राजमाता जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहीवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. लखुजी जाधवांचं हे गाव. मग येथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय? अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे जाधव हे मराठा नसून सगळेच्या सगळे जाधव बौद्ध (महार) आहेत, एक दोन अपवाद असतील ही. म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय? ते नेमकं काय मुरतय हे मात्र सिद्ध करता येणे जरा अवघडच. बरच काही इतिहासाच्या पानांत गुदमरुन गेलं पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत. दडलेल्या इतिहासाला खोदण्यासाठी खुणावत आहेत. जिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, तो कुणी लिहिला आहे हे आता जगजाहिर झाले आहे. तो सोयीनुसार कसा बदलला जातो हे देखील आता लपून राहिलेले नाही.
वर्तमानकाळात देखील तो बदलण्याचा कसा प्रयास होत आहे हे देखील आम्ही पहात आहोत. जेम्स लेन्सचे उत्तम उदाहरण आमच्या समोर आहेत. जिजाऊंनी शिवराय घडवला. भारतीयाना ताठ मानेने जगणे शिकविले. प्रत्येक माणसात स्वाभिमान जागविला. संशोधन होऊन आज ना उद्या दोन्ही गोष्टींचा उलगडा होईल तेंव्हा होईल. पण आजच्या घटकेला वरील दोन्ही गोष्टीची नाळ दोन समाजाला जोडून जातात. शंका अशी आहे की एकतर हे दोन्ही समाज समान दर्जाचे असावेत किंवा एकच असावेत किंवा अस्पृश्यता आजून उग्ररूप धारण करायची होती. काय असेल ते गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. हल्ली काही धर्मवादी मंडळी म्हणतात की "मराठा सेवा संघ," "संभाजी ब्रिगेड" आणि बौद्धांनी महापुरुषांना जातीत विभागले आहे. पण इतिहास लिहितांनाच जर जात बघून लिहिला असेल आणि तो चव्हाट्यावर आणतांना जातीचा उल्लेख करावा लागत असेल तर तो योग्यच आहे...
उदाहरणार्थ
आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक असताना वासुदेव बळवंत फ़डकेला आद्यक्रांतिकारक केला याचे कारण काय ?
उमाजी नाईक रामॊशी जातितले आणि फडके ब्राह्मण समाजातला. अशी अनेक उदाहरणे आहेत,
१ ] पहिल्यांदा सशस्त्र क्रांती करणारे उमाजी नाईकांना डावलून फ़डके या ब्राह्मणाला पुढे केला.
२] महाबलाढ्य बादशहा औरंग्याला मराठा राणी ताराराणींनी शह दिला पण झाशीच्या लक्ष्मीबाईला पुढे
केले. त्याचे कारण लक्ष्मीबाई ब्राह्मण.
३] सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानदेवाला पुढेकरून चौदाव्या वर्षी ग्रंथ संपदा लिहिणाऱ्या मराठा संभाजी
राजांना लपवले..
कारण ज्ञानेश्वर ब्राह्मण.
४] मराठा समाजाच्या जगतगुरु तुकोबांचे सहित्य लपवून
रामदासाचे उदात्तीकरण केले
कारण रामदास ब्राह्मण.
५] शिवजयंती प्रथमत महात्मा फ़ुले यांनी साजरी केली पण नाव टिळकाचे पुढे केले कारण
टिळक ब्राह्मण.
६] घोडखींडीत लढणारे संभाजी जाधव लपवून बाजीप्रभू देशपांडे समोर आणले कारण बाजीप्रभू कायस्त ब्राह्मण.
७] शिक्षणाची सुरुवात आणी प्रसार महात्मा फ़ुलेंनी केला पण शिक्षकदिन सर्वपल्ली राधाकृष्णच्या नावाने
कारण सर्वपल्ली ब्राह्मण.
८] मराठी साहित्याची प्रचंड निर्मिती अण्णाभाऊ साठेंनी केली. सातासमुद्रापलिकडे त्यांचे साहित्य गेले. त्याला प्रतिष्ठा मिळाली. पण मराठी दिन त्यांच्या नावाने नाही..
याचे कारण कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर ब्राम्हण.
९) पंढरपुरच्या विठुरायाची वारी ७०० वर्ष पुराणी परंपरा
खंडीत करण्याचा डाव म्हणजे सध्या साईंबाबा पदयात्रा मागील २०-२५ वर्षा पासून सुरु केली......
कारण साईंबाबा ब्राह्मण पेशवा
१०) अक्कलकोटचे स्वामी & गजानन महाराज हे दोघेही पेशवा ब्राह्मण म्हणून त्यांचे उद्दात्तिकरण. आणि खंडोबा, ज्योतिबा, बिरोबा हे बहुजनांचे महानायक म्हणून त्यांच्या नावे अंधश्रद्धा.
११) भारत देश २५०० वर्ष पुर्व पासून बौद्ध परंपरा पाळणारा पण बोलबाला ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी विचाराचा !
१२) शिंपी समाज्याच्या नामदेवांनी वारकऱ्यांची वारी सुरु केली.....
पण ज्ञानदेवे रचिला पाया
कारण ज्ञानदेव ब्राह्मण.
१३) आयुर्वेदिक उपचार करणारे पहिले जीवक कौमारभच्च (बौद्ध) समाजाचे आणि चोरून खपवले पतंजलीच्या नावे
कारण पतंजली ब्राह्मण
१४) भारताची मुळची भाषा मगधि आणि पाली
पण प्रतिष्ठा दिली आणि इतिहासात सांगितला संस्कृत कारण ती केवळ ब्राह्मणांना येत होती
१५) छञपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जिवाजी महाले (महार) होते
१६) सामान्य माणसाची गण व्यवस्था झाकन्यासाठी गणपतीला आद्य दैवत केले.
गणपतीला ब्राह्मणांनी प्रचारात आणले
१७) छञपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा किल्लेदार रायनाक महार होता
१८) रोहीडा किल्ल्याच्या नाईक पदाची जिम्मेदारी कालनाक महार व सोंडकर महार यांच्या कडे होती.
१९) शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रथम भगवे निशान तयार करून देणारे महादनाक महार सरदार होते
२०) छञपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडविण्याचा शेवटचा सशस्त्र प्रयत्न रायाप्पा महार याने केला. त्या प्रयत्नात रायाप्पा यास आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले.
२१) छञपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करुन , स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करणारा शूरवीर गोविंदनाक गोपाळनाक हा महार होता
२२) रायगड किल्ला दगडी बांधकाम करणारे गोपाळनाक महार हे छञपती संभाजी राजे यांचा अंत्यसंस्कार करणारे गोविंदनाक महार यांचे वडील होते
हे सगळं आणि प्रत्येक गोष्टीत असे का घडले ? की प्रत्येक चांगल्या आणि मुळच्या गोष्टी इथल्या बौद्ध (महार) लोकांनी केल्या परंतु त्याचे जनक हे बामण म्हणून आम्हाला शिकवले गेले... इथे जातीचा संबंध होता की नाही..? एकदा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना एका बैलगाडीवाल्याने साध्या बैलगाडीतुन हाकलुन दिले कारण ते "महार" होते.... पण, काळ बदलला आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी येथे पहिली metro railway धावली व त्या metro railway ची पहीली driver एक buddhist महीला "रुपाली चव्हाण" ह्या होत्या........
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास घडवला नाही, तर त्यांनी इतिहासच बदलला…!!!
0 टिप्पण्या