Top Post Ad

नागपूर येथील धनगर आरक्षणाच्या मोर्च्यातून काय साध्य झाले ?

 


तेथेच हे नेते आमरण उपोषणाला बसले असते तर कदाचित आज वेगळे चित्र असते -- सचिन ढगे 

 नुकत्याच झालेल्या नागपूर येथील   आदिवेशनावर धनगर समाजाच्या  एस.टी आरक्षणाची अमल बजावणी करावी या साठी विदर्भातील काही. नेत्यांनी  एकत्रीत येऊन मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन केले होते,त्या साठी या नेत्यांनी सर्व विदर्भ पिंजून काढला होता,तसेच हा संपूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या धनगर समाजाचा अस्मितेचा प्रश्न असल्या मुळे या मोर्चा साठी संपूर्ण महाराष्टातील धनगर समाज एकत्रीत,येत होता, परंतु या आयोजकांनी ज्यांनी कोणी या मोर्चाचे आयोजन केले असेल त्यांनी समाजातील अनेक नेत्यांना,कार्यकर्त्यांना,तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज बांधवांना या मोर्चाच्या नियोजनात कोणत्याच प्रकारचे स्थान तर सोडाच त्यांना महत्व सुध्दा देण्यात आले नव्हते,त्या मुळे यांच्या मोर्चा ची हवा निघून गेली होती ,यांच्या आव्हानाला सुध्दा कोणीच समाज बांधव भाव देत नव्हते,कारण हा मोर्चा त्यांनी फक्त आपल्या पुरताच आपल्याच नेतृत्वा पुरता प्रायोजित ठेवला होता,त्या मुळे या मोर्चा कडे समाज बाधवांनी पाठ फिरवली होती,

परंतु नंतर समाज बांधवांनी या नेत्यांच्या नव्हे तर आपल्या समाजाचा आरक्षण  हा अस्तित्वाचा प्रश्न असल्या मुळे आपल्या समाजाचा कमी पना दिसू नये म्हणून मोठ्या प्रमाणात या मोर्च्यात समाज बांधव आपल्या स्वतःच्या स्व खर्चाने गाड्या करून आले होते,कोणत्याच आयोजका कडून कोणीही कोणत्याच प्रकार ची अपेक्षा केली नाही स्वतः गाड्या करून समाज बांधव या मोर्चाला समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्ना साठी आले कोण्या नेत्याच्या बोलावण्या मुळे आले नाही,हे या मोर्चाचे खास वैशिष्ट होते,परंतु आयोजकांच्या  नियोजनात काही कमतरता असल्या मुळे या मोर्चाला पाहिजे तसा प्रतिसाद शासना कडून मिळाला नाही, आम्ही या पूर्वीच सांगितले होते की हा मोर्चा म्हणजे आपली राजकीय पोळी शेकन्याचा ,आणि  नेतृत्व सिद्ध करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न आहे, कारण आम्ही पाहत आहोत की गेल्या अनेक वर्षांपासून हे नेते असेच धनगर  आरक्षण अमल बजावणी करण्यासाठी दर चार वर्षानी निवडणुका जवळ आल्या की मोर्चे काढत असतात,समाजातील समाज बांधवांना मोर्चा मध्ये बोलावत असतात सकाळी नागपूरला सर्व समाज बांधव सकाळी जमा होतो,दुपारी मोर्चा निघतो,मोर्चाचे नेते मंडळी नेतृत्व करतात,आणि मग सभा स्थळी या महान नेत्यांची भाषणे होतात,आणि मग निवेदन देऊ. सर्व मोकळे होतात संध्याकाळी सर्व आपापल्या घरी,मग हे नेते त्यांच्या पक्षात मोठे होतात,ते तुपाशी राहतात समाज मात्र उपाशीच राहतो,असे हे यांचे अनेक वर्षा पासून चालू आहे,

येवढ्या वर्षात हे नेते आपल्याला आपल्या आरक्षणाची अमल बजावणी करू शकले नाही ते आता तरी करणार काय ,याचे उत्तर नाही असेच निघेल कारण याच नेत्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाची अमल बजावणी करायची नाही अशी चर्चा आता समाजात आहे,कारण जर धनगर समाजाची आरक्षण अमल बजावणी झाली तर या नेत्यांचे राजकारण संपुष्टात येईल,अशी भीती यांच्या मनात आहे ,कारण आरक्षण अमल बजावणी झाली तर मग यांना समाजाला एकत्रीत करण्यासाठी,आणि यांचे राजकारण करण्यासाठी कोणताच मुद्दा राहणार नाही त्या मुळेच हे आपले नेतेच या आरक्षणाच्या अमल बजावणीत खरे अडथळे आहेत अशी आता समाज बांधवांन मध्ये चर्चा आहे,यातील खरे काय आणि खोटे काय हे समाज आणि या समाजातील नेतेच जाणे,परंतु भारत स्वतंत्र झाल्या पासून तर आज पर्यंत या समाजाच्या आरक्षणाची अमल बजावणी होत नाही या मागील खरे कारण काय असू शकते हा आता या समाजाचा संशोधनाचा विषय झाला आहे,तरी पण नागपूरच्या मोर्चाच्या  आयोजकांना आम्ही या पूर्वीच  सांगितले होते तुम्हाला जर समाजाच्या आरक्षण अमल बजावणी करायची असेल तर मोर्चाच्या ठिकाणीच तुम्ही सर्व आयोजक मंडळींनी जो पर्यंत धनगर समाजाचा आरक्षणाची अमल बजावणी करण्यात येत नाही,समाजाच्या हातात तसे पत्र शासनाकडून मिळत नाही तो पर्यंत तेथेच आमरण उपोषणाला बसवे ,आणि या आयोजकांनी आपल्या  भाषनात जरी तसे म्हंटले असते तरी त्यांच्या बरोबर तेथे उपस्थित असलेले हजारो मोर्चे करी त्यांच्या बरोबर आमरण उपोषणाला बसले असते,,संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले असते,संपूर्ण महाराष्टातील धनगर समाज रस्त्यावर उतरला असता,त्या मुळे या सरकारला आपल्या आरक्षण अमल बजावणी बाबत कोणता ना कोणता  निर्णय घ्यावाच लागला असता, 

परंतु आयोजक यांना फक्त मोर्चा काढून आपले अस्तित्व सिद्ध करायचे होते समाजाचे नेते व्हायचे होते,त्या मुळेच त्यांनी असे केले नाही अशी सुध्दा समाजात चर्चा सुरू आहे,या मोर्च्यात तसेच झाले सकाळी समाज बांधव जमा झाले,दुपारी मोर्चा निघाला ,सभा स्थळी आला आणि तेथे या नेत्यांचे भाषणे झालीत त्यात सुध्दा वर्चस्वासाठी आपसातच नेत्यानं मध्ये चढावड,झाली ,पक्षाच्या आमदारांना,नेत्यांना स्टेजवर येऊ देण्यास मज्जाव करण्यात आला होता, तिथे मोर्चाचे श्रेय घेण्यासाठी चढावड होत होती,शेवटी काही समाज बांधवांच्या मद्यस्थिने काहींची भाषणे झाली,परंतु या मोर्चाचे आयोजन करणारे सुध्दा कोणत्या ना कोणत्या पक्षाचे नेते,कार्य करते होतेच,आहेच,याचे भान सुध्दा कोणालाच नव्हते काय की फक्त आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मोर्चाला मार्गदर्शन करावे इतर पक्षाच्या नेत्यांनी मोर्च्यात मार्गदर्शन तर सोडाच स्टेजवर सुध्दा येऊ नये अशी फिल्डींग यांनी लावली होती असे बोलल्या जाते,परंतु काही नेत्यांनी यांचे चक्रव्यूह तोडून टाकले,आणि नंतर या मोर्चाचा समारोप झाला या मोर्चाचे निवेदन घेण्या करिता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,तर सोडाच सादा मंत्रीही आला नाही,या वरून शासनाने सुध्दा या मोर्चाची  पाहिजे तशी दखल घेतली नाही,या मोर्च्यात येणाऱ्या सर्व समाज बांधवांची निराशाच झाली.शेवटी या मोर्च्या पासून काय साध्य झाले हेच अजून पर्यंत समाज बांधवांन मध्ये चर्चेचा विषय बनला आहे,  आयोजकांनी आमचे थोडे जरी आयकले असते आणि  त्याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसले असते तरी  तरी आज परिस्थिती वेगळी राहिली असती येवढे मात्र नक्की, जय मल्हार, जय अहिल्या देवी, जय क्रांती, 

  •  सचिन ढगे
  • अध्यक्ष मल्हार फाऊंडेशन,
  • संपादक विदर्भ रक्षक
  • अमरावती 9823854301

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com