ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या जल्लोषात दिघा वासीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.
दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झाल्यानंतर प्रत्यक्षात दिघा रेल्वे स्थानकात ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी व दिघावासियांनी जल्लोष केला. त्यावेळी रेल्वेचे सहाय्यक रेल्वे प्रबंधक अखलख अहमद, मुख्य प्रकल्प अधिकारी बी के जहा, प्रकल्प अधिकारी आर एस पाल, डीसीएम अरुण कुमार तसेच रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विचारे यांनी स्थानकात येणाऱ्या रेल्वे ला थांबा देवून मोटरमन यांचा सत्कार केला. व दिघा गाव रेल्वे स्थानकातून गाडी पुढे रवाना केली. तसेच दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करणाऱ्या रेल्वे च्या सर्व अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सत्कार करून त्यांचेही आभार मानले.
मागील अनेक महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले दिघा रेल्वे स्थानक आता खुले होणार असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या स्थानकाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक खासदार राजन विचारे यांचे नावच नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विचारे यांच्या मतदारसंघात असलेले दिघागाव रेल्वे स्थानक व बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रमात स्थानिक खासदारालाच स्वपक्षाचा नसल्याने डावलण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली होती. दिघा स्टेशनसाठी खासदार राजन विचारे यांनी प्रचंड मेहनत घेऊन पाठवपुरवा करून प्रकल्प कार्यान्वित केला. त्याचे लोकार्पण होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले गेले नसून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला. तसेच लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या सरकारला २०२४ मध्ये येणाऱ्या आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल अशी प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिली.
0 टिप्पण्या