

आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला आहे. सर्वकाही आधीपासूनच फिक्स झालं आहे, त्यामुळे आजच्या निकालाची केवळ औपचारिकताच आहे,  पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला महाराष्ट्रात रोड शो करणार आहे. तर आमदार अपात्रतेचा निकाल असल्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जाणार आहे. याचाच अर्थ असा आहे की, दोघांनाही मॅच फिक्सिंगबाबत पूर्ण माहिती आहे, जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतोय त्याच्यावर चर्चा होतेय. दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटना बाह्य सरकार काम करतंय, जे निर्णय घेतले जात आहेत, त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राचे संविधान पायदळी तुडवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा विधानसभेचे यांनी सुनावणी देण्यास चालढकल केले. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कामांमध्ये राजकीय रंग दाखवला. प्रोटोकॉल असं सांगतो की, एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे जात नाही. पण हे मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांच्या कॅबिंमध्ये जातात, या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या आहेत, - संजय राऊत (मुंबईत पत्रकार परिषद) 


क़त्ल हुए जज़्बात की क़सम खाकर,
बुझी हुई नज़रों की कसम खाकर,
हम लड़ेंगे साथी... हम लड़ेंगे...
जब बंदूक़ न हुई, तब तलवार होगी...
जब तलवार न हुई, 
...लड़ने की 'लगन' तो होगी !
लड़ने का ढंग न हुआ, लड़ने की 'ज़रूरत' तो होगी !!
 हम लड़ेंगे साथी...
 हम जीतेंगे
ज़ाहिर है कि हम ही जीतेंगे
जो दूर बड़ी... और मुश्किल है,
उस मंज़िल तक हम पहुंचेंगे !
 औरंगजेबाने या मुलूखावर ५१ वर्ष राज्य केलं होतं. तरीही आज हा मुलूख छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता 'हिसकावणं' सोपं असतं... पण रयतेची मनं जिंकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून बलाढ्य शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करतो . किरण माने टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com