Top Post Ad

बंगळूर येथे अखिल भारतीय कलासाधक संगम- २०२४चे भव्य आयोजन

 


 येत्या १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान बेंगळुरू येथील श्रीश्रीरविशंकर आश्रमात कलासाधक संगम कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे २००० हुन अधिक प्रतिनिधी व कलाकार एकत्र जमणार आहेत. अशी माहिती संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.  पत्रकार परिषदेला कोकण प्रांत अध्यक्ष आणि निर्माते आणि अभिनेते सुनील बर्वे, अ.भा. नाट्यविधा प्रमुख आणि रंगभूमी कलावंत प्रमोद पवार, प्रांताचे सहमंत्री गणेश वाणी आणि मंत्री सुरेंद्र कुलकर्णी कोषाध्यक्ष रवींद्र फडणीस, चित्रपट विधेचे जगदीश निषाद, विवेक पांडे उपस्थित होते.
सर्व प्रथम उपस्थित पत्रकारांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन सुरेंद्र कुलकर्णी यांनी, प्रास्ताविक सुनील बर्वे आणि पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे आणि तिथे होणाऱ्या तिथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती प्रमोद पवार यांनी उत्तरे दिली.

"कलासाधक संगम" ह्या कार्यक्रमाचे आयोजन दर ३ वर्षांनी देशाच्या विविध भागात होते. भारतीय कलासंस्कृतीवर विश्वास असणाऱ्या कलासाधकांचे हे मोठे एकत्रीकरण आहे. विविध कला प्रकारातील (विधा) रंगमंचीय सादरीकरण तसेच वैचारिक परिसंवाद - विमर्श यांचा समावेश असतो. अशा कार्यक्रमातून कार्यकर्ता, कलासाधक आणि कलारसिकजन यांची "भारतीय कलादृष्टी" विकसित करून मातृभूमीवरील आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.

या वर्षी कलासाधक संगमात देशाच्या विविध भागातून येणारे साहित्यिक आणि कलावंत, साहित्य आणि कलेच्या माध्यमातून "समरसता" ह्या विषयाचे विविध पैलू सादर करणार आहेत. त्यामधे विविध सत्रांतून परिसंवाद, चर्चा, विविध रंग मंचीय कलाविष्कार, प्रदर्शनी यांचे आयोजन केले जाणार आहे. याचा परमोच्च बिंदू म्हणजे शेवटच्या दिवशी "समरसता शोभायात्रेचे केलेले आयोजन ।या शोभायात्रेत महाराष्ट्रातील पंढरीच्या वारीचे प्रदर्शन चारही प्रांताचे कार्यकर्ते कलावंत करणार आहेत.

चित्रकला, छायाचित्रकला, हस्त अक्षरचित्रकला (कैलीग्राफी) आणि रांगोळी यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पूर्वोत्तर भारतातले कलासाधक समूह नृत्य सादर करणार आहेत. या व्यतिरिक्त धार्मिक सामाजिक प्रवचने, नृत्य, गायन, वादन याचे कार्यक्रम सादर होणार आहेत. या चार दिवसीय कार्यक्रमाचे उ‌द्घाटन कलेची जतन करणारे आणि आश्रयदाते विख्यात म्हैसुरुच्या राज घराण्याचे माननीय राजा यदुवीर वाडियार जी तसेच विजयनगर साम्राज्याचे वंशज माननीय श्री कृष्णदेवराय जी उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी विख्यात लोक कलाकार पद्मश्री मंजम्मा जोगली जी, वरिष्ठ तबला वादक रविंद्र यावगल जी आणि इतिहासकार डॉ. विक्रम संपत जी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सदर कलासाधक संगमात दोन दिवस (दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी) संघाचे पूजनीय सरसंघचालक माननीय मोहन जी भागवत उपस्थित राहणार आहेत. यंदापासून सुरू केलेल्या "भरतमुनी पुरस्काराचे" वितरण होणार आहे. सन २०२३ साठीचा "दृश्यकला" आणि "लोककला" या प्रकारासाठी आहे.

मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार विजय दशरथ आचरेकर आणि सिंधुदुर्ग इथले लोक कलाकार गणपत सखाराम मसगे यांना संस्कार भारती च्या 'भरतमुनी सन्मान २०१३' देण्यात येणार आहे. हे पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवत जी यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. संस्कार भारतीतर्फे देण्यात येणारा हा भरतमुनी सन्मान भारताचा पाचवा वेद मानल्या जाणाऱ्या नाट्यशास्त्राचे रचनाकार महर्षी भरतमुनी यांना समर्पित आहे. २०२४ वर्षाचा "भरतमुनी सन्मान" रंगमंचीय कला आणि साहित्य क्षेत्रासाठी दिला जाईल. सदर पुरस्काराचे स्वरूप 'स्मृति चिहह्न, सन्मान पत्र आणि रोख रक्कम रुपये १,५१००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याचवेळी संस्कार भारतीने निर्माण केलेल्या या दोन्ही कलाकारांवरील जीवन आणि कार्यावर आधारित लघुचित्रपित ही दाखवली जाणार आहे. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जी यांचे आशीर्वचन आणि श्री मोहन जी भागवत यांचे समारोप प्रसंगी (४ फेब्रुवारी) मार्गदर्शन होईल आणि या चार दिवसीय कलासाधक संगमाची सांगता होईल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com