सन २००१ पासून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य क्षेत्रात काम करणारी रेड स्वस्तिक सोसायटी,मुंबई या संस्थेद्वारे आरोग्य क्षेत्रात विविध स्तरावर सेवाभावी कामे सुरू आहेत. गरजूंना तात्काळ वैद्यकीय सेवा, मदत मिळावी या हेतूने संस्था आजही कार्यरत आहे. आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने १२ जानेवारी रोजी हॉल ऑफ कल्चर, नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे संस्थेचा २३ वा वर्धापन दिवस व पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सदर पुरस्कार वजा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक तसेच कार्यक्रमाचे संयोजक डॉ टि एस भाल यांनी केले. कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी मुंबईतील प्रेस क्लब येथे संस्थेच्या वतीने आज ९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सह-संयोजक अशोक शिंदे हे देखील उपस्थित होते.
सदर संस्थेच्या माध्यमाने समाजातील गरजू वचित अशा सर्व लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे काम केले जाते. नशामुक्ती, एड्स अवेअरनेस, आपत्तीच्या वेळी बचावकार्य व मदत पुरविली जाते सुरवातीच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर व मुंबई लोकतसाठी अंबुलन्स सेवा प्रदान केल्या होत्या व त्याद्वारे अनेक लोकाचे प्राण वाचविल्या गेले आहेत. आजही काहि ठिकाणी अंबुलन्स व शववाहिका सेवा पुरविली जात आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव, मेंदू, हृदय च्या शल्य चिकिस्ते साठी मदत पूरविली जाते.
वारकरी संप्रदायाच्या वारीच्या दरम्यान तसेच इतर मोठ्या धार्मिक कार्यक्रमावेळी संस्थेच्या वतीने अॅबुलन्स सेवा पुरविली जाते. डेंटल कॅम्पस, डोळे तपासणी व कॅट्रॅक्ट ऑपरेशन, कॅन्सर चेकअप कॅम्प इत्यादी आरोग्पासंबंधी शिबीरे आयोजित केली जातात. संस्थेद्वारे कल्याण नजीक शिवालय नावाचे १०० खाटांचे जेष्ठांसाठी अद्यावत वृद्धाश्रम चालवण्यात येते. त्याचप्रमाणे गरीब व होतकरू मुलांसाठी NIPS नावाचे पूर्वपरीक्षा तयारी केंद्र नागपूर नजीक दुर्गम भागात चालविले जात आहे. भुवनेश्वर येथे अपंगांसाठी कृत्रिम अवयव देण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षापर्यंत सुमारे 65,00,000 लोकांना आरोग्य सेवेचा लाभ पोहोचला असल्याची माहिती डॉ. भाल यांनी दिली.
0 टिप्पण्या