Top Post Ad

अखेर दिघा रेल्वे स्थानक खुले करण्यासाठी मुहूर्त मिळाला


  देशाचे प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दिघा रेल्वे स्थानक  नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील अनेक महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले हे रेल्वे स्थानक आता खुले होणार असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  ठाणे व कल्याण या २ लोकसभा मतदार संघाला जोडणारा ऐरोली - कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक गेल्या सात ते आठ महिन्यापासून धुळखात पडलेले आहे. मा. प्रधानमंत्री यांची वेळ मिळत नसल्याने हे उद्घाटन रखडले असल्याची चर्चा होती. त्यामुळे स्थानिक नागरिक व तेथे येणारा नोकरदार वर्ग रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये शासन व प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाल्याने स्थानिक खासदार राजन विचारे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात संसदेत शून्य प्रहर वर चर्चा करून दिघा रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू असा थेट इशारा दिला होता.

 मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात हार्बर रेल्वे मार्गातील प्रवासी जोडले असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात पडणारा अतिरिक्त भार कमी होवून ४० टक्के गर्दी कमी होणारा आहे तसेच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत येथील नोकरीनिमित्त येणारा नोकरदार वर्ग थेट नवी मुंबई मध्ये येऊ शकतात असा हा प्रकल्प आहे. सन 2014 ला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर रेल्वे बजेटमध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी 428 कोटीची मंजुरी मिळवली होती. व या प्रकल्पाचे भूमिपूजन 10 डिसेंबर 2016 रोजी देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.  परंतु प्रकल्पामध्ये एम एम आर डी ए द्वारा 1080 झोपड्यांचे पुनर्वसनाअभावी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून सदर प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये करून पहिल्या टप्प्यातील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे काम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार जागे संदर्भात अनेक बैठका घेऊन यातील तिढा सोडून सन 2018 मध्ये दिघागाव रेल्वे स्थानकाचे काम सुरू करून या स्थानकाचे काम मार्गी लावले आहे. या दिघा परिसरात आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने नोकरी निमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गाचा व स्थानिक नागरिकांचा पैसा व वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. हे रेल्वे स्थानक सुरू न झाल्याने मध्य रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात जमा होणारा महसूलही  घटत आहे. 

तसेच या परिसरात नोकरीनिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गाला स्वताच्या व इतर वाहनांचा वापर करावा लागतो या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी मा. प्रधानमंत्री, रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक, यांना वारंवार स्मरणपत्रे देऊन सुद्धा काही हालचाल झाली नाही. अखेर दिघागाव व ऐरोली रेल्वे स्थानकात केलेल्या सह्यांच्या मोहिमेस नागरिकांनी दिलेला मोठा प्रतिसाद व प्रवाशांच्या सह्या व प्रतिक्रियांची प्रती देशाचे प्रधानमंत्री तसेच रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना देण्यात आल्या होत्या. या दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी  ९० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. अखेर हा पैसा जनतेचाच असलेल्याने त्याचा फायदा जर जनतेला होत नसेल तर जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी रस्त्यावर यावे लागेल यास प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com